Crop: कांदा | Topic: J.कांदा वाढीवर परिणाम करणारे घटक

कांदा रोपांच्या वाढीवर जमिनीचा pH कशाप्रकारे परिणाम करतो?

कांदा रोपांच्या वाढीवर मातीच्या pH चा  मोठा परिणाम होतो.मातीचा pH मुळांच्या कार्यक्षमतेवर म्हणजे अन्नद्रव्य शोषणावर परिणाम करतो. तसेच मातीचा pH हा जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर व बुरशीच्या प्रादुर्भावावर थेट परिणाम करतो.

कांदा वाढीसाठी योग्य pH

✅कांदा रोपांच्या वाढीसाठी 6 ते 7.5 pH असणारी जमीन योग्य आहे. हा pH असणाऱ्या जमिनीतून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम व इतर आवश्यक अन्नद्रव्ये सहज मुळांद्वारे शोषण केली जातात. त्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो आणि रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

pH 6 पेक्षा कमी असताना

✅ज्या जमिनीचा pH 6 पेक्षा कमी असतो, त्या जमिनीतून मुळांद्वारे नायट्रोजन, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्य शोषण कमी होते. त्यामुळे रोपांच्या पाती पिवळ्या पडतात व रोपांची वाढ खुंटते. साधारणता ज्या जमिनीचा pH हा 6 पेक्षा कमी असतो अशा जमिनीमध्ये ॲल्युमिनियम आणि फेरस चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचा थेट परिणाम रोपांच्या मुळांच्या वाढीवर होतो व ज्यामुळे अन्नद्रव्य शोषण कमी होते आणि रोपांची वाढ खुंटते. 

पीएच 7.5 पेक्षा जास्त असताना

✅ज्या जमिनीचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असतो अशा जमिनीमधून फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचे शोषण मुळांद्वारे केले जात नाही. ज्यामुळे रोपांना अन्नद्रव्य पुरवठा हव्या त्या प्रमाणात होत नाही व रोपांची वाढ खुंटते.
✅ज्या जमिनीचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असतो अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे क्षारयुक्त मातीमध्ये मुळांची कार्यक्षमता कमी होते परिणामी शोषण कमी झाल्यामुळे रोपांची वाढ खुंटते.

pH चा बुरशीच्या  प्रादुर्भाव परिणाम

✅जमिनीचा pH हा बुरशीचा प्रादुर्भावावर व प्रसारावर थेट परिणाम करतो. ज्या जमिनीचा pH हा पेक्षा कमी असतो, अशा जमिनीत fusarium , pythium  यांसारख्या जमिनीतून प्रसार होणाऱ्या बुरशींचा प्रादुर्भाव होतो. ज्या जमिनीचा pH हा 7.5 पेक्षा जास्त असतो अशा जमिनीत Sclerotium capivorum  या बुरशीचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे पांढरी मुळकुज होते.

pH चा जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर परिणाम

✅जिवाणूंची कार्यक्षमता ही ज्या जमिनीचा pH 6 ते 7.5 च्या दरम्यान असतो, तेव्हा चांगल्या प्रकारे असतो ज्यावेळीस जमिनीचा pH 6 पेक्षा कमी व 7.5 पेक्षा जास्त असतो तेव्हा जिवाणूंची कार्यक्षमता कमी असते त्यामुळे pH चा परिणाम हा जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर दिसतो, ज्यामुळे अन्नद्रव्य उपलब्धता कमी जास्त होते आणि त्याचा थेट परिणाम रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.

अशा प्रकारे जमिनीचा pH हा कांदा रोपांचा वाढीवर व विकासावर थेट परिणाम करतो.