Description
रासायनिक घटक
▸ यामध्ये थायोफेनेट मिथाइल 70% डब्ल्यू.पी.(Thiophanate Methyl 70% WP) Wettable Powder हा रासायनिक घटक असतो.
रासायनिक गट
▸ थायोफेनेट्स (Thiophanates),मिथाइल बेंझिमिडाझोल कार्बामेट (MBC)
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)
▸ आंतरप्रवाही असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आत मध्ये शोषले जाते व वनस्पतींच्या झायलम पेशींच्याद्वारे सर्व भागात पोहचते.
▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक
▸बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास प्रतिबंधात्मक (Preventive) आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीस उपचारात्मक (Curative) नियंत्रण देते.
▸ टिप : Thiophanate Methyl मध्ये eradicant action नसते.म्हणजेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढल्यानंतर हा fungicide fungus पूर्ण नष्ट करू शकत नाही.
कार्यपद्धती (Mode of Action)
▸थायोफेनेट मिथाइल (Thiophanate-methyl) हे कोशिकाविभाजन अवरोधक (Cell Division Inhibitor) गटातील बुरशीनाशक आहे. आहे.
▸ हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशींमध्ये β-ट्युब्युलिन (β-tubulin) प्रथिनाशी संलग्न होऊन मायटोसिस (कोशिकाविभाजन) प्रक्रिया थांबवते. त्यामुळे मायक्रोट्युब्युल्स तयार होत नाहीत, पेशी विभाजन होत नाही आणि बुरशीची वाढ व प्रसार थांबतो. परिणामी बुरशी हळूहळू नष्ट होते.
▸ या गटाला मिथाइल बेंझिमिडाझोल कार्बामेट (MBC) फंगिसाइड असे म्हणतात.
(FRAC Group: 1)
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी,आळवणी,ठिबक,बीजप्रक्रिया
Thiophanate Methyl 70% WP पीक व लक्षित बुरशीजन्य रोग
| पिक | लक्ष्यित बुरशीजन्य रोग |
|---|---|
| कांदा | ▸ जांभळा करपा ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ मुळकुज ▸ कंदकुज |
| कोबी फुलकोबी ब्रोकोली रेड कॅबेज |
▸अल्टरनारिया पानांवरील टिपके ▸ सेप्टोरिया पानांवरील ठिपके ▸ फुजारियम रोपमर ▸भुरी |
| बटाटा | ▸ लवकर येणारा करपा ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ कोरडी कंदकुज ▸ ब्लॅक स्कर्फ ▸ उगवणीतील कंदकुज |
| काकडी कारले दोडका दुधी भोपळा घोसवळे |
▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ फुजारियम रोपमर ▸भुरी |
| आले हळद |
▸ रायझोम कंदकुज ▸अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ कंदकुज |
| टोमॅटो | ▸फुजारियम रोपमर ▸अँथ्रॅकोज करपा ▸ लवकर येणारा करपा ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸भुरी |
| मिरची ढोबळी मिरची |
▸ अँथ्रॅकोज करपा ▸ फुजारियम रोपमर ▸अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸कॉलर रॉट (बुडकुज) ▸भुरी |
| वांगे | ▸ फुजारियम रोपमर ▸अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ कॉलर रॉट (बुडकुज) ▸भुरी |
| भेंडी | ▸ फुजारियम रोपमर ▸अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸अँथ्रॅकोज करपा ▸भुरी |
| गवार | ▸फुजारियम रोपमर ▸अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ कॉलर रॉट (बुडकुज) ▸भुरी |
| कापूस | ▸ फुजारियम रोपमर ▸अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸बियाणे कुज ▸ कॉलर रॉट |
| झेंडू | ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ फुजारियम मर ▸फुलकुज |
| शेवंती | ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ फुजारियम मर ▸ फुलकुज |
