बोरॉन कमतरता
बोरॉन कमतरता कशी ओळखावी?
✅बोरॉनची कमतरता असल्यास कांद्याच्या कंदाचा आकार विकृत होतो. कंद योग्य आकाराचे, गुळगुळीत किंवा घट्ट नसतात. मुळांची वाढ खुंटते किंवा मुळे कमकुवत होतात,ज्यामुळे पोषणद्रव्यांचे शोषण नीट होत नाही.पाने पिवळसर पडतात आणि सुकतात.पाने आणि कंदावर पांढरे किंवा तपकिरी ठिपके दिसतात, जे बोरॉनच्या कमतरतेचे प्रमुख लक्षण आहे. कंद आतून सडू लागतात,कंदाना तडे पडतात.एकूणच कंदांचा आकार लहान राहतो आणि कांदा पिकाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.
बोरॉनचे कार्य
बोरॉन हे एक अत्यंत सूक्ष्म अन्नद्रव्य असून ते कांदा पिकाच्या आरोग्य आणि उत्पादन क्षमतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. बोरॉनचे कार्य खालीलप्रमाणे आहे:
✅ पेशी भीतींची मजबुतीकरण
बोरॉन पेशी भीतीच्या निर्मिती आणि स्थिरतेसाठी महत्त्वाची आहे.यामुळे कांद्याच्या कंदाची रचना मजबूत होते आणि कांद्याना चिरा पडत नाहीत.
✅ साखर वाहतूक
बोरॉन साखर आणि कार्बोहाइड्रेटसचे पानांपासून कंदांपर्यंत वहन करण्यास मदत करते, यामुळे कंदाचा योग्य विकास आणि आकार सुनिश्चित होतो.
✅ मुळांची वाढ
बोरॉन निरोगी मुळे विकसित करण्यास मदत करते, ज्यामुळे पोषणद्रव्ये आणि पाण्याचे शोषण सुधारते आणि कांदा पिकाचे उत्पादन वाढते.
✅ ताण सहनशीलता
बोरॉन पिकाला दुष्काळ, रोग आणि इतर तानांपासून वाचवण्याची क्षमता वाढवतो, ज्यामुळे पिकांचे आरोग्य सुधारते.
✅ कॅल्शियमचे शोषण
बोरॉन कॅल्शियमच्या योग्य शोषणात मदत करतो, जे कंदांच्या विकासासाठी आणि पानांच्या कडा सुकण्यासारख्या विकारांना कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
✅ कांद्यांची गुणवत्ता सुधारणा
बोरॉनची योग्य मात्रा गुळगुळीत,एक समान, उच्च दर्जाचे आणि जास्त काळ टिकणारे कंद तयार करतो.
बोरॉन कमतरतेची कारणे
✅ मातीतील कमी सेंद्रिय पदार्थ
ज्या जमिनीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी असते, तिथे बोरॉनची उपलब्धता खालावते.
✅ जमिनीचा उच्च PH स्तर
ज्या मातीचा PH स्तर 7.5 पेक्षा जास्त असतो, अशा मातीमध्ये बोरॉनची उपलब्धता कमी असते.
✅ जमिनीचा जास्त निचरा
पाण्याचा जास्त निचरा असलेल्या जमिनीत बोरॉन माती बाहेर वाहून जाते ज्यामुळे त्यांची पातळी कमी होते.
✅ जास्त पाऊस किंवा जास्त सिंचन
जास्त पाऊस किंवा सतत सिंचनामुळे बोरॉन मातीबाहेर निघून जातो,ज्यामुळे पिकांना बोरॉनची कमतरता जाणवते.
✅ जमिनीचे धरण (Soil Erosin)
पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे जमिनीच्या वरच्या थराची धूप झाल्यास बोरॉनची मात्रा कमी होऊ शकते. त्यामुळे बोरॉनची कमतरता जाणवते.
✅ उच्च कॅल्शियम असलेली माती
ज्या मातीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, तिथे बोरॉनची गतिशीलता कमी होते, त्यामुळे कांदा पिकाला बोरॉन कमी प्रमाणात उपलब्ध होते.
✅ जमिनीतील कोरडेपणा
कोरड्या मातीमध्ये बोरॉन न विरघळल्यामुळे पिकाला उपलब्ध होत नाही.
✅ जास्त प्रमाणात नत्र व फॉस्फरस खतांचा वापर
नत्र आणि फॉस्फरस खतांचा जास्त वापर केल्यास बोरॉनची उपलब्धता कमी होऊ शकते.
✅मातीतील क्षारांचे प्रमाण
क्षारयुक्त मातीमध्ये बोरॉनची उपलब्धता कमी होऊन त्यांचे शोषण रोखले जाते.
एकात्मिक उपाययोजना
✅जमिनीची निवड
बोरॉनची कमतरता ही हलक्या म्हणजे कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या (लांबट,मुरमाड,वाळूसार) जमिनीत जाणवते त्यामुळे जमिनीची निवड करताना अशा जमिनीची निवड करू नये.तसेच ज्या जमिनी आम्लयुक्त आहेत अशा जमिनीत बोरॉनचे शोषण कमी होते त्यामुळे अशा जमिनीची निवड लागवडीसाठी करू नये.तसेच क्षारयुक्त जमिनीत अन्नद्रव्ये शोषण कमी असते. त्यामुळे अशा जमिनीची निवड सुद्धा निवड करू नये.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
✅योग्य खत नियोजन
जमिनीची निवड केल्यानंतर त्या जमिनीची गुणवत्ता व पिकाची गरज या गोष्टींचा अभ्यास करून योग्य खत नियोजन करावे.
खत नियोजन विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटोवर क्लिक करा.
✅योग्य पाणी नियोजन
मातीचा प्रकार, गुणवत्ता व वातावरण यांचा अभ्यास करून योग्य प्रकारे पाणी नियोजन करा. जर योग्य प्रकारे पाणी नियोजन केले तर रान जास्तीत जास्त काळ वाफस्यावर राहते व अन्नद्रव्ये शोषण वाढते आणि बोरॉनची कमतरता भासत नाही.
रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करा.
✅ पावसानंतरचे नियोजन
पावसानंतर बोरॉनची कमतरता येऊ नये म्हणून खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबक द्वारे करावा.
उपचारात्मक उपाययोजना
✅बोरॉनची कमतरता लक्षणे दिसत असतील तर खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबकद्वारे करावा.