कांदा पिकात नियोजन पत्रकामध्ये दिलेली फवारणी कशाच्या आधारे दिली जाते.
कांदा पिकात नियोजन पत्रकामध्ये दिलेली फवारणी कशाच्या आधारे दिली जाते.
प्रतिबंधात्मक फवारणी नियोजन
फवारणी नियोजन बनवत असताना खालील मुद्द्यांच्या आधारे फवारणी नियोजन केले जाते.
✅फवारणी नियोजन हे प्रतिबंधात्मक बनवत असताना सर्वप्रथम रोपांची लागवड दिनांक,मातीचा प्रकार, जलसिंचन प्रकार,लागवडीचा प्रकार याविषयी संपूर्ण माहिती घेतली जाते.या माहितीनंतर त्या भागात असणारे पुढील स्थानिक हवामान यांची माहिती घेतली जाते.
✅माहिती घेतल्यानंतर मातीच्या गुणवत्तेनुसार रोपांच्या वाढीच्या अवस्था कधी सुरू होतील व त्यांची वाढ त्या अवस्थेत कशाप्रकारे होईल याचा अंदाज लावता येतो.त्यानुसार फवारणीद्वारे कोणते पोषक उत्पादन व विद्राव्य खत कधी वापरावे हे ठरवता येते व त्यानुसार त्याला त्या फवारणीमद्धे सामील केले जाते.
✅त्यानंतर रोपांच्या वाढीच्या अवस्था अंदाज आल्यामुळे तसेच त्याचा आणि वातावरणाचा अभ्यास करून कोणत्या किडी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्या अवस्थेत होऊ शकतो याचा अंदाज लावता येतो व त्यानुसार कोणत्या फवारणी मध्ये कोणते किटकनाशक,बुरशीनाशक उत्पादन कधी वापरावे हे ठरवता येते.
✅वातावरणाचा अभ्यास करून दोन फवारणीमधील अंतर किती ठेवावे हे ठरवणे सोपे जाते.जर वातावरण खराब असेल तर दोन फवारणीमधील अंतर कमी ठेवावे व जर वातावरण चांगले असेल तर दोन फवारणीमधील अंतर जास्त ठेवावे.
✅वातावरणाचा अभ्यास केल्यामुळे रोपांच्यावर नैसर्गिक व जैविक ताण कधी येऊ शकतो व त्या ताणामधून रोपांना बाहेर काढण्यासाठी कोणत्या उत्पादनाचा वापर कधी करावा हे ठरविता येते व ते सेट करता येते.
✅तसेच फवारणी नियोजन करताना बुरशीनाशकांचा,कीटकनाशकांचा वापर व्यवस्थित केला जावा व त्यांच्या विरोधात किडी किंवा बुरशी प्रतिविरोध तयार करू नयेत म्हणून बुरशीनाशकांचा व कीटकनाशकांच्या गटांचा अभ्यास करून त्यांचा वापर कधी कोणत्या उत्पादनासोबत करायचा हे ठरविले जाते.
अशाप्रकारे वरील मुद्द्यांचा आधार घेऊन व अभ्यास करून प्रतिबंधात्मक फवारणी नियोजन केले जाते.
एकात्मिक फवारणी नियोजन
एकात्मिक फवारणी नियोजन बनवताना खालील मुद्द्यांच्या आधारे फवारणी नियोजन बनवले जाते.
✅सर्वप्रथम शेतकऱ्यांकडून प्लॉटचे फोटो, ज्यामध्ये चांगला रोपांचे फोटो, प्लॉटमध्ये अडचणींचे फोटो, तसेच लागवड दिनांक, जलसिंचन प्रकार, लागवड प्रकार, शेतामध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती, मागील फवारणी याची माहिती घेतली जाते.
✅माहिती मिळाल्यानंतर फोटोंचे निरीक्षण व विश्लेषण करून रोपांवर असणारा बुरशीजन्य व किडींचा प्रादुर्भाव ओळखला जातो. त्यानंतर रोपांची वाढीची अवस्था, वातावरण व मागील फवारणी यांचा अभ्यास करून कोणत्या फवारणीमध्ये कोणते बुरशीनाशक कीटकनाशक कधी वापरावे हे ठरविले जाते.
✅रोपांच्या वाढीची अवस्था, मातीची गुणवत्ता यानुसार रोपांची वाढ कशी असायला हवी व कशी आहे याची तुलना करून पोषक उत्पादने व फवारणी खते कधी व कोणत्या फवारणीमध्ये वापरायची हे ठरवले जाते.
✅प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी कोणत्या उत्पादनाचा वापर कधी करावा हे ठरविले जाते.
✅प्रादुर्भाव नियंत्रण मिळाल्यानंतर पुढे वातावरणाचा अभ्यास व वाढीची अवस्था लक्षात घेऊन कोणत्या बुरशीजन्य रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव होईल याचा अंदाज लावून व मागील बुरशीनाशक, कीटकनाशक व इतर पोषक उत्पादनांचा वापर यांचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक फवारणी नियोजन बनवले जाते.
अशाप्रकारे वरील मुद्द्यांचा आधार घेऊन व विचार करून नियंत्रणात्मक फवारणी नियोजन बनवले जाते.