Description
रासायनिक घटक
▸ यामध्ये मॅन्कोझेब ७५% डब्ल्यू.पी. (Mancozeb 75% WP) Wettable Powder हा रासायनिक घटक असतो.
रासायनिक गट
▸ डायथिओकार्बामेट्स (Dithiocarbamates), इथिलीन-बिस-डायथिओकार्बामेट (EBDC)
बुरशीनाशक प्रकार व क्रिया
▸ बुरशीनाशक प्रकार: स्पर्शजन्य (Contact)
▸ स्पर्शजन्य असल्यामुळे हे फवारणीनंतर वनस्पतीमध्ये किंवा पानात शोषले जात नाही. त्याऐवजी, हे पानांच्या आणि वनस्पतीच्या पृष्ठभागावर राहून एक ‘संरक्षक थर’ (Protective Layer) तयार करते, ज्यामुळे बुरशीचा थेट संपर्क वनस्पतीशी येत नाही.
▸ क्रिया प्रकार: फक्त प्रतिबंधात्मक (Preventive)
▸ हे बुरशीनाशक बुरशीचे बीजाणू (Spores) अंकुरित होण्याआधीच नष्ट करते. त्यामुळे रोग येण्यापूर्वी किंवा रोगाची लक्षणे दिसण्याआधी वापरल्यास हे पिकाचे सर्वोत्तम प्रतिबंधात्मक संरक्षण करते.
बुरशीनाशक कार्यपद्धती
▸ मॅन्कोझेब (Mancozeb) हे ‘बहु-स्थळी क्रिया करणारे’ (Multi-site Action) गटातील बुरशीनाशक आहे.
▸ हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशींमधील विविध एन्झाइम्स (Enzymes) आणि अमिनो ॲसिड्समधील ‘सल्फहायड्रिल’ (-SH) गटाशी अभिक्रिया करते. यामुळे बुरशीची श्वसन क्रिया (Respiration), लिपिड निर्मिती आणि ऊर्जा निर्मिती यांसारख्या अनेक अत्यावश्यक चयापचय क्रियांमध्ये (Metabolic processes) एकाच वेळी अडथळा निर्माण होतो. परिणामी, बुरशीचे बीजाणू अंकुरत नाहीत आणि बुरशी नष्ट होते.
▸ या गटाला ‘डायथिओकार्बामेट्स’ (Dithiocarbamates) फंगिसाइड असे म्हणतात.
(FRAC Group: M03)
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग
▸
कांदा
▸ जांभळा करपा
▸ डाउनी मिल्ड्यू
▸ अल्टरनारिया ठिपके
▸
कोबी, फुलकोबी, ब्रोकोली, रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ डाउनी मिल्ड्यू
▸
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late blight – primary fungicide)
▸
काकडी, कारले, दोडका, दुधी भोपळा, घोसवळे
▸ डाउनी मिल्ड्यू
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸
आले, हळद
▸ पानावरील ठिपके (Alternaria)
▸ पानावरील करपा
▸
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा
▸ उशिरा येणारा करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸
मिरची, ढोबळी मिरची
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके
▸ डाउनी मिल्ड्यू
▸
वांगे
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील करपा
▸
भेंडी
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील ठिपके
▸
गवार
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ अँथ्रॅकोज करपा
▸
कापूस
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸
झेंडू
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील ठिपके
▸
शेवंती
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील ठिपके
▸
भुईमूग
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
▸ उशिरा येणारे ठिपके
▸
सोयाबीन
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके
▸
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके
▸
मटकी, मुग, चवळी, उडीद
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके
▸
हरभरा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके
▸
वाटाणा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके
▸
कलिंगड, खरबूज
▸ डाउनी मिल्ड्यू
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸
भात
▸ तपकिरी ठिपके
▸ ब्लास्ट (protective use)
▸
गहू
▸ पानावरील ठिपके
▸ सेप्टोरिया ठिपके
▸
मका
▸ पानावरील ठिपके
▸
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके
Mancozeb 75% WP – खालील बुरशी व त्यामुळे येणारे बुरशीजन्य रोग यावर नियंत्रण मिळवते.
▸ Mancozeb 75 % WP खालील बुरशी व त्यामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण करते, त्यामुळे खालील रोगांची लक्षणे दिसल्यास तुम्ही या बुरशीनाशक ची फवारणी करावी. परंतु हे प्रतिबंधात्मक नियंत्रण करते.