| ऊस | ▸ कांडी कुज ▸ लाल मर |
| भुईमूग | ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ उशिरा येणारे ठिपके ▸ मुळकुज ▸ बियाणे कुज |
| सोयाबीन | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ शेंगकुज ▸ सेप्टोरीया तपकिरी ठिपके ▸ फुजारियम मुळकुज ▸ फुजारियम बियाणे कुज |
| वाल घेवडा | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके ▸ सारकोस्पोरा पोरा पानांवरील ठिपके ▸ फुजारियम मुळकुज |
| मटकी मुग चवळी उडीद |
▸अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ सारकोस्पोरा ठिपके ▸ फुजारियम मुळकुज ▸ फुजारियम बियाणे कुज |
| हरभरा | ▸ फुजारियम मुळकुज ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ बियाणे कुज |
| वाटाणा | ▸अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ सारकोस्पोरा ठिपके ▸ बियाणे कुज ▸भुरी |
| कलिंगड खरबूज |
▸अँथ्रॅकोज करपा ▸अल्टरनेरीया पानांवरील ठिपके ▸सारकोस्पोरा ठिपके ▸फुजारियम रोपकुज ▸ कॉलर रॉट ▸भुरी |
| भात | ▸तपकिरे ठिपके ▸रोपकुज ▸कणीस कुज ▸शीत रॉट |
| गहू | ▸सरकोस्पोरा ठिपके ▸सेप्टोरीया ठिपके ▸पानांवरील ठिपके ▸अल्टरनेरीया ठिपके ▸फुजारियम मुळकुज ▸उगवणीतील कुज |
| मका | ▸पानांवरील ठिपके ▸फुजारियम खोडकुज ▸फुजारियम मुळकुज |
| फ्रेंच बिन्स | ▸अँथ्रॅकोज करपा ▸सारकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸फुजारियम मुळकुज ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸भुरी |
Thiophanate Methyl 70% WP – बुरशी व लक्षणे ओळख चार्ट
| बुरशीचे नाव (Scientific Name) |
त्यामुळे होणारा रोग (Disease Name) |
लक्षणे (Symptoms) |
|---|---|---|
| कोलेटोट्रिकम (Colletotrichum) |
अँथ्रॅकोज / करपा (Anthracnose) | पानांवर, फांद्यांवर किंवा फळांवर काळे गोलाकार डाग पडतात. फळे सडतात. |
| फुजारियम (Fusarium) |
मर रोग / मूळकुज (Wilt / Root Rot) |
झाडाची अन्नवाहिनी (Xylem) ब्लॉक होते, झाड अचानक कोमेजते आणि वाळते. |
| सरकोस्पोरा (Cercospora) |
पानांवरील ठिपके (Leaf Spot) |
पानांवर तपकिरी किंवा राखाडी रंगाचे ठिपके पडतात. |
| ओडिअम / इरसिफी (Oidium / Erysiphe) |
भुरी (Powdery Mildew) | पानांवर, कळ्यांवर किंवा फळांवर पांढऱ्या पावडरसारखी बुरशी वाढते. |
| रायझोक्टोनिया (Rhizoctonia) | खोडकुज / कंदकुज / ब्लॅक स्कर्फ | जमिनीलगतचे खोड कुजते किंवा बटाट्यावर काळे फोड (Black Scurf) येतात. रोपे कोलमडतात. |
| बोट्रायटीस (Botrytis) |
ग्रे मोल्ड / फळकुज (Gray Mold) |
फळांवर राखाडी रंगाची बुरशी येते आणि फळ मऊ होऊन सडते. |
| अल्टरनारिया (Alternaria) |
पानांवरील ठिपके (Early Blight) |
पानांवर वलयांकित काळे/तपकिरी ठिपके (Target board spots) दिसतात. |
| सेप्टोरिया (Septoria) |
पानांवरील ठिपके (Leaf Spot) |
पानांवर लहान, गोल, राखाडी किंवा पांढऱ्या केंद्राचे ठिपके पडतात. |
| स्क्लेरोटिनिया (Sclerotinia) | पांढरी बुरशी / खोडकुज (White Mold) | खोडावर पांढरी कापसासारखी बुरशी वाढते आणि खोड पोकळ होते. |
| फोमोप्सिस (Phomopsis) |
फळकुज / करपा (Fruit Rot / Blight) |
वांग्याची फळे देठाकडून सडतात. द्राक्षाच्या काडीवर काळे डाग पडतात. |
| पिरिक्युलारिया (Pyricularia) | करपा / ब्लास्ट (Blast) |
पानांवर ‘डोळ्याच्या आकाराचे’ (Spindle shaped) तपकिरी ठिपके पडतात. मानेवर बुरशी येऊन ओंबी मोडते. |
