कांदा पिकात खत नियोजन करताना कोणती काळजी घ्यावी?
कांदा पिकात खत नियोजन करताना खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
✅लागवडीपूर्वी जो बेसळ डोस टाकायचा आहे तो मशागत करताना टाकावा, जेणेकरून तो माती आड होईल व मातीमध्ये त्याचे लवकर विघटन होईल व ते लवकर उपलब्ध होईल.ज्यामुळे रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर लगेच त्यांचे शोषण रोपांद्वारे केले जाईल व रोपे सेट होण्यास मदत होईल.
✅लागवडीनंतरचा बेसळ डोस टाकताना रोपांवर धुके पडल्यामुळे जो ओलावा असतो, त्यावेळी खत टाकू नये. जर अशावेळी बेसळ डोस टाकला तर खतांचे कण पातींना चिटकून राहतात व पाती त्या जागी जळतात, परिणामी त्यातून बुरशीचा प्रादुर्भाव होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
✅लागवडीनंतरचा बेसळ डोस टाकल्यानंतर पाणी द्यावे. जेणेकरून त्या बेसळ डोसमुळे रोपांवर ताण येणार नाही. तसेच पाणी दिल्यामुळे तो बेसळ डोस विरघळेल व कमी कालावधीमध्ये रोपांना लागू होईल व परिणाम लवकर दिसून येतील.
✅लागवडीनंतरचा बेसळ डोस टाकताना वातावरणाचा अंदाज घेऊन खत टाकावे. वातावरणामध्ये पावसाची शक्यता असेल तर त्यावेळेस खत टाकू नये. खत टाकताना संपूर्ण शेतात एकसारखे पडेल या हिशोबाने मोजणी करून पातळ हाताने पसरट खत टाकावे.
अशा प्रकारे कांदा पिकात खत नियोजन करताना काळजी घ्यावी.