▸ Alternaria spp.
▸ Cercospora spp.
▸ Colletotrichum spp.
▸ Septoria spp.
▸ Phytophthora infestans
▸ Peronospora / Pseudoperonospora
▸ Pestalotia spp.
▸ Helminthosporium spp.
▸ Bipolaris / Drechslera spp.
▸ Mycosphaerella spp.
❌ प्रभावी नाही असे बुरशीचे नाव व त्यामुळे होणारा रोग
▸ Mancozeb 75 % WP खालील बुरशी व त्यामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण करत नाही,त्यामुळे खालील रोगांची लक्षणे दिसल्यास दुसऱ्या बुरशीनाशक ची फवारणी करावी.
▸
Fusarium spp.
▸
Verticillium spp.
▸
Rhizoctonia solani
▸
Sclerotinia sclerotiorum
▸
Pythium spp.
▸
Botrytis cinerea
▸
Oidium / Erysiphe spp.
▸
Pyricularia oryzae
▸
Ustilago spp.
▸
Tilletia spp.
प्रमाण
▸ फवारणीसाठी : 1.5 ते 2 ग्रॅम प्रती लीटर
▸आळवणीसाठी : 1.5 ते 2 ग्रॅम प्रती लीटर
▸ ठिबकसाठी : 500 ग्रॅम प्रती एकर
Mancozeb प्रतिकारशक्ति व्यवस्थापन
‘क्रॉस रेझिस्टन्स’ टाळणे (Avoid Cross-Resistance):
▸ शास्त्रीय कारण: मॅन्कोझेब हे ‘डायथिओकार्बामेट’ (Dithiocarbamate – FRAC M03) गटातील बुरशीनाशक आहे. जरी याच्या विरोधात रेझिस्टन्स येण्याची शक्यता अत्यंत कमी (Very Low Risk) असली, तरी एकाच गटातील इतर बुरशीनाशके (उदा. झिनेब, प्रोपिनेब/अँट्राकोल) आणि मॅन्कोझेब यांची कार्यपद्धती मिळतीजुळती आहे.
▸ टीप: सतत फक्त मॅन्कोझेब किंवा प्रोपिनेब वापरू नका. अधूनमधून ‘कॅप्टन’ (Captan) किंवा ‘कॉपर’ (Copper) सारख्या वेगळ्या गटातील स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करा.
‘मोड ऑफ ॲक्शन’ मध्ये बदल (Rotate Mode of Action):
▸ शास्त्रीय कारण: हे ‘मल्टी-साईट’ (Multi-site) बुरशीनाशक आहे. हे बुरशीच्या श्वसन क्रियेत, लिपिड निर्मितीत आणि प्रथिनांच्या कार्यात अनेक ठिकाणी अडथळा आणते. त्यामुळे बुरशीला स्वतःमध्ये बदल करून याला विरोध करणे जवळजवळ अशक्य असते. म्हणूनच याला ‘युनिव्हर्सल पार्टनर’ मानले जाते.
▸टीप: हे बुरशीनाशक स्वतः ‘रेझिस्टन्स ब्रेकर’ म्हणून काम करते. त्यामुळे जेव्हा तुम्ही ‘हाय रिस्क’ बुरशीनाशक (उदा. स्ट्रोबिल्युरिन किंवा ट्रायझोल) वापरता, तेव्हा त्या दोन फवारण्यांच्या मध्ये मॅन्कोझेबची फवारणी घेतल्यास रेझिस्टन्स साखळी तुटते.
‘टँक मिक्स’ धोरण (Tank Mix Strategy):
▸ शास्त्रीय कारण: मॅन्कोझेब हे सर्वात सुरक्षित ‘टँक मिक्स पार्टनर’ आहे. ‘सिंगल साईट’ बुरशीनाशकांना (उदा. मेटलॅक्झील, सायमोक्झानील, कार्बेन्डाझिम) बुरशी लवकर दाद देत नाहीशी होते. अशा वेळी त्या बुरशीनशकांना संरक्षण देण्यासाठी मॅन्कोझेबचा वापर केला जातो.
▸ टीप: आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा (Systemic Fungicide) प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी आणि रेझिस्टन्स टाळण्यासाठी त्यांच्यासोबत नेहमी मॅन्कोझेब मिसळून फवारावे (उदा. मेटलॅक्झील + मॅन्कोझेब किंवा कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब).
