Dantotsu

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव

Sumitomo Chemical India
उत्पादनाचे नाव
Dantotsu
वापरण्याचा प्रकार
फवारणी ,ठिबक

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक

Clothianidin 50% WDG
रासायनिक गट
Neonicotinoid (IRAC 4A)
कीटकनाशकाचा प्रकार
आंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Dantotsu वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Category: Tag: Brand:

Description

रासायनिक घटक

▸यामध्ये क्लोथॅंडीन 50% डब्ल्यू.डी.जी. (Clothianidin 50% WDG) हा रासायनिक घटक असतो.

रासायनिक गट

▸निओनिकोटिनॉइड (Neonicotinoid) — निकोटिनिक ऍसिटाइलकोलिन रिसेप्टर सक्रिय करणारा समूह.

कीटकनाशक प्रकार व प्रवेश मार्ग

▸ प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)
▸ फवारणीद्वारे वापरल्या नंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे वनस्पतीत आतमध्ये शोषले जाते.
▸ जमिनीतून (आळवणी,ठिबक) दिल्यानंतर मुळांच्याद्वारे आत मध्ये शोषले जाते.
▸ आत मध्ये पोहचल्यानंतर झायलम पेशींच्या मदतीने वनस्पतींच्या सर्व भागांत प्रामुख्याने पाने व कोवळ्या शेंडयाच्या भागांमध्ये पोहचते.
▸ पाचणमार्गे : रसशोषक किडींनी पानांचा रस घेताना पर्णरसाबरोबर हे किटकनाशक शरीरात प्रवेश करते.
▸ त्वचा मार्गे : ज्यावेळेस हे किटकनाशक फवारणी करताना थेट किडीच्या शरीरावर पडले तर ते त्वचेमधून किडीच्या शरीरात प्रवेश करते.

कार्यपद्धती (Mode of Action)

▸क्लोथॅंडीन हे किटकनाशक किडीच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर किडीच्या मज्जासंस्थेतील/चेतासंस्थेतील निकोटिनिक रिसेप्टर्सवर कार्य करून ऍसिटाइलकोलिन संदेशवाहक द्रव्यांचा संदेश प्रवाह विस्कळीत करते. परिणामी किडींच्या चेतासंस्थामधील संदेशवहन विस्कळीत होते ज्यामुळे किडींची हालचाल बंद होते,अन्न घेणे थांबते आणि काही वेळानंतर मृत्यू होतो. अशाप्रकारे ही किटकनाशक किडींवर नियंत्रण मिळवते.

वापरण्याची पद्धत

▸ फवारणी (Foliar Spray)
▸ आळवणी (Soil Drench)
▸ ठिबक (Drip Irrigation)

शिफारस केलेली पिके व लक्ष्यित किडी

Dantotsu • Clothianidin 50% WDG

भात (Paddy)
लक्षित कीड: ब्राऊन प्लांट हॉपर (BPH)
प्रमाण: 12–16 ग्रॅम/एकर 
वापरण्याची वेळ: सुरुवातीच्या प्रादुर्भावाच्या वेळी
वापरण्याची पद्धत: 200 लिटर पाण्यात मिसळून रोपलावणीनंतर 45–60 दिवसांनी फवारणी

चहा (Tea)
लक्षित कीड: टी मस्किटो बग
प्रमाण: 24–48 ग्रॅम/एकर 
वापरण्याची वेळ: सुरुवातीच्या प्रादुर्भावाच्या वेळी
वापरण्याची पद्धत: 200 लिटर पाण्यात मिसळून फुलोऱ्याच्या अवस्थेत फवारणी

कापूस (Cotton)
लक्षित कीड: मावा, जासिड, पांढरी माशी, थ्रिप्स
प्रमाण: 12–16 ग्रॅम/एकर 
वापरण्याची वेळ: सुरुवातीच्या प्रादुर्भावाच्या वेळी
वापरण्याची पद्धत: उगवणीनंतर 7 दिवसांच्या आत मातीमध्ये ड्रेंचिंग

ऊस (Sugarcane)
लक्षित कीड: दीमक व शूट बोरर
प्रमाण: 100 ग्रॅम/एकर 
वापरण्याची वेळ: पेरणीच्या वेळी
वापरण्याची पद्धत: 400 लिटर पाण्यात मिसळून मातीमध्ये ड्रेंचिंग

द्राक्ष (Grapes)
लक्षित कीड: मिलीबग, थ्रिप्स, जासिड
प्रमाण: 200 ग्रॅम/एकर 
वापरण्याची वेळ: सुरुवातीच्या प्रादुर्भावाच्या वेळी
वापरण्याची पद्धत: 400 लिटर पाण्यात मिसळून मातीमध्ये ड्रेंचिंग

किडीच्या अवस्थांवर परिणाम

▸अंडी फुटल्यानंतरचे निंफ तसेच प्रौढ अवस्थेतील रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण.

वैशिष्ट्ये व फायदे

▸ जलद परिणाम + दीर्घकालीन संरक्षण
▸ संपूर्ण आंतरप्रवाही क्रिया
▸ कमी डोसमध्ये प्रभावी
▸ फवारणी/आळवणी/ठिबक सर्व पद्धतींसाठी योग्य
▸ हवामान बदलांमुळे कार्यक्षमता कमी होत नाही
▸ थ्रिप्स, व्हाइटफ्लाय, मावा, तुडतुडेवर विशेष प्रभावी

SEO keywords: Actara कीटकनाशक, थायमेथोक्झाम, रसशोषक किडी नियंत्रण, aphids thrips control, Syngenta, systemic insecticide

टीप: स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. PPE वापरा व निर्देशांचे पालन करा.