कांदा रोपांमधील अंतर किती असावे?
कांदा रोपांमधील अंतर किती असावे?
✅ कांदा रोपांमधील अंतर याविषयी माहिती घेण्याअगोदर रब्बी हंगामात आपण 20 ते 35 टन कांदा उत्पादन एकरी होण्यासाठी किती कांदा रोपे एकरामध्ये बसवावीत.याची माहिती घेणे गरजेचे आहे.
✅ सरासरी एका कांद्याचे वजन जर आपण सरासरी 80 ते 100 ग्रॅम धरले तर आपल्याला एकरामध्ये 20 ते 25 टन उत्पादन घेण्यासाठी एकरी 250,000 ते 3,00,000 रोपे बसवणे गरजेचे आहे. या हिशोबाने आपल्याला लागवडीचे पद्धतीनुसार दोन कांदा रोपांमधील उभे व आडवे अंतर ठेवणे गरजेचे आहे.यानुसार सर्वसाधारण 1 फुटामध्ये 9 रोपे समान अंतरावर लावावीत.
सारा पद्धती मध्ये कांदा रोपांमधील अंतर
✅ जेव्हा आपण सारा पद्धतीमध्ये कांदा लागवड करतो तेव्हा रोटाव्हेअर मारल्यानंतर 4 फूटी सारे आडवे सोडले जातात. यामध्ये दोन रोपांमधील अंतर हे 10 Cm व दोन ओळींमधील उभे अंतर हे 10 Cm ठेवावे असे अंतर ठेवल्यानंतर 4 फूटी साऱ्यामध्ये एकूण 10 ते 12 रोपे बसतील अशा प्रकारे सारा पद्धतीमध्ये दोन रोपांमधील अंतर व दोन ओळींमधील अंतर ठेवावे.
गादी वाफा पद्धतीमध्ये रोपांमधील अंतर
✅ जेव्हा आपण गादी वाफा पद्धतीमध्ये कांदा लागवड करतो तेव्हा रोटाव्हेअर मारल्यानंतर 4.5 फुटी गादी वाफे सोडावेत. गादीवाफे उथळ किंवा बसके सोडले तर 2 ते 2.5 फुटापर्यंत टॉप सुटतो.या गादीवाफ्यावर दोन रोपांमधील आडवे अंतर हे 10 Cm ठेवावे. व दोन ओळींमधील उभे अंतर हे10 Cm ठेवावे. यानुसार एका गादीवाफ्यावर 6 ते 8 रोपे बसवावीत. ( परंतु गादीवाफे हे पसरट सोडावेत यासाठी मागे फळी लावणे गरजेचे आहे) अशा प्रकारे गादी वाफा पद्धतीमध्ये दोन रोपांमधील व दोन रोपांच्या ओळींमधील अंतर ठेवावे.
बियाणे नमूना निवड
✅ जेव्हा आपण सरी पद्धतीमध्ये कांदा लागवड करत असतो तेव्हा रोटाव्हेअर नंतर सरी सोडावी व त्यानंतर सरीमध्ये पाटामध्ये दोन्ही बाजूंनी कांदा रोपांची लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर हे 10 Cm ठेवावे. या पद्धतीचा अवलंब प्रामुख्याने आंतरपीक पद्धतीमध्ये केला जातो.
अशा प्रकारे कांद्याच्या रोपांची लागवड करताना दोन रोपांमधील अंतर ठेवावे.