Description
रासायनिक घटक
▸ यामध्ये ॲझॉक्सिस्ट्रोबिन 23% एस.सी. (Azoxystrobin 23% SC Suspension Concentrate) हा रासायनिक घटक असतो.
रासायनिक गट
▸ स्ट्रोबिल्यूरिन (Strobilurins)
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही व ट्रान्सलॅमिनर (Systemic + Translaminar)
▸ आंतरप्रवाही असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आत मध्ये शोषले जाते व वनस्पतींच्या झायलम पेशींच्याद्वारे सर्व भागात पोहचते.
▸ ट्रान्सलॅमिनर असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर पानांच्या वरच्या भागाद्वारे शोषले जाते व पानांच्या खालच्या बाजूला झिरपते. व पानाच्या दोन्ही बाजूला बुरशीजन्य रोगापासून संरक्षण देते.
▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक
▸बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास प्रतिबंधात्मक (Preventive) आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीस उपचारात्मक (Curative) नियंत्रण देते.
▸ टिप : Azoxystrobin मध्ये eradicant action नसते.म्हणजेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढल्यानंतर हा fungicide fungus पूर्ण नष्ट करू शकत नाही.
कार्यपद्धती (Mode of Action)
▸ॲझॉक्सिस्ट्रोबिन हे श्वसनक्रिया अवरोधक (Respiration Inhibitor) गटातील आहे.
▸हे बुरशीनाशक बुरशीच्या मायटोकॉन्ड्रिया मधील श्वसनसाखळीत अडथळा आणते. परिणामी बुरशी च्या पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती होत नाही त्यामुळे पेशींना ऊर्जा (ATP) मिळत नाही आणि बुरशीचा नाश होतो. याला क्विनोन आउटसाइड इनहिबिटर (QoI) असेही म्हणतात.
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी (Foliar Spray)
Azoxystrobin 23% SC पीक व लक्षित बुरशीजन्य रोग
| पिक | लक्ष्यित बुरशीजन्य रोग |
|---|---|
| कांदा |
▸ जांभळा करपा |
| कोबी फुलकोबी ब्रोकोली रेड कॅबेज |
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके |
| बटाटा | ▸ लवकर येणारा करपा (Early blight) ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ उशीरा येणारा करपा (Late blight – early stage) |
| काकडी कारले दोडका दुधी भोपळा घोसवळे |
▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ डाऊनी मिल्ड्यू (early stage) ▸ भुरी (secondary control) |
| आले हळद |
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ पानांवरील करपा ▸ रायझोम रॉट (secondary / early stage) |
| टोमॅटो | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ लवकर येणारा करपा (Early blight) ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸ उशीरा येणारा करपा (Late blight – early stage) ▸ भुरी (secondary) |
| मिरची ढोबळी मिरची |
▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸ भुरी (secondary) |
| वांगे | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸ भुरी (secondary) |
| भेंडी | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके |
| गवार | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके |
| कापूस | ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ रस्ट (secondary control) |
| झेंडू | ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ ग्रे मोल्ड (Botrytis – early stage) |
| शेवंती | ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ ग्रे मोल्ड (Botrytis – early stage) |
| ऊस | ▸ पानांवरील ठिपके ▸ रस्ट (secondary) |
| भुईमूग | ▸ अर्ली लीफ स्पॉट ▸ लेट लीफ स्पॉट ▸ रस्ट (secondary control) |
| सोयाबीन | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ सेप्टोरिया तपकिरी ठिपके ▸ रस्ट (secondary) |
| वाल घेवडा | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके |
| मटकी मुग चवळी उडीद |
▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ रस्ट (secondary) |
| हरभरा | ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ अँथ्रॅकोज (secondary) |
| वाटाणा | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ भुरी (secondary) |
| कलिंगड खरबूज |
▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ डाऊनी मिल्ड्यू (early stage) ▸ भुरी (secondary) |
| भात | ▸ करपा / ब्लास्ट (secondary) ▸ तपकिरी ठिपके |
| गहू | ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ सेप्टोरिया ठिपके ▸ रस्ट (secondary) |
| मका |
▸ पानांवरील ठिपके |
| फ्रेंच बिन्स | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸ रस्ट (secondary) |
✅Azoxystrobin 23%SC – खालील बुरशी व त्यामुळे येणारे बुरशीजन्य रोग यावर नियंत्रण मिळवते.
