कांदा पिकात भांगलणी कधी व कशासाठी करावी?
कांदा पिकात भांगलणी कधी करावी?
✅कांदा पिकामध्ये तणनाशक फवारणी ही रोप लागवडीनंतर 20-25 दिवसांनी केली तर भांगलणी/ निंदणी रोपलागवडीनंतर 45-50 दिवसांनी करावी.
✅जर तणनाशक फवारणी ही रोपलागवडीनंतर 20-25 दिवसांनी केली नसेल किंवा तणनाशक फवारणी करणार नसाल तर भांगलणी ही रोप लागवडीनंतर 30-35 दिवसांच्या दरम्यान करावी.
भांगलणी कशासाठी करावी?
✅भांगलणी करण्याचा मुख्य उद्देश हा पिकांना स्पर्धा होणाऱ्या तणांना काढून शेताच्या बाहेर टाकून देणे हा आहे. ज्यामुळे पिकांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
✅भांगलणी केल्यामुळे जमिनीचा भुसभुशीतपणा वाढतो, ज्यामुळे जमिनीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, त्यामुळे पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते आणि मुळांद्वारे चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य शोषण होते. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होते.
✅भांगलणी करून तण काढल्यामुळे त्या तणांद्वारे पसरणाऱ्या किडींवर नियंत्रण मिळते व रोपांची निरोगी वाढ होते.
✅भांगलणी केल्यामुळे जमीन लवकर कोरडी होते व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
✅भांगलणी केल्यामुळे जिवाणूंची कार्यक्षमता वाढते व अन्नद्रव्य विघटन चांगल्या प्रकारे होऊन मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते.