Crop: कांदा रोपवाटिका | Topic: 2.कांदा बियाणे पेरणीनंतरचे नियोजन

कांदा रोप पुर्नलागवडीसाठी तयार झाले आहे हे कसे ओळखावे?

कांदा रोप पुर्नलागवडीसाठी तयार झाले आहे हे कसे ओळखावे? 

✅ कांदा रोपे पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी पुर्नलागवडीसाठी तयार होते.
✅ कांदा रोपांचा जो कंद आहे त्याचा आकार लसणा एवढा झाल्यानंतर व कंदाचा रंग हा फिकट जांभळसर झाल्यानंतर अशी रोपे पुर्नलागवडीसाठी तयार होतात.
✅ रोपांची वाढ पाहायची झाली तर रोपांची उंची ही सर्वसाधारण 12 ते 15 Cm झाल्यानंतर व रोपांची जाडी ही 0.5 ते 1 Cm झाल्यानंतर रोपे पुर्नलागवडीसाठी वापरावीत.