Crop: कांदा | Topic: E.कांदा पिकात येणाऱ्या अडचणी

कांदा रोपांची पात वाढत आहे परंतु मान जाड होत नाही याची कारणे व यावर काय उपाययोजना कराव्यात?

कांदा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत कांदा पातीची उंची वाढणे, कांदा मान जाड होणे, पात रुंद पसरट होणे, त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढ होणे ही प्रमुख कार्य वनस्पतीशास्त्रानुसार कांदा रोपवाढीच्या अवस्थेत कांदा पिकात प्रामुख्याने होत असतात. कांदा वाढीसाठी म्हणजेच कांद्याची उंची वाढण्यासाठी ऑक्सिन हा वाढ संप्रेरक महत्त्वाची भूमिका बजावतो. ऑक्सिन हा वाढ संप्रेरक वनस्पतींच्या म्हणजेच कांद्याच्या कोवळ्या भागात तयार होतात,ज्यामध्ये नवीन मुळे,नवीन पाती,कोवळा भाग यामध्ये तयार होतो,ज्यामुळे ऑक्सिनचे प्रमाण वाढल्यामुळे पातींची जास्त वाढ होते.

कांदा पिकात ऑक्सिन वाढीची कारणे

✅ नैसर्गिक घटक
यामध्ये योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला तसेच तापमान 15 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर ऑक्झिनचे प्रमाण वाढते व कांदा पिकात पातीची वाढ जास्त होते. सूर्यप्रकाशाचे प्रमाण जास्त असेल तर ऑक्सिन निर्मिती कमी होते व रोपांची पातीची वाढ अवांतर होत नाही, परंतु हिवाळी वातावरणात तापमान हे 15 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते व सूर्यप्रकाशामध्ये जास्तीत जास्त लाल आणि निळ्या रंगाच्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे याचा नैसर्गिक परिस्थितीमुळे हिवाळ्यात ऑक्सिनचे प्रमाण वाढून पातीची वाढ जास्त होते.

✅सततचा ओलावा
सतत पडणारा पाऊस किंवा अयोग्य सिंचनामुळे कांदा रोपात सततच्या ओलाव्यामुळे मुळांद्वारे जे पाणी शोषण केले जाते व त्याद्वारे ऑक्सिनची वाहतूक वाढते व परिणामी कांदा पिकात ऑक्सिनची कार्यक्षमता वाढल्यामुळे पातीची वाढ जास्त होते व मान लहान राहते.

✅अन्नद्रव्य वापर
नायट्रोजनचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे कांदा पिकामध्ये ट्रायपटोफन व इतर अमिनो ऍसिडचे प्रमाण वाढते. अमिनो ऍसिड हे रोपांमध्ये ऑक्सिनचे प्रमाण वाढवते, यामुळे पातीची वाढ जास्त होते. तसेच झिंक व  बोरॉन हे अन्नद्रव्य घटक ऑक्सीन या संप्रेरकाच्या चयापचयात  महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे झिंक व बोरॉनचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिनची कार्यक्षमता व प्रमाण वाढते व पातींची वाढ जास्त होते.

✅जैविक घटक
जर मुळांच्या कार्यक्षेत्रात Azospirillum, Rhizobium, Pseudomonas, Michoriza  या जिवाणूंचा वापर हा वनस्पतीमध्ये ऑक्सिनचे प्रमाण वाढवतो व त्यामुळे रोपांची वाढ जास्त होते.

✅पोषकांचा अति वापर
फवारणी मध्ये अमिनो ऍसिड व इतर पोषक उत्पादनांचा वापर जास्त प्रमाणात केला तर ऑक्झिनचे प्रमाण रोपांमध्ये वाढते. अमिनोयुक्त उत्पादने तसेच इतर पोषक उत्पादनांमध्ये IAA हे असते, त्यामुळे अतिवापर केल्यामुळे ऑक्सिन प्रमाण वाढते, पातीची लांबी वाढून मान कमजोर होते.

उपाययोजना 

✅योग्य पाणी नियोजन
नैसर्गिक घटकांवर आपण नियंत्रण करू शकत नाही परंतु योग्य पाणी नियोजन करून ऑक्सीनचे वहन नियंत्रित करू शकतो, त्यामुळे पाणी देताना जमीन लवकर वाफस्यावर येईल व कोरडी होईल याची काळजी घ्यावी. जर वहन थांबले तर ऑक्झिनची कार्यक्षमता कमी होते व रोपांची अवांतर वाढ होत नाही.

✅नायट्रोजनचा मर्यादित वापर
नायट्रोजन युक्त खतांचा वापर केल्यामुळे अमिनो ऍसिडचे प्रमाण वाढते. अमिनो ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे ऑक्सिनचे प्रमाण वाढते व रोपांची व पातींची वाढ जास्त प्रमाणात होते आणि मान लहान राहते. त्यामुळे नायट्रोजनचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

✅झिंक व बोरॉनचा मर्यादित वापर
बोरॉन व झिंक हे ऑक्सिन चयापचय  प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे ऑक्सिनची कार्यक्षमता वाढते व परिणामी रोपांची अवांतर वाढ जास्त होते. त्यामुळे झिंक व बोरॉनचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

अमिनोयुक्त उत्पादनांचा मर्यादित वापर
अमिनोयुक्त उत्पादनांचा वापर वाढल्यामुळे ऑक्सिनचे प्रमाण वाढते व पातींची अवांतर वाढ होते त्यामुळे अमिनोयुक्त उत्पादनांचा वापर रोपवाढीच्या अवस्थेत कमी करावा.

✅योग्य पोषक उत्पादनांचा वापर
पोषक उत्पादनांची निवड करताना त्या उत्पादनामध्ये अमिनो ऍसिड यांसारखी पोषके व IAA यांसारखी वाढ संप्रेरके असतील तर त्याचा वापर मर्यादित करावा, त्यामुळे रोपांमध्ये ऑक्सिनचे प्रमाण वाढते व रोपांची वाढ होते. त्याउलट आपण सिव्हिड युक्त उत्पादनांचा व ज्यामध्ये 6 BA हे वाढ संप्रेरक असते. याचा वापर केल्यास पातीची वाढ मर्यादित होते व मान जाड होते

उपचारात्मक उपाययोजना

✅प्रामुख्याने ही अडचण कांदा रोपवाढीच्या अवस्थेत येते म्हणजेच रोप लागवडीनंतर 40 दिवसांच्या पुढे या अडचणी येतात.
त्यासाठी अशी लक्षणे दिसल्यावर खालीलपैकी एक फवारणी करावी.