| व्हर्टिसिलियम (Verticillium) | व्हर्टिसिलियम मर (Verticillium Wilt) |
फुजारियमसारखेच लक्षणे. झाड अर्धे किंवा पूर्ण उभे वाळते. |
| पेस्टालोटिया (Pestalotia) |
देवी रोग / ठिपके (Canker / Spot) |
फळांवर किंवा पानांवर काळे खरबडीत ठिपके किंवा खड्डे पडतात. |
प्रमाण
▸ फवारणीसाठी : 1.5 ते 2 ग्रॅम प्रती लीटर
▸आळवणीसाठी : 1.5 ते 2 ग्रॅम प्रती लीटर
▸ ठिबकसाठी : 500 ग्रॅम प्रती एकर
मुख्य वैशिष्ट्ये:
▸ विस्तृत श्रेणीतील नियंत्रण (Broad Spectrum Control) – करपा (Anthracnose), भुरी (Powdery Mildew), पानावरील ठिपके (Leaf Spot), फळकूज (Fruit Rot), मर रोग (Wilt) यांसारख्या विविध बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण.
▸ आंतरप्रवाही क्रिया (Systemic Action) – हे पूर्णपणे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. हे पानांवाटे आणि मुळांवाटे शोषले जाते आणि संपूर्ण पिकात पसरून रोगाचा सामना करते.
▸ दुहेरी कार्यपद्धती (Preventive & Curative) – हे प्रतिबंधात्मक (रोग येण्याआधी) आणि उपचारात्मक (रोग आल्यानंतर) अशा दोन्ही प्रकारे उत्कृष्ट काम करते.
▸ पिकाचा आरोग्य परिणाम (Phytotonic Effect) – याच्या फवारणीमुळे पिकावर हिरवेपणा येतो (Greening Effect) आणि पांढऱ्या मुळांच्या वाढीस चालना मिळते, ज्यामुळे पिक तजेलदार दिसते.
▸ WP स्वरूप (Wettable Powder) – हे पाण्यात मिसळणारी पावडर (WP) स्वरूपात उपलब्ध आहे, जे फवारणी आणि आळवणी (Drenching) साठी वापरणे सोपे आहे.
▸ दीर्घकाळ टिकणारे संरक्षण – आंतरप्रवाही असल्यामुळे हे पिकाला बुरशीपासून दीर्घकाळ संरक्षण देते.
🎥 कृषिविद्या व्हिडिओ
खालील व्हिडिओमध्ये उत्पादनाचा वापर दाखवला आहे 👇
Sumitomo Buddi ला पर्याय म्हणून खालील उत्पादनांचा वापर करू शकता.
| उत्पादन | फोटो | 200 लि. साठी पॅकिंग | किंमत | खरेदी |
|---|---|---|---|---|
| Adama Topmast | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| TATA Themifit | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| IIL Prism | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Godrej Milduvip | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Coromondal Hexatop |
![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Bharat Certis Topsin |
![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Willwood Theme |
![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| JU Top M | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Tropical Tagsin M | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
शेतकऱ्यांचे Sumitomo Buddi बद्दल सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न १: Buddi बुरशीनाशक आंतरप्रवाही की स्पर्शजन्य आहे?
उत्तर: Buddi हे संपूर्णपणे आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक आहे.
प्रश्न २: Buddi कोणत्या रासायनिक गटातील आहे?
उत्तर: हे Thiophanates रासायनिक गटातील बुरशीनाशक आहे.
प्रश्न ३: Buddi systemic आहे का?
उत्तर: हो, हे Systemic आहे. हे झाडाच्या मुळांद्वारे आणि पानांद्वारे शोषले जाते आणि पूर्ण झाडात पसरते.
प्रश्न ४: Buddi मध्ये preventive आणि curative गुण आहेत का?
उत्तर: हो. हे रोग येण्याआधी (Preventive) आणि रोग आल्यानंतर (Curative) अशा दोन्ही प्रकारे काम करते.
प्रश्न ५: Buddi कोणत्या रोगांवर जास्त परिणामकारक आहे?