पुढे स्लाइड करा👉
| बुरशीचे नाव (Scientific Name) | त्यामुळे होणारा रोग (Disease Name) |
|---|---|
| Colletotrichum spp. | अँथ्रॅकोज / करपा (Anthracnose) |
| Alternaria spp. | अर्ली ब्लाईट / पानांवरील ठिपके (Early Blight) |
| Cercospora spp. | पानांवरील ठिपके (Leaf Spot) |
| Oidium / Erysiphe spp. | भुरी (Powdery Mildew) |
| Botrytis cinerea | ग्रे मोल्ड / फुलकुज / फळकुज (Grey Mold) |
| Septoria spp. | सेप्टोरिया पानांवरील ठिपके (Septoria Leaf Spot) |
| Pestalotia spp. | देवी रोग / ठिपके (Pestalotiopsis) |
| Phomopsis spp. | फळकुज / करपा (Fruit Rot / Blight) |
| Pyricularia oryzae | करपा / ब्लास्ट (भात) (Rice Blast) |
❌ खालील बुरशीजन्य रोगांवर Azoxystrobin 23% SC प्रभावी नाही / मर्यादित आहे.त्यामुळे Azoxystrobin 23% SC वापरू नका.
पुढे स्लाइड करा👉
| बुरशीचे नाव (Scientific) | कारण / परिणाम (Reason) |
|---|---|
| Fusarium spp. | मातीजन्य रोग – QoI fungicide कमजोर आहे. |
| Rhizoctonia solani | खोडकुज / ब्लॅक स्कर्फ – परिणामकारक नाही. |
| Sclerotinia spp. | व्हाइट मोल्ड – स्वतंत्रपणे प्रभावी नाही. |
| Verticillium spp. | व्हर्टिसिलियम मर – नियंत्रण होत नाही. |
फवारणी प्रमाण
▸ प्रमाण : 0.75 ml ते 1 ml प्रती लीटर
मुख्य वैशिष्ट्ये:
▸विस्तृत श्रेणीतील नियंत्रण – Mildew, Blight, Mold,Rust,Leaf Spot इत्यादि प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण.
▸आंतरप्रवाही आणि ट्रान्सलॅमिनर क्रिया – वनस्पतीच्या आतून व पानांच्या दोन्ही बाजूंवर प्रभावी संरक्षण.
▸उत्कृष्ट प्रतिबंधात्मक क्रिया – बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त.
▸पिकाचा आरोग्य परिणाम (Phytotonic Effect) – पाने हिरवीगार व रुंद,पसरट होतात.
▸एस.सी. स्वरूप – द्रव असल्याने वापरणे सोपे.
▸दीर्घकाळ टिकणारे संरक्षण.
मुख्य वैशिष्ट्ये:
‘क्रॉस रेझिस्टन्स’ टाळणे (Avoid Cross-Resistance):
▸ शास्त्रीय कारण: अझॉक्सिस्ट्रोबिन हे ‘स्ट्रोबिल्युरिन’ (FRAC Group 11) गटातील बुरशीनाशक आहे. या गटातील इतर बुरशीनाशके (उदा. पायराक्लोस्ट्रोबिन – कॅब्रिओ टॉप, ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबिन – नॅटिव्हो) यांची कार्यपद्धती समान आहे. जर बुरशीने अमिस्टार विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार केली, तर ती याच गटातील इतर औषधांनाही दाद देत नाही (Cross Resistance).
▸ टीप: जर अमिस्टारचा रिझल्ट येत नसेल, तर लगेच त्याचा वापर थांबवा. पुढील फवारणीत ‘कॅब्रिओ टॉप’ किंवा ‘नॅटिव्हो’ वापरू नका. त्याऐवजी तात्पुरते या गटाचे वापर बंद करून पूर्णपणे वेगळ्या गटाचे औषध वापरा.
