Crop: कांदा रोपवाटिका | Topic: 2.कांदा बियाणे पेरणीनंतरचे नियोजन

कांदा रोप उपटण्यापूर्वी, उपटताना व उपटल्यानंतर रोपांची काळजी कशी घ्यावी?

कांदा रोप उपटण्यापूर्वी घ्यायची काळजी... 

✅ कांदा रोपांची लागवडी जर सारा पद्धतीने केली असेल तर उपटण्यापूर्वी मातीच्या प्रकारानुसार पाणी द्या.जर जाड माती असेल तर 4 ते 5 दिवस अगोदर पाणी द्या.जर मध्यम जाड माती असेल तर 3 ते 4  दिवस अगोदर पाणी द्या व हलकी माती असेल तर 2 दिवस अगोदर पाणी द्या.पाणी दाट पद्धतीने देत असताना अशा प्रकारे द्या जेणेकरून रोप उपटतात रान वाफस्यावर असेल.
✅ जर पाणी हे तुषार सिंचन पद्धतीद्वारे असेल तर आदल्या दिवशी पाणी द्या; परंतु पाणी देताना मातीच्या प्रकारानुसार किती वेळ द्यायचे हे ठरवा जेणेकरून रान दुसऱ्या दिवशी वाफस्यावर येईल.
✅ रोप उपटताना जर रान वाफस्यावर असेल तर रोपांच्या पांढऱ्या मुळ्या तुटून येत नाहीत व ज्या रोपांच्या पांढऱ्या मुळया जास्त असतात अशी रोपे पुर्नलागवड केल्यानंतर लवकर सेट होतात.
✅ कांदा रोप उपटण्यापूर्वी पाणी द्यावे, त्या पाण्यानंतर फवारणी करा. फवारणी केल्यामुळे रोपे पुर्नलागवड केल्यानंतर रोपांची मर अजिबात होत नाही, तसेच रोपे लवकर सेट होतात. रोपांवर जर कोणते बुरशीजन्य रोग व किडी असतील तर त्यांचा प्रादुर्भाव मुख्य शेतात होत नाही.
फवारणी कोणती करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर  क्लिक करा.
RidomilGold Marshal GreenBee Spray Kit

Tata Master Actara RootStar Spray Kit

Tata master- Aaatank-MC Extra Spray Kit

Saaf Profex super MC Extra Spray Kit

रोप उपटताना घ्यायची काळजी...  

✅ रोप उपटताना रोपे हळुवार उपटावीत जेणेकरून त्यांच्या पांढऱ्या मुळ्या तुटणार नाहीत व जास्तीत जास्त पांढऱ्या मुळ्या रोपांंबरोबर येतील व अशी रोपे पुनरलागवडीनंतर लवकर सेट होतील.

रोपे उपटल्यानंतर घ्यायची काळजी 

✅ रोपे उपटल्यानंतर रोपांचे गड्डे बांधावेत. गड्डे बांधण्यासाठी रबर न वापरता सुतळी किंवा सुती दोरी वापरावी, जर रबर लांबला तर गड्ड्यामधील साईडच्या रोपांना जखम होते व अशी रोपे पुनरलागवड केल्यानंतर मरून जातात त्या उलट जर सुतळी किंवा सुती दोरीने बांधले तर जखम होत नाही व मर सुद्धा होत नाही.
✅ रोपे उपटल्यानंतर रोपे लगेच गोळा करून सावलीला ठेवावीत. जर जास्त वेळ उन्हात राहिली तर रोपे जास्त सुकतात व अशी रोपे पुनरलागवडीनंतर लवकर सेट होत नाहीत.तसेच रोपे ही भिजवलेल्या बारदानाच्या पोत्यात ठेवावीत ज्यामुळे रोपे सुकणार नाहीत.
अशा प्रकारे रोपे उपटण्यापूर्वी उपटताना व उपटल्यानंतर काळजी घ्यावी.