उत्तर: करपा (Anthracnose), भुरी (Powdery mildew), पानावरील ठिपके (Leaf spot), मर रोग (Wilt) आणि फळकूज (Fruit rot).
प्रश्न ६: Buddi आणि Bavistin मध्ये काय फरक आहे?
उत्तर: Bavistin (Carbendazim) आणि Buddi (Thiophanate Methyl) एकाच गटातील आहेत. Buddi झाडात गेल्यावर त्याचे रूपांतर Carbendazim मध्ये होते, त्यामुळे हे Bavistin पेक्षा थोड्या व्यापक श्रेणीत (Broad Spectrum) काम करते.
प्रश्न ७: Buddi ला पर्याय काय आहे?
उत्तर: बाजारामधील इतर Thiophanate Methyl घटक असलेली औषधे (उदा. हेक्झासटॉप) किंवा रोगाच्या तीव्रतेनुसार Saaf (Carbendazim + Mancozeb) वापरू शकता.
प्रश्न ८: Buddi भुरीवर (Powdery Mildew) किती प्रभावी आहे?
उत्तर: भुरी रोगावर Buddi अत्यंत प्रभावी आहे, विशेषतः द्राक्ष, मिरची आणि भाजीपाला पिकांमध्ये.
प्रश्न ९: Buddi करपा (Anthracnose) नियंत्रणासाठी वापरावा का?
उत्तर: हो, करपा (Anthracnose) नियंत्रणासाठी Buddi हे एक सर्वोत्तम औषध मानले जाते.
प्रश्न १०: Buddi मर रोगावर (Wilt/Root rot) चालतो का?
उत्तर: हो, मर रोग आणि मुळकुजीसाठी Buddi ची आळवणी (Drenching) करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे.
प्रश्न ११: Buddi फळकूजवर (Fruit Rot) मदत करतो का?
उत्तर: हो, फळांची सडणे किंवा काढणीपश्चात होणारी बुरशी (Post-harvest diseases) रोखण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.
प्रश्न १२: Buddi पानांवरील ठिपके (Leaf Spot/Cercospora) वर किती परिणामकारक आहे?
उत्तर: पानांवरील ठिपके (उदा. भुईमूग टिक्का रोग किंवा डाळिंबावरील ठिपके) यावर हे उत्तम नियंत्रण देते.
प्रश्न १३: Buddi डाय बॅक (Die-back) नियंत्रणासाठी वापरता येतो का?
उत्तर: हो, मिरची आणि फळझाडांमधील शेंडे वाळणे (Die-back) यावर हे प्रभावी आहे.
प्रश्न १४: पानांवर डाग आले असतील तर Buddi द्यावा का?
उत्तर: हो, जर डाग बुरशीजन्य असतील तर Buddi रोगाचा प्रसार थांबवते (Curative action).
प्रश्न १५: Buddi फवारणीसाठी किती ग्रॅम प्रति लिटर वापरावे?
उत्तर: फवारणीसाठी १.५ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी (पिकानुसार कमी जास्त होऊ शकते).
प्रश्न १६: एका एकरासाठी Buddi किती लागते?
उत्तर: फवारणीसाठी साधारण ३०० ग्रॅम ते ४०० ग्रॅम प्रति एकर आणि ड्रीपसाठी ५०० ग्रॅम प्रति एकर.
प्रश्न १७: Buddi किती दिवसांनी पुन्हा फवारावे?
उत्तर: साधारणपणे १२-१५ दिवसांनी दुसरी फवारणी घेऊ शकता.
प्रश्न १८: रोग फार वाढला असेल तर डोस किती ठेवावा?
उत्तर: डोस वाढवू नका (जास्तीत जास्त २ ग्रॅम/लिटर), त्याऐवजी Buddi सोबत M-45 किंवा Z-78 सारखे स्पर्शजन्य बुरशीनाशक एकत्र करून फवारा.
प्रश्न १९: पावसाळ्यात Buddi वापरू शकतो का?
उत्तर: हो, हे आंतरप्रवाही (Systemic) असल्याने पावसाळ्यात फवारणीसाठी योग्य आहे, कारण ते पानात शोषले जाते.