‘मोड ऑफ ॲक्शन’ मध्ये बदल (Rotate Mode of Action):
▸ शास्त्रीय कारण: हे बुरशीनाशक बुरशीच्या ‘श्वसन प्रक्रियेत’ (Energy Production) एका विशिष्ट ठिकाणी अडथळा आणते. सतत वापरल्यास बुरशी जनुकांमध्ये (Genes) बदल करून याला विरोध करते.
▸ टीप: साखळी तोडण्यासाठी, पुढील फवारणीत ‘ट्रायझोल’ (गट ३ – उदा. स्कोअर, टिल्ट) किंवा ‘मल्टी साईट’ (उदा. M-45, क्लोरोथॅलोनिल) बुरशीनाशक वापरावे. अमिस्टारचा रिझल्ट न आल्यास पुन्हा डोस वाढवून फवारणी करू नका.
‘टँक मिक्स’ धोरण (Tank Mix Strategy – Multi-site Action):
▸ शास्त्रीय कारण: अझॉक्सिस्ट्रोबिन हे ‘सिंगल साईट’ (Single Site) बुरशीनाशक असल्याने हाय रिस्क आहे. मल्टी-साईट बुरशीनाशके बुरशीवर अनेक ठिकाणांवरून एकाच वेळी कार्य करतात, ज्यामुळे रेझिस्टन्स तयार होत नाही.
▸ टीप: हे औषध कधीही एकटे (Solo) वापरू नका. यासोबत नेहमी मॅन्कोझेब (M-45), क्लोरोथॅलोनिल (कवच) किंवा प्रोपिनेब (अँट्राकोल) यांसारखे स्पर्शजन्य बुरशीनाशक मिसळूनच वापरावे. यामुळे राहिलेली कसर भरून निघते.
वापराची वारंवारता (Frequency of Application):
▸ नियम: एका पिकाच्या हंगामात (Crop Season) हे बुरशीनाशक जास्तीत जास्त २ ते ३ वेळाच वापरावे.
▸ टीप: सलग (Back to back) दोन अझॉक्सिस्ट्रोबिनच्या फवारण्या कधीही घेऊ नयेत. दोन फवारण्यांच्या मध्ये किमान एक स्पर्शजन्य किंवा वेगळ्या गटाच्या बुरशीनक्षकांची फवारणी घ्यावी.
उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):
▸ शास्त्रीय कारण: अझॉक्सिस्ट्रोबिन हे बुरशीचे ‘बीजाणू अंकुरण’ रोखण्यात सर्वोत्तम आहे. जेव्हा बुरशीचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढतो (High Infestation), तेव्हा बुरशीनाशकाला दाद न देणारी ‘म्युटंट’ बुरशी तयार होण्याची शक्यता जास्त असते.
▸ टीप: रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढल्यावर (Curative) याचा वापर टाळावा. त्याऐवजी ‘कर्झेट’ (Cymoxanil) किंवा ‘मेलोडी’ सारखी बुरशीनाशके वापरावीत.अमिस्टारचा वापर शक्यतो रोग येण्यापूर्वी (Preventive) करणे सर्वात सुरक्षित आहे.
जैविक बुरशीनाशकांचा वापर (Use of Bio-fungicides):
▸ शास्त्रीय कारण: रासायनिक बुरशीनाशकांच्या सततच्या माऱ्यामुळे बुरशीची प्रतिकारशक्ती वाढते. जैविक घटकांची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी असते जी रासायनिक रेझिस्टन्स तोडण्यास मदत करते.
▸ टीप: रासायनिक साखळी तोडण्यासाठी मधल्या काळात ‘ट्रायकोडरमा’ (Trichoderma) किंवा ‘बॅसिलस सबटिलिस’ ची फवारणी घ्यावी. हे रेझिस्टंट बुरशीला मारण्यासाठी प्रभावी ठरतात.
योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):
▸ शास्त्रीय कारण: कमी डोस वापरल्यास बुरशीवर ‘निवड दबाव’ (Selection Pressure) कमी पडतो आणि अर्धमेली बुरशी जिवंत राहून आपली पुढील पिढी अधिक शक्तिशाली बनवते.
▸ टीप: नेहमी शिफारस केलेला डोस (साधारण १ मि.ली. प्रति लिटर) तंतोतंत वापरावा आणि पानांच्या दोन्ही बाजूंना बुरशीनाशक पोहचेल असे कव्हरेज घ्यावे.
🎥 कृषिविद्या व्हिडिओ
खालील व्हिडिओमध्ये उत्पादनाचा वापर दाखवला आहे 👇
Strobilurin गटातील सर्व प्रमुख बुरशीनाशक घटक (Azoxystrobin, Trifloxystrobin, Picoxystrobin, Kresoxim Methyl, Pyraclostrobin इ.)यांचा बुरशीप्रकारानुसार परिणामकारकता चार्ट
पुढे स्लाइड करा👉
| रोग गट / Fungal Group | Azoxystrobin | Trifloxystrobin | Picoxystrobin | Kresoxim Methyl | Pyraclostrobin |
|---|---|---|---|---|---|
| ओओमायसीट (Oomycetes) (Downy mildew, Phytophthora, Pythium) |
★ ★ ★ | ★ ★ | ★ | ★ | ★ ★ |
| ॲस्कोमायसीट (Ascomycetes) (Powdery mildew, Anthracnose, Leaf spot) |
★ ★ | ★ ★ ★ | ★ ★ ★ | ★ ★ ★ | ★ ★ |
| बेसिडियोमायसीट (Basidiomycetes) (Rust, Smut) |
★ ★ | ★ ★ | ★ ★ | ★ ★ | ★ ★ ★ |
| ड्यूटेरोमायसीट (Deuteromycetes) (Leaf spot, Early blight — Alternaria) |
★ ★ | ★ | ★ | ★ | ★ ★ |
Miradorला पर्याय म्हणून खालील उत्पादनांचा वापर करू शकता.
पुढे स्लाइड करा👉
शेतकऱ्यांचेMiradorबद्दल सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न
Mirador हे आंतरप्रवाही / ट्रान्सलॅमिनर प्रकारचे बुरशीनाशक आहे.
Strobilurin रासायनिक बुरशीनाशक गटातील आहे.
हो, आंतरप्रवाही (Systemic) + ट्रान्सलिमीनर(Translaminar) आहे.
हो. पानाच्या वरून आत जाऊन खालच्या बाजूचे संरक्षण देतो.
Powdery mildew (भुरी), Early blight (Alternaria), Fruit rot, Leaf spot.
Miradorआणि Galileo (Picoxystrobin) यांच्यात molecular फरक आहे; काही रोगांवर Galileo अधिक प्रभावी दिसतो, विशेषतः भुरी व early blight,संपूर्ण माहितीसाठी परिणामकारकता चार्ट पहा.
होMirador याबुरशीनाशकास Galileo, Cabrio Top व Ergon ही बुरशीनाशके पर्याय आहेत.
भुरी (powdery mildew) वर चांगले प्रतिबंधात्मक (excellent preventive) आणि प्राथमिक टप्प्यात उपचारात्मक (early curative control)नियंत्रण देते.
हो. हे लवकर येणारा करपा यावर चांगले प्रतिबंधात्मक (excellent preventive) आणि प्राथमिक टप्प्यात उपचारात्मक (early curative control)नियंत्रण देते.
प्रारंभिक अवस्थेत चांगले नियंत्रण करते; पण संपूर्ण नियंत्रणासाठी Phytophthora-specific fungicide (उदा. Metalaxyl/Cymoxanil मिश्र) सह वापरा.
हो, फळकूज (anthracnose) वर चांगला कंट्रोल दिसतो,परंतु प्रादुर्भाव वाढल्यानंतर स्पर्शजन्य बुरशीनाशकचा वापर त्याबरोबर करा.
