Crop: कांदा | Topic: C.कांदा पिकातील खत नियोजन

कांदा रोप लागवडीपूर्वी करायचे खत नियोजन. 

कांदा रोपांच्या वाढीसाठी खालील प्रमाणात मुख्य दुय्यम व प्रमुख सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.

  • नायट्रोजन – 56 kg – 68 kg प्रति एकर 
  • फॉस्फरस – 24 kg ते 28 kg प्रति एकर 
  • पोटॅश – 32 kg ते 40 kg प्रति एकर 
  • कॅल्शियम – 12 kg ते 20 kg प्रति एकर 
  • मॅग्नेशियम – 4 kg ते 6 kg प्रति एकर 
  • सल्फर – 10 kg ते 12 kg प्रति एकर 
  •  Zinc – 1 ते 2.2  kg प्रति एकर 
  • फेरस – 1.6 ते 2.5 kg प्रति एकर 
  • बोरॉन – 0.5 kg ते 1 kg प्रति एकर 

कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी वरील अन्नद्रव्यांमधील 40%अन्नद्रव्ये द्यायची आहेत. त्यासाठी लागवडीपूर्वीच्या खत नियोजनात खालील खते टाकावीत. परंतु फॉस्फरस हा या अवस्थेत 70% द्यावा. तसेच यामध्ये कोणतीही सूक्ष्म अन्नद्रव्ये घेऊ नयेत. 

  •  Yara Mila Complex –  12:11:18 – 50 kg प्रति एकर 
  •  Urea – 50 kg प्रति एकर 
  •  DAP 18:46:00 – 50 kg प्रति एकर 
  •  ICL Polysulphate –  25 kg प्रति एकर 
  •  Mop –  50 kg प्रति एकर 

वरील खतांमधून पिकास खालील अन्नद्रव्ये मिळतील. 

  • नायट्रोजन – 38 kg प्रति एकर 
  • फॉस्फरस – 28.5 kg प्रति एकर 
  • पोटॅश – 36.5 kg प्रति एकर 
  • कॅल्शियम – 4.2 kg प्रति एकर 
  • मॅग्नेशियम – 1.5 kg प्रति एकर 
  • सल्फर – 12 kg प्रति एकर 

वरील अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे रोपांची रोप रुजण्याच्या अवस्थेत पांढऱ्या मुळांची वाढ तंतुमय होते.नवीन पाती फुटतात व रोपे सेट होतात,तसेच रोपवाढीच्या अवस्थेत वरील अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होते,नवीन पती निघतात,पाती हिरव्यागार होतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.