Crop: कांदा रोपवाटिका | Topic: 1.कांदा बियाणे पेरणीपूर्वीचे नियोजन

उन्हाळी कांद्याची एक एकर मध्ये लागवड करण्यासाठी किती क्षेत्रावर नर्सरी बनवावी व एकरी किती किलो बियाण्याची कांदा रोपे तयार करावीत?

✅रब्बी हंगामात कांदा लागवड करताना सारा पद्धत,गादीवाफा पद्धत,सरी पद्धत या प्रकारे केली जाते.परंतु प्रामुख्याने मुख्य पीक म्हणून कांदा लागवड केली जात असेल तर सारा पद्धत किंवा गादीवाफा पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत असतात.
✅एक एकर क्षेत्रामध्ये 40 गुंठे म्हणजेच 43 हजार 560 स्क्वेअर फुट असतात,यामध्ये जेव्हा या पद्धतीद्वारे कांदा लागवड केली जाते तेव्हा सरासरी 2.5 ते 3 लाख रोपांची लागवड एक एकरामध्ये केली जाते.

एकरी किती किलो बियाण्याची रोपे लागतात?

✅रब्बी हंगामात कांदा लागवड करताना एकरी किती बियाण्याची रोपे लागतात यासाठी अगोदर त्या बियाण्याची अंकुरण चाचणी करणे खूप गरजेचे आहे. त्यानुसार किती बियाणे लागेल यासाठी खालील माहिती पहा.

  • जर बियाण्याची उगवण क्षमता म्हणजेच अंकुरण क्षमता हे 90 ते 95 टक्के असेल तर तुम्हाला एकरी 2 ते 2.5 किलो बियाण्याची रोपे लागवडीसाठी लागतील.
  • जर बियाण्याची उगवण क्षमता म्हणजेच अंकुरण क्षमता ही 70 ते 75 टक्के असेल तर तुम्हाला एकरी 3 ते 3.5 किलो बियाण्याची रोपे लागवडीसाठी लागतील.
  • जर बियाण्याची उगवण क्षमता म्हणजेच अंकुरण क्षमता ही 55 ते 65 टक्के असेल तर तुम्हाला  एकरी 4 किलो बियाण्याची रोपे लागवडीसाठी लागतील.
एक एकरासाठी किती क्षेत्रावर कांदा रोपवाटिका बनवायला हवी?

✅कांदा नर्सरी ही दोन प्रकारे केली जाते एक सारा पद्धत आणि दुसरी गादीवाफा पद्धत.
✅सारा पद्धतीद्वारे जर रोप तयार करत असाल तर एक एकरसाठी सुमारे पाच ते सात गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका बनवायला हवी.
✅गादीवाफा पद्धतीद्वारे जर रोप तयार करत असाल तर एक एकरासाठी आठ ते दहा गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका बनवायला हवी.