सल्फर कमतरता
सल्फरची कमतरता कशी ओळखावी
✅कांदा पिकात सल्फर कमतरता आल्यावर कांदा पात शेंड्याकडून पिवळसर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर तो पिवळसरपणा संपूर्ण पातीवर येतो व संपूर्ण पात पिवळसर पडते व रोपांची वाढ खुंटते.कांदा पातीचा पसरटपणा कमी होतो व पातीचा आकार कमी होतो. मान नाजूक होते, कांद्याची वाढ होते, कांद्याचा रंग फिकट होतो, अशी लक्षणे आपल्याला प्लॉटमध्ये दिसत असतील तर सल्फर कमतरता आहे हे समजावे.
सल्फरची कार्य
कांद्याच्या वाढीमध्ये आणि विकासामद्धे सल्फरची भूमिका महत्त्वाची असते.
✅कांदा नैसर्गिक चव व वास
कांदा पिकास तिखट वास व नैसर्गिक रंग येण्यासाठी आवश्यक असलेल्या एलिनेज आणि इतर सल्फरयुक्त संयुगे संश्लेषणासाठी सल्फर आवश्यक आहे.
✅प्रथिने आणि एन्झाईम निर्मिती
सल्फर हा सिस्टीम आणि मेथिओनाइन सारख्या अमिनो ऍसिडचा महत्त्वाचा घटक आहे.अमिनो ऍसिड हे प्रथिने निर्मिती व चयापचयासाठी आवश्यक एन्झाईम निर्मिती मध्ये महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे रोपांची वाढ व विकास होतो.
✅प्रकाशसंश्लेषण आणि हरितकण निर्मिती
सल्फरमुळे वनस्पतीमध्ये हरितकणांची निर्मिती होते व पाती हिरव्यागार झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा वेग वाढतो व रोपांची वाढ आणि विकास होतो.
✅ अन्नद्रव्ये शोषण वाढते
सल्फरचा वापर केल्यामुळे अन्नद्रव्ये शोषण वाढते ज्यामुळे रोपांची वाढ व विकास होतो. ज्यामुळे नवीन पातींची शाखीय निर्मिती होते,मुळांची वाढ होते.
✅ कांद्याचा आकार वाढतो
सल्फरचा वापर केल्यामुळे कांद्याचा आकार वाढण्यास मदत होते व एकूण उत्पादनात वाढ होते.
सल्फर कमतरतेची कारणे
कांदा पिकामध्ये सल्फरची कमतरता अनेक कारणांमुळे होऊ शकते. काही प्राथमिक कारणे खालील प्रमाणे आहेत:
✅ जमिनीची निवड
जमिनीत सल्फरची पातळी कमी असणे.ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते अशा जमिनी (वाळूसार,मुरमाड)मध्ये कांदा लागवड केल्यास यामध्ये सल्फर कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असणे
ज्या जमिनीत कांदा लागवड करायची आहे व अशा जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असेल तर सल्फरचे प्रमाण सुद्धा कमी असते अशा जमिनीत सल्फर कमतरता लक्षणे दिसून येतात.
✅सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्यक्षमता
ज्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण व कार्यक्षमता कमी असते तेव्हा सल्फर या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसतात.
✅जमिनीचे कमी तापमान
जेव्हा जमिनीचे तापमान कमी असते,तेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्यक्षमता कमी असते, तसेच मुळांची कार्यक्षमता कमी असते, यामुळे अशा परिस्थितीमध्ये सल्फर अन्नद्रव्य कमतरता जाणवते.
✅अयोग्य पाणी नियोजन
जर पाणी जास्त दिले तर सल्फर रोपांच्या मुळांच्या कक्षेतून बाहेर वाहून जातो. तसेच जास्त ओलावा असल्यामुळे मुळांची शोषण क्षमता कमी होते, ज्यामुळे सल्फर कमतरतेची लक्षणे दिसतात. तसेच जर कमी पाणी दिले तर हवा तेवढा ओलावा मुळांच्या कार्यक्षेत्रात राहत नाही व मुळांची कार्यक्षमता कमी होते व सल्फर कमतरतेची लक्षणे दिसू लागतात.
✅अति पावसाचे प्रमाण
ज्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तेव्हा जमिनीतून शेताच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये वाहून जातात व मुळांच्या कक्षेत अन्नद्रव्य कमतरता भासते. त्यामुळे सल्फर कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असणे
ज्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते, तेव्हा कॅटायन एक्सचेंज प्रक्रिया संथगतीने होते,ज्यामुळे सल्फरच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅मातीचा घट्टपणा
ज्या जमिनीचा घट्टपणा कमी असतो तेव्हा अशा जमिनीत मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते व ज्या जमिनीचा घट्टपणा जास्त असतो,तेव्हा मुळांची वाढ कमी होते ज्याचा थेट परिणाम अन्नद्रव्ये शोषणावर होतो व सल्फरची कमतरतेची लक्षणे दिसतात.
✅जास्त क्षारांचे प्रमाण
ज्या जमिनी क्षारांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत मुळांची अन्नद्रव्ये शोषण क्षमता कमी होते व सल्फर कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅कांद्याचे वनस्पतीशास्त्र
कांदा रोपांच्या मुळांची वाढ ही जमिनीच्या वरच्या भागात होते. ज्यामुळे अन्नद्रव्य उपलब्धता मर्यादित असते, परिणामी सल्फर कमतरतेची लक्षणे कांदा पिकात दिसतात.
एकात्मिक उपाययोजना
✅ जमिनीची निवड
सल्फर कमतरता ही हलक्या म्हणजे कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या (लांबट, मुरमाड,वाळूसार) जमिनीत जाणवते, त्यामुळे जमिनीची निवड करताना अशा जमिनीची निवड करू नये.तसेच ज्या जमिनी आम्लयुक्त आहेत अशा जमिनीत सल्फरचे शोषण कमी होते, त्यामुळे अशा जमिनीची निवड लागवडीसाठी करू नये. तसेच क्षारयुक्त जमिनीत अन्नद्रव्ये शोषण कमी असते. त्यामुळे अशा जमिनीची निवड सुद्धा करू नये.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
✅ योग्य खत नियोजन
जमिनीची निवड केल्यानंतर त्या जमिनीची गुणवत्ता व पिकाची गरज या गोष्टींचा अभ्यास करून योग्य खत नियोजन करावे.
खत नियोजन विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटोवर क्लिक करा.
✅ योग्य पाणी नियोजन
मातीचा प्रकार, गुणवत्ता व वातावरण यांचा अभ्यास करून योग्य प्रकारे पाणी नियोजन करा. जर योग्य प्रकारे पाणी नियोजन केले तर रान जास्तीत जास्त काळ वाफस्यावर राहते व अन्नद्रव्ये शोषण वाढते व सल्फरची कमतरता भासत नाही.
रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करा.
✅पावसानंतरचे नियोजन
पावसानंतर सल्फर कमतरता येऊ नये म्हणून खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबक द्वारे करावा.
उपचरात्मक उपाययोजना
✅ सल्फरची कमतरता लक्षणे दिसत असतील तर खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबकद्वारे करावा.