प्रश्न २०: फवारल्यानंतर पाऊस आला तर परिणाम कमी होणार का?
उत्तर: जर फवारणीनंतर २-३ तास पाऊस आला नाही, तर औषध झाडात पूर्ण शोषले जाते आणि उत्तम रिझल्ट मिळतो.
प्रश्न २१: फवारणीस योग्य वेळ कोणती?
उत्तर: सकाळी दव वाळल्यानंतर किंवा सायंकाळी ४ नंतर.
प्रश्न २२: टोमॅटोमध्ये Buddi कोणत्या रोगावर देतात?
उत्तर: टोमॅटोमधील पानावरील ठिपके, फळकूज आणि मर रोगाच्या (Wilt) आळवणीसाठी वापरतात.
प्रश्न २३: मिरचीमध्ये मर रोग (Wilt) आहे; Buddi वापरू शकतो का?
उत्तर: हो, मिरचीमध्ये मर रोगासाठी Buddi ची आळवणी (Drenching) अत्यंत गुणकारी आहे.
प्रश्न २४: द्राक्षामध्ये Buddi कधी वापरतात?
उत्तर: द्राक्षामध्ये पोंगा स्टेजला, फ्लॉवरिंगपूर्वी आणि मणी सेट झाल्यावर भुरी आणि करपा नियंत्रणासाठी वापरतात.
प्रश्न २५: कांद्यामध्ये Buddi वापरावे का?
उत्तर: हो, कांद्यामध्ये मान मुरगळणे किंवा पीळ पडणे (Twister disease/Anthracnose) यावर Buddi खूप चांगले काम करते.
प्रश्न २६: भातात (Paddy) Buddi चालते का?
उत्तर: हो, भातामधील Blast (करपा) रोगावर हे खूप प्रभावी आहे.
प्रश्न २७: सोयाबीन मध्ये Buddi कधी द्यायचा?
उत्तर: शेंगा भरण्याच्या अवस्थेत शेंगावरील करपा आणि दाणे खराब होऊ नयेत म्हणून वापरतात.
प्रश्न २८: Buddi सर्व पिकांसाठी सुरक्षित आहे का?
उत्तर: हो, शिफारस केलेल्या मात्रेत वापरल्यास हे पिकासाठी सुरक्षित आहे.
प्रश्न २९: Buddi कीटकनाशकांसोबत मिसळता येतो का?
उत्तर: हो, हे बहुतेक सर्व कीटकनाशकांसोबत (उदा. Imidacloprid, Chlorpyriphos) मिसळता येते.
प्रश्न ३०: Buddi विद्राव्य खतांसोबत (१९:१९:१९) देता येतो का?
उत्तर: हो, विद्राव्य खतांसोबत Buddi देता येते.
प्रश्न ३१: Buddi , Copper किंवा Sulphur सोबत मिसळू शकतो का?
उत्तर: नाही. Buddi हे Copper (उदा. बोर्डो मिश्रण, कॉपर ऑक्सिक्लोराईड) आणि Lime Sulphur सारख्या अल्कधर्मी (Alkaline) औषधांसोबत मिसळू नये.
प्रश्न ३२: Tank-mix करताना Buddi कधी टाकावे?
उत्तर: Buddi हे पावडर (WP) स्वरूपात असल्याने आधी थोडे पाणी घेऊन त्याची पेस्ट बनवा किंवा पूर्ण विरघळून घ्या आणि मगच टाकीत टाका.
प्रश्न ३३: Buddi ठिबक (Drip) किंवा आळवणी (Drenching) द्वारे देता येते का?
उत्तर: हो, नक्कीच. जमिनीतील बुरशी (Soil borne fungus) मारण्यासाठी Buddi ची आळवणी किंवा ड्रीपद्वारे वापर खूप फायदेशीर आहे.
प्रश्न ३४: Buddi मुळे पीक हिरवेगार होते का?
उत्तर: हो, याच्या फवारणीमुळे पिकात Phytotonic effect (हिरवेपणा) येतो आणि पाने तजेलदार दिसतात.
प्रश्न ३५: Buddi मुळे फुलगळ होते का?
उत्तर: नाही, शिफारस केलेल्या प्रमाणात वापरल्यास फुलगळ होत नाही, उलट फुलांचे फळात रूपांतर होण्यास मदत होते.
