कांदा काढणी योग्य झाला आहे हे कसे ओळखावे?
कांदा काढणी योग्य झाला आहे हे ओळखण्यासाठी खालील मुद्द्यांचा आधार घ्यावा.
✅कांदा ज्या बियाण्याची लागवड केली आहे ते बियाणे लागवडीनंतर किती दिवसांनी काढणी योग्य घेते याची माहिती घ्यावी, जेणेकरून आपणास लागवडीनंतर काढणी कालावधी कधी येईल हे लक्षात येते .
✅ज्यावेळेस शेतातील कांद्याच्या 70% पाती या मानेतून वागतात व वरुन पिवळ्या पडतात त्यावेळेस समजावे कि कांदा काढणीसाठी आला आहे.
✅कांद्याच्या बियाण्यानुसार त्याचे वजन किती होते व त्यास रंग कसा येतो त्याची माहिती घेऊन आपल्या शेतातील कांद्याला ते वजन आले आहे व रंग आला आहे का ते पहावे. जर रंग व वजन आले असेल तर तो कांदा काढणीसाठी आला असेल असे समजावे. पाती वरुन पिवळ्या पडल्यानंतर कांदा उपटल्यास कांद्याची मुळे वाळून चालली असतील तर असा कांदा काढणीयोग्य झाला आहे असे समजावे.
✅जो कांदा काढणीयोग्य झाला आहे त्याची बाहेरील पत्ती सुटायला लागते.
✅कांदा हा काढण्यासाठी सर्वसाधारण 130 ते 140 दिवसात येतो. हा कालावधी बियाणे वाढ, वातावरण,मातीचा प्रकार, जलसिंचन प्रकार, खत नियोजन, फवारणी नियोजन यावरून कमी जास्त होऊ शकतो.
वरील मुद्द्यांचा आधार व माहिती घेऊन आपला कांदा काढणीयोग्य झाला आहे का ते ओळखावे.