वापराची वारंवारता (Frequency of Application):
▸ नियम: हे कमी धोक्याचे (Low Risk) बुरशीनाशक असल्याने हंगामात ३ ते ५ वेळा वापरता येते.
▸ टीप: पावसाळी हंगामात किंवा ढगाळ वातावरणात बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर ७ ते १० दिवसांनी याचा वापर करणे सुरक्षित आणि प्रभावी आहे.
उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):
▸ शास्त्रीय कारण: मॅन्कोझेब हे शुद्ध ‘स्पर्शजन्य’ (Contact) बुरशीनाशक आहे. हे बुरशीचे बीजाणू (Spores) अंकुरित होण्याआधीच मारते. एकदा बुरशी पानाचा आत शिरली (Infection झाले), की मॅन्कोझेब तिला मारू शकत नाही.
▸ टीप: रोगाची लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका. रोग येण्यापूर्वीच (Preventive) याचा वापर करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. रोग आल्यावर याचा एकटा वापर करू नका, त्यासोबत आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरा.
योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):
▸ शास्त्रीय कारण: हे बुरशीनाशक पानामध्ये शोषले जात नाही, ते फक्त पानांच्या पृष्ठभागावर राहते. त्यामुळे पानाचा जो भाग बुरशीनाशकाने भिजला नाही (Poor Coverage), तिथे बुरशी वाढू शकते.
▸ टीप: फवारणी करताना पानांच्या वरच्या आणि खालच्या बाजूला पूर्ण कव्हरेज मिळेल याची खात्री करा. पावसाळ्यात पानावर बुरशीनाशक टिकून राहण्यासाठी चांगल्या दर्जाचे ‘स्टिकर’ (Sticker/Spreader) नक्की वापरा.
मुख्य वैशिष्ठे
▸विस्तृत श्रेणीतील नियंत्रण (Broad Spectrum Control) – करपा (Early & Late Blight), पानावरील ठिपके (Leaf Spot), तांबेरा (Rust), डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) आणि फळकूज यांसारख्या अनेक बुरशीजन्य रोगांवर अत्यंत प्रभावी.
▸ स्पर्शजन्य क्रिया (Contact Action) – हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. फवारणीनंतर हे पानांच्या पृष्ठभागावर पसरून एक ‘संरक्षक कवच’ (Protective Layer) तयार करते, ज्यामुळे बुरशी पिकाच्या आत शिरू शकत नाही.
▸ प्रतिबंधात्मक कार्य (Preventive Action) – हे प्रामुख्याने रोग येण्याआधी (Preventive) वापरण्याचे बुरशीनाशक आहे. हे बुरशीचे बीजाणू (Spores) अंकुरण्याआधीच त्यांना नष्ट करते, त्यामुळे पिकाचे सुरुवातीपासूनच रक्षण होते.
▸ पोषक घटकांचा पुरवठा (Nutritional Value) – यामध्ये ‘मँगनीज’ (Mn) आणि ‘झिंक’ (Zn) हे आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. यामुळे बुरशी नियंत्रणासोबतच पिकाची पाने हिरवीगार राहतात आणि प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते.
▸ WP स्वरूप (Wettable Powder) – हे पाण्यात मिसळणारी पावडर (WP) स्वरूपात उपलब्ध आहे. हे इतर कीटकनाशके आणि बुरशीनाशकांसोबत मिसळण्यासाठी (Tank Mix) सर्वात सुरक्षित आणि सुसंगत औषध आहे.
▸ रेझिस्टन्स मॅनेजमेंट (Resistance Fighter) – हे ‘मल्टी-साईट’ (Multi-site) ॲक्शन असल्यामुळे बुरशीला या बुरशीनाशकाचा रेझिस्टन्स (प्रतिकारशक्ती) तयार करता येत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे वापरूनही याचा रिझल्ट कमी होत नाही.
व्हिडिओ गॅलरी
रासायनिक गट
↔️ टेबल पूर्ण पाहण्यासाठी डावीकडे सरकवा
| उत्पादन | फोटो | पॅकिंग | किंमत | खरेदी |
|---|---|---|---|---|
| Swal Manzeb | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| UPL Dithane M45 | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Mahindra Zeal M45 | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Tata Rallis M45 | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Dhanuka M45 | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Coromandal Marlet | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Krishi Rasayan CM 75 | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
| Syngenta Abic | ![]() |
250 ग्रॅम | ₹ — | View |
रासायनिक गट
▸ M-45 बुरशीनाशक आंतरप्रवाही की स्पर्शजन्य आहे?