पानांवरील ठिपकेवर प्रभावी आहे;परंतु प्रादुर्भाव वाढल्यानंतर contact fungicide किंवा mixture वापरण्याचा सल्ला द्या.
हो; डाय बॅक उपचारासाठी उपयोगी आहे.
जर डाग बुरशीचे असतील (Alternaria/Cercospora इ.) तर Mirador उपयुक्त आहे; आधी निदान नक्की करा.
साधारण 0.75 – 1 ml प्रति लिटर (लेबलनुसार निश्चित करा).
साधारण 160 ml ते 200 ml प्रति एकर (spray volume व पिकानुसार बदलू शकते).
सामान्यतः 10–14 दिवसांनी पुन: फवारणी करू शकता. (रोग आणि हवामानानुसार समायोजित करा).
प्रादुर्भाव जास्त असल्यानंतर max recommended dose (1 ml/L) आणि partner fungicide वापरण्याचा सल्ला.
हो; ट्रान्सलिमीनर (translaminar) गुणधर्मामुळे हलक्या पावसातही परिणाम टिकतो, परंतु फवारणी नंतर थोडा वेळ पाऊस नसेल तर चांगले.
Mirador साधारण 30–60 मिनिटांत शोषले जाते; हलक्या पावसात काही परिणाम टिकतो; परंतु जोरदार पावसानंतर प्रभाव कमी होऊ शकतो.
सकाळी 7–10 वा किंवा सायंकाळी 5–7; गरजेनुसार थंड व calm conditions मध्ये करा.
लवकर येणारा करपा, पानांवरील ठिपके,भुरी,मोल्ड व सुरुवातीच्या टप्प्यातील उशिरा येणारा करपा वर प्रभावी नियंत्रण.
हो, मिरचीतील भुरी (powdery mildew) नियंत्रणासाठी Mirador अत्यंत उपयुक्त आहे.
हो, grapes मध्ये powdery mildew वर excellent control देते.
हो, बटाटा मध्ये लवकर येणारा करपा नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे.
Sheath blight वर चांगला प्रभाव असू शकतो; blast साठी specific fungicides आवश्यक असू शकतात.
रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांवर किंवा preventive spray schedule नुसार देणे चांगले.
बहुतेक horticulture व field crops मध्ये सुरक्षित; परंतु नेहमी लेबल व PHI तपासा.
हो, बहुतेक कीटकनाशके आणि द्रव खतांसोबत compatible आहे; pre-mix test शिफारसीय.
हो, बहुतेक foliar nutrients सोबत देता येतो; compatibility test करणे उत्तम.
साधारणतः copper व sulphur सोबत मिसळल्यास compatibility issue किंवा phytotoxicity होऊ शकते; टाकण्यापूर्वी label व tank-mix test करा.
टाकण्यापूर्वी पाणी भरून Mirador नंतर इतर द्रव हळू हळू मिसळा; agitation चालू ठेवा आणि compatibility test करा.
No — हे foliar spray fungicide आहे; drip वर देण्याची शिफारस नाही.
हो, पानांचा health आणि glossiness सुधारल्याचे दिसते (phytotonic effect).
साधारणपणे नाही, परंतु शिफारस केलेल्या डोस आणि योग्य पर्यावरणीय परिस्थिती पाळा.
साधारण 10–14 दिवस protection मिळतो; हवामान आणि रोग दाबानुसार बदलू शकतो.
सामान्यतः साधारण 7 दिवस (पिकानुसार लेबल तपासा).
नाही — हे synthetic fungicide आहे; organic प्रमाणपत्रासाठी अमान्य आहे.
हो — रोग कमी होऊन पानांची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे परिपक्वतेत आणि उत्पादनात सुधारणा होऊ शकते.
Strobilurin वर्गामुळे बदल करा — Triazole/Multisite fungicides बरोबर alternate करा; एकाच गटाचे वारंवार वापर टाळा.