प्रश्न ३६: Buddi चा परिणाम किती दिवस टिकतो?
उत्तर: साधारणपणे १० ते १२ दिवस पिकाला संरक्षण मिळते.
प्रश्न ३७: PHI (Pre-harvest interval) किती दिवस आहे?
उत्तर: फवारणीनंतर साधारण ७ ते १० दिवस भाजीपाला किंवा फळे तोडू नयेत.
प्रश्न ३८: Buddi बीजप्रक्रियेसाठी (Seed Treatment) वापरता येते का?
उत्तर: हो, पेरणीपूर्वी बियाण्यांना चोळण्यासाठी (२-३ ग्रॅम प्रति किलो बियाणे) Buddi सर्वोत्तम आहे.
प्रश्न ३९: Buddi वापरल्यानंतर उत्पादन वाढते का?
उत्तर: रोग नियंत्रण झाल्यामुळे आणि पिकाची गुणवत्ता सुधारल्यामुळे उत्पादनात नक्कीच वाढ होते.
प्रश्न ४०: Resistance management कसे करावे?
उत्तर: सतत फक्त Buddi वापरू नका. अधूनमधून वेगळ्या गटातील बुरशीनाशके वापरा जेणेकरून बुरशीमध्ये प्रतिकारशक्ती तयार होणार नाही..
प्रश्न ४१: Buddi कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?
उत्तर: Buddi हे Sumitomo या कंपनीचे प्रसिद्ध उत्पादन आहे.
प्रश्न ४२: Buddi स्वस्त आहे की महाग?
उत्तर: हे मध्यम किमतीचे (Pocket friendly) आणि प्रभावी बुरशीनाशक आहे.
प्रश्न ४३: Buddi हे खूप जास्त बुरशी आल्यावर (Heavy Infestation) एकटे काम करेल का?
उत्तर: खूप जास्त प्रादुर्भाव असल्यास Buddi सोबत M-45 (Mancozeb) किंवा Chlorothalonil सारखे स्पर्शजन्य बुरशीनाशक एकत्र वापरल्यास जास्त चांगला रिझल्ट येतो.
प्रश्न ४४: Buddi पावडर स्वरूपात आहे की लिक्विड?
उत्तर: Buddi हे WP (Wettable Powder) स्वरूपात येते, जे पाण्यात सहज मिसळते.
आमच्याशी संपर्क करा.
📲 WhatsApp📞 कॉल
⭐ शेतकऱ्यांचे Buddi बद्दलचे खरे रिव्ह्यू
आमच्या शेतकऱ्यांनी वापरून दिलेले अनुभव – प्रभाव जाणून घ्या 👇
भुरी आली होती पण Galileo फवारणी दिल्यावर 3–4 दिवसात छान परिणाम दिसला. पानं healthy आणि चमकदार झाली.
पानांवर रिंग सारखे डाग आले होते. Galileo + एक contact fungicide दिल्यावर रोग वाढ थांबली. उत्पादनातही स्पष्ट फरक!
द्राक्ष बागेत powdery mildew वाढत होता. Galileo दिल्यावर fungal spread पूर्ण थांबला आणि पिकाचा shine खूप वाढला.
सोयाबीनमध्ये छोटे-छोटे ठिपके होते. Galileo दिल्यावर 3 दिवसात improvement दिसली आणि spread थांबला.
⭐ शेतकऱ्यांचे farmspot crop schedule वापरल्यानंतरच्या प्रतिक्रिया
“फार्मस्पॉटच्या मार्गदर्शनामुळे माझ्या टोमॅटो पिकात ३०% उत्पादन वाढ झाली. सल्ला अत्यंत उपयुक्त.”
“खातांची योग्य मोजमाप आणि फवारणी शेड्यूलने पिकांचे आरोग्य प्रचंड सुधारले.”
“उत्पादनात सुधारणा दिसली; उत्पादने आणि सल्ला दोन्ही विश्वासार्ह.”
Buddi बुरशीनाशक संबंधित फेसबूक पोस्ट
Buddi बुरशीनाशक संबंधित Instagram पोस्ट
Buddi बुरशीनाशक संबंधित ब्लॉग