▸ M-45 कोणत्या रासायनिक गटातील आहे?
▸ M-45 systemic आहे का?
▸ M-45 मध्ये preventive आणि curative गुण आहेत का?
▸ M-45 कोणत्या रोगांवर जास्त परिणामकारक आहे?
▸ M-45 आणि Bavistin मध्ये काय फरक आहे?
▸ M-45 ला पर्याय काय आहे?
▸ उशिरा येणाऱ्या करपा (Late Blight) वर प्रभावी आहे का?
▸ M-45 करपा (Anthracnose) नियंत्रणासाठी वापरावा का?
▸ M-45 मर रोगावर (Wilt/Root rot) चालतो का?
▸ M-45 फळकूजवर (Fruit Rot) मदत करतो का?
▸ M-45 पानांवरील ठिपके (Leaf Spot) वर किती परिणामकारक आहे?
▸ M-45 डाय बॅक (Die-back) नियंत्रणासाठी वापरता येतो का?
▸ पानांवर डाग आले असतील तर M-45 द्यावा का?
▸ फवारणीसाठी किती ग्रॅम प्रति लिटर वापरावे?
▸ एका एकरासाठी M-45 किती लागते?
▸ M-45 किती दिवसांनी पुन्हा फवारावे?
▸ रोग फार वाढला असेल तर डोस किती ठेवावा?
▸ पावसाळ्यात M-45 वापरू शकतो का?
▸ फवारल्यानंतर पाऊस आला तर परिणाम कमी होणार का?
▸ फवारणीस योग्य वेळ कोणती?
▸ टोमॅटोमध्ये M-45 कोणत्या रोगावर देतात?
▸ मिरचीमध्ये M-45 वापरू शकतो का?
▸ द्राक्षामध्ये M-45 कधी वापरतात?
▸ कांद्यामध्ये M-45 वापरावे का?
▸ भातात (Paddy) M-45 चालते का?
▸ सोयाबीन मध्ये M-45 कधी द्यायचा?
▸ M-45 सर्व पिकांसाठी सुरक्षित आहे का?
▸ M-45 कीटकनाशकांसोबत मिसळता येतो का?
▸ M-45 विद्राव्य खतांसोबत (१९:१९:१९) देता येतो का?
▸ M-45, Copper किंवा Sulphur सोबत मिसळू शकतो का?
▸ Tank-mix करताना M-45 कधी टाकावे?
▸ M-45 ठिबक (Drip) किंवा आळवणी (Drenching) द्वारे देता येते का?
▸ M-45 मुळे पीक हिरवेगार होते का?
▸ M-45 मुळे फुलगळ होते का?
▸ M-45 चा परिणाम किती दिवस टिकतो?
▸ PHI (Pre-harvest interval) किती दिवस आहे?
▸ M-45 बीजप्रक्रियेसाठी (Seed Treatment) वापरता येते का?
▸ M-45 वापरल्यानंतर उत्पादन वाढते का?
▸ Resistance management कसे करावे?
▸ Indofil M-45 कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?
▸ M-45 स्वस्त आहे की महाग?
▸ M-45 हे खूप जास्त बुरशी आल्यावर (Heavy Infestation) एकटे काम करेल का?
▸ M-45 पावडर स्वरूपात आहे की लिक्विड?
रासायनिक गट
भुरी आली होती पण Galileo फवारणी दिल्यावर 3–4 दिवसात छान परिणाम दिसला. पानं healthy आणि चमकदार झाली.
पानांवर रिंग सारखे डाग आले होते. Galileo + एक contact fungicide दिल्यावर रोग वाढ थांबली. उत्पादनातही स्पष्ट फरक!
द्राक्ष बागेत powdery mildew वाढत होता. Galileo दिल्यावर fungal spread पूर्ण थांबला आणि पिकाचा shine खूप वाढला.
सोयाबीनमध्ये छोटे-छोटे ठिपके होते. Galileo दिल्यावर 3 दिवसात improvement दिसली आणि spread थांबला.