हे सध्या Adama ही कंपनी भारतात विक्री करत आहे.
Generic strobilurins ( Kresoxim Methyl formulations) स्वस्त पर्याय म्हणून वापरू शकता; परंतु field testing व label तपासा.
Preventive व early stage मध्ये उत्कृष्ट; severe infections साठी partner fungicide व cultural measures आवश्यक.
प्रतिबंधात्मक वापरासाठी (Preventive usage) साठी बरे; परंतु ऊपचारात्मक मध्ये (moderate/severe infections) मध्ये स्पर्शजन्य (contact किंवा multi-site fungicide) बरोबर मिसळून वापर करा.
आमच्याशी संपर्क करा.
📲 WhatsApp📞 कॉल
⭐ शेतकऱ्यांचे Miradorबद्दलचे खरे रिव्ह्यू
आमच्या शेतकऱ्यांनी वापरून दिलेले अनुभव – प्रभाव जाणून घ्या 👇
मिरचीवर Amistar + Cuman L ची फवारणी केल्यामुळे चोनोफोरा करपा यावर प्रभावी नियंत्रण मिळाले व करपा थांबला.
Amistar+ Cuman L बुरशीनाशक दिल्यावर बुरशीजन्य रोगावर प्रभावी नियंत्रण मिळाले व पाने हिरवीगार झाली.
कलिंगड पिकात भुरी वाढत होती. Amistar दिल्यावर प्रसार पूर्ण थांबला.परंतु त्याबरोबर Cuman L हे बुरशीनाशक वापरले होते.
बटाटा पिकात आलेल्या करपा रोगावर लगेच एक फवारणी मध्ये नियंत्रण मिळते.फवारणी मध्ये मी Amistar + Cuman L ही दोन बुरशीनाशके एकत्रित वापरली.
⭐ शेतकऱ्यांचे farmspot crop schedule वापरल्यानंतरच्या प्रतिक्रिया
“फार्मस्पॉटच्या मार्गदर्शनामुळे माझ्या टोमॅटो पिकात ३०% उत्पादन वाढ झाली. सल्ला अत्यंत उपयुक्त.”
“खातांची योग्य मोजमाप आणि फवारणी शेड्यूलने पिकांचे आरोग्य प्रचंड सुधारले.”
“उत्पादनात सुधारणा दिसली; उत्पादने आणि सल्ला दोन्ही विश्वासार्ह.”
Miradorकिटकनाशक संबंधित फेसबूक पोस्ट
Miradorकिटकनाशक संबंधित Instagram पोस्ट
Miradorकिटकनाशक संबंधित ब्लॉग
Amistar फंगीसाइड, Amistar वापर पद्धत, Amistar डोस, अॅमिस्टार किंमत, अॅझॉक्सी स्ट्रोबिन फंगीसाइड, Amistar 250 SC डोस, Amistar कधी फवारावे, Amistar किती ml, Amistar टोमॅटो मध्ये डोस, Amistar द्राक्ष रोग नियंत्रण, Amistar करपा नियंत्रण, Amistar mixing chart, Amistar कुठे मिळते, Amistar फायदे,
Amistar fungicide, Amistar dose per liter, Amistar 250SC, Amistar online buy, Amistar kis rog par use hota hai, Amistar tomato me kitna, Amistar price India, Amistar systemic fungicide, Amistar contact hai kya, Amistar review, Amistar online kharide, Azoxystrobin fungicide, Amistar compatible pesticides,
Amistar fungicide price, Amistar डोस माहिती, Amistar ka istemal, Azoxystrobin 250 SC, Amistar spray schedule, Amistar grape disease control, Amistar rainfast period, Amistar vs Amistar Top, Amistar best spraying stage, Amistar for vegetables, Amistar crop protection,
Amistar 250 SC dosage, Amistar benefits, Amistar for tomato, Amistar mode of action, Amistar price in India, Azoxystrobin 250 SC uses, Amistar downy mildew control, Amistar disease control, Amistar pest management, Amistar resistance management, Amistar search keywords 2025.








