कमतरता कशी ओळखावी?

✅ कांद्याच्या पाती पिवळसर दिसतात, पिवळसर भागांवर लहान तपकिरी किंवा काळसर डाग तयार होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास हे डाग कोरडे होऊन पात सुकते.
मॅगनीज अभावामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा येतो, ज्यामुळे झाडांची सामान्य वाढ खुंटते.कांद्याच्या कंदाची निर्मिती कमी होते. मुळांची कार्यक्षमता कमी होते,ज्यामुळे पोषण शोषणात अडथळा येतो.संपूर्ण झाड फिकट आणि अशक्त दिसते. 

कांदा पिकामध्ये मॅगनीजचे कार्य 

प्रकाश संश्लेषण सुधारणा
मॅगनीज क्लोरोफिल निर्मितीसाठी आवश्यक असून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, यामुळे कांद्याच्या पानांद्वारे ऊर्जा उत्पादन कार्यक्षम होते. 

एंझाइम सक्रियता
मॅगनीज अनेक एंझाइम सक्रिय करण्यासाठी उपयुक्त आहे. ज्यामुळे झाडांच्या चयापचय प्रक्रिया सुरळीत होतात. 

✅ नायट्रोजन चयापचय
नायट्रोजनचे शोषण आणि त्यांचे प्रथिनामध्ये रूपांतर करण्यासाठी मॅगनीज मदत करते.

✅ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
मॅगनीज झाडांना ताण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी मदत करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतो. 

कंदाची गुणवत्ता
मॅगनीज पोषणामुळे कांद्याच्या कंदाची संरचना, चकाकी आणि गुणवत्ता सुधारते. 

जड पदार्थांचे शोषण
मॅगनीज झाडांद्वारे लोह, जस्त आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक घटकांचे शोषण सुधारते. 

शर्करांचे निर्मिती आणि वाहतूक
मॅगनीज झाडांच्या पेशीमध्ये शर्करांची  निर्मिती आणि वाहतूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्यामुळे कांद्याची वाढ होते. 

कांदा पिकात मॅगनीज कमतरतेची कारणे 

✅ उच्च PH असलेली माती (आलक्लिन माती)
मातीचा PH 7.5 पेक्षा जास्त असल्यास मॅगनीज अघटनशील स्वरूपात बदलतो, ज्यामुळे झाडांना तो शोषता येत नाही. 

सेंद्रिय पदार्थांची कमतरता
मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी असल्यास मॅगनीज उपलब्ध होण्याची क्षमता घडते. 

पाणी साचणे
पाण्याचा जास्त साठा झाल्यास मॅगनीज ऑक्सिडाईज होतो आणि झाडांसाठी अनुउपलब्ध होतो.

फॉस्फरसचे जास्त प्रमाण
मातीमध्ये फॉस्फरस जास्त असल्यास मॅगनीजचे शोषण कमी होते, कारण फॉस्फरस आणि मॅगनीज  यामध्ये परस्पर प्रतिस्पर्धा होते.

✅ अत्याधिक ओलावा
हलक्या आणि निचऱ्याच्या जमिनीत पावसामुळे किंवा सिंचनामुळे मॅगनीज मातीमधून बाहेर जातो.

थंड तापमान
थंड हवामानामुळे मातीतील मॅगनीज  शोषण कमी होते. 

लोह किंवा झिंकचे जास्त प्रमाण
लोह आणि झिंक जास्त प्रमाणात असल्यास मॅगनीज शोषणावर नकारात्मक परिणाम होतो. 

मुळांची खराब वाढ
जर मुळे व्यवस्थित विकसित झाली नसतील, तर पोषक घटकांचे शोषण कमी होते. 

एकात्मिक उपाययोजना 

✅जमिनीची निवड 
मॅगनीज कमतरता ही हलक्या म्हणजे कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या (लांबट,मुरमाड,वाळूसार) जमिनीत जाणवते. त्यामुळे जमिनीची निवड करताना अशा जमिनीची निवड करू नये.तसेच ज्या जमिनी आम्लयुक्त आहेत अशा जमिनीत मॅगनीजचे शोषण कमी होते त्यामुळे अशा जमिनीची निवड लागवडीसाठी करू नये.तसेच क्षारयुक्त जमिनीत अन्नद्रव्ये शोषण कमी असते. त्यामुळे अशा जमिनीची निवड सुद्धा निवड करू नये. 

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

✅योग्य खत नियोजन 
जमिनीची निवड केल्यानंतर त्या जमिनीची गुणवत्ता व पिकाची गरज या गोष्टींचा अभ्यास करून योग्य खत नियोजन करावे.
खत नियोजन विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटोवर क्लिक करा.

✅योग्य पाणी नियोजन 
मातीचा प्रकार, गुणवत्ता व वातावरण यांचा अभ्यास करून योग्य प्रकारे पाणी नियोजन करा. जर योग्य प्रकारे पाणी नियोजन केले तर रान जास्तीत जास्त काळ वाफस्यावर राहते व अन्नद्रव्ये शोषण वाढते आणि मॅगनीजची कमतरता भासत नाही.
रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करा

✅ पावसानंतरचे नियोजन
पावसानंतर मॅगनीजची कमतरता येऊ नये म्हणून खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबक द्वारे करावा. 

उपचारात्मक उपाययोजना 

✅मॅगनीजची कमतरता लक्षणे दिसत असतील तर खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबकद्वारे करावा.