कांदा रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी करायचे खत नियोजन
✅कांदा रोपांच्या वाढीसाठी खालील प्रमाणात मुख्य,दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.
- नायट्रोजन – 56 kg – 68 kg प्रति एकर
- फॉस्फरस – 24 kg ते 28 kg प्रति एकर
- पोटॅश – 32 kg ते 40 kg प्रति एकर
- कॅल्शियम – 12 kg ते 20 kg प्रति एकर
- मॅग्नेशियम – 4 kg ते 6 kg प्रति एकर
- सल्फर – 10 kg ते 12 kg प्रति एकर
- Zinc – 1 ते 2.2 kg प्रति एकर
- फेरस – 1.6 ते 2.5 kg प्रति एकर
- बोरॉन – 0.5 kg ते 1 kg प्रति एकर
✅कांदा रोप लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी वरील अन्नद्रव्यापैकी 30% अन्नद्रव्ये खतांद्वारे जमिनीतून द्यावीत, त्यासाठी लागवडीनंतर 30 दिवसांनी खालील खत नियोजन करावे.
- 10:26:26 – 50 kg प्रति एकर
- MOP – 50 kg प्रति एकर
- k-Mag – 36.5 kg प्रति एकर
- DAP – 18:46:00 – 50 kg प्रति एकर
✅फॉस्फरस हा जमिनीतून कमी प्रमाणात शोषण होतो, त्यामुळे त्याचे प्रमाण जास्त द्यावे. वरील खतांमधून पिकास खालील अन्नद्रव्ये मिळतील.
- नायट्रोजन – 14 kg प्रति एकर
- फॉस्फरस – 36 kg प्रति एकर
- पोटॅश – 56 kg प्रति एकर
- मॅग्नेशियम – 3.5 kg प्रति एकर
- सल्फर – 6.5 kg प्रति एकर
✅वरील अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे रोप वाढीच्या अवस्थेत रोपांना नवीन पाती निघतात,पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. मान जाड होण्यास सुरुवात होते,पाती हिरव्यागार होतात.