H.कांदा पिकात येणारी अन्नद्रव्ये कमतरता
फेरस कमतरता
कमतरता कशी ओळखावी? ✅फेरसच्या कमतरतेमुळे कांद्याच्या नवीन पतींमध्ये इंटरव्हेइनल क्लोरोसिस दिसतो, ज्यामध्ये पातींच्या शिरांच्या दरम्यानचा भाग पिवळसर होतो.पण शिरा या हिरव्या राहतात.जास्त प्रादुर्भाव झाल्यावर संपूर्ण पात फिकट पिवळसर किंवा पांढरट होते. ✅त्याचबरोबर रोपांची वाढ खुंटते,कांद्याचे कंद लहान राहतात,मुळांची वाढ कमी होते,तसेच मुळे कमकुवत होतात. फेरसची कार्य कांद्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी फेरस अत्यंत महत्त्वाचे आहे.हे विविध […]
Read Moreझिंकची कमतरता
झिंकची कमतरता कशी ओळखावी? ✅ कांदा पिकात झिंकची कमतरता आल्यानंतर नवीन पाती या पिवळसर पडतात व कालांतराने संपूर्ण पात पिवळसर किंवा पोपटी पडते.तसेच रोपे उपटून मुळांची वाढ बघावी. वाढ जर थांबली असेल तर कांदा पिकात झिंकची कमतरता आहे असे समजावे. झिंकचे कार्य झिंक कांदा पिकाच्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.त्याचे कार्य खालीलप्रमाणे आहे: ✅ […]
Read Moreमॅगनीज कमतरता
कमतरता कशी ओळखावी? ✅ कांद्याच्या पाती पिवळसर दिसतात, पिवळसर भागांवर लहान तपकिरी किंवा काळसर डाग तयार होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास हे डाग कोरडे होऊन पात सुकते. ✅ मॅगनीज अभावामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा येतो, ज्यामुळे झाडांची सामान्य वाढ खुंटते.कांद्याच्या कंदाची निर्मिती कमी होते. मुळांची कार्यक्षमता कमी होते,ज्यामुळे पोषण शोषणात अडथळा येतो.संपूर्ण झाड फिकट आणि अशक्त दिसते. […]
Read Moreबोरॉन कमतरता
बोरॉन कमतरता कशी ओळखावी? ✅बोरॉनची कमतरता असल्यास कांद्याच्या कंदाचा आकार विकृत होतो. कंद योग्य आकाराचे, गुळगुळीत किंवा घट्ट नसतात. मुळांची वाढ खुंटते किंवा मुळे कमकुवत होतात,ज्यामुळे पोषणद्रव्यांचे शोषण नीट होत नाही.पाने पिवळसर पडतात आणि सुकतात.पाने आणि कंदावर पांढरे किंवा तपकिरी ठिपके दिसतात, जे बोरॉनच्या कमतरतेचे प्रमुख लक्षण आहे. कंद आतून सडू लागतात,कंदाना तडे पडतात.एकूणच कंदांचा […]
Read Moreनायट्रोजन कमतरता
नायट्रोजनची कमतरता कशी ओळखावी? ✅नायट्रोजनची कमतरता असेल तेव्हा रोपांची वाढ खुंटते, तसेच नवीन पाती या पिवळसर पोपटी रंगाच्या होतात,पातींचे शेंडे पिवळसर पडायला सुरुवात होते व तसेच संपूर्ण पात पिवळसर पडते, नवीन पाती एकदम पातळ, पिवळसर व पोपटी रंगाच्या निघतात. कांदा कंद निर्मिती लवकर होत नाही. अशा प्रकारची लक्षणे जर तुमच्या प्लॉटमध्ये दिसली तर प्लॉटमध्ये नायट्रोजन […]
Read Moreपोटॅश कमतरता
पोटॅश कमतरता कशी ओळखावी? ✅ रोपांच्या जुन्या पाती शेंड्याकडे पिवळ्या पडतात. त्यानंतर त्या शेंड्याकडून खालीपर्यंत पिवळ्या पडतात. तसेच पाती कमजोर दिसतात. ज्यावेळेस जास्त तापमान वाढते तेव्हा पाती सुकल्यागत दिसतात. तसेच जुन्या पाती या जळायला लागतात.रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो अशी लक्षणे दिसल्यावर पोटॅश कमतरता आहे असे समजावे. पोटॅशचे कार्य कांद्याच्या वाढीमध्ये आणि विकासासाठी पोटॅशची भूमिका […]
Read Moreफॉस्फरस कमतरता
फॉस्फरस कमतरता कशी करावी? कांद्याच्या रोपांमध्ये फॉस्फरसच्या कमतरतेमुळे खालील लक्षणे दिसून येतात त्यासाठी खालील लक्षणांची निरीक्षणे करावे. ✅कांदा पिकात फॉस्फरस कमतरतेमुळे पेशींचे विभाजन थांबते,ज्यामुळे रोपांची शाकीय वाढ थांबते व रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ थांबते. त्यामुळे हे लक्षणे दिसत आहेत का ते पहावे. ✅ कांदा पिकात फॉस्फरस कमतरतेमुळे पाती गडद हिरव्या किंवा पातीच्या कडा जांभळ्या रंगाच्या […]
Read Moreसल्फर कमतरता
सल्फरची कमतरता कशी ओळखावी ✅कांदा पिकात सल्फर कमतरता आल्यावर कांदा पात शेंड्याकडून पिवळसर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर तो पिवळसरपणा संपूर्ण पातीवर येतो व संपूर्ण पात पिवळसर पडते व रोपांची वाढ खुंटते.कांदा पातीचा पसरटपणा कमी होतो व पातीचा आकार कमी होतो. मान नाजूक होते, कांद्याची वाढ होते, कांद्याचा रंग फिकट होतो, अशी लक्षणे आपल्याला प्लॉटमध्ये दिसत […]
Read Moreमॅग्नेशियम कमतरता
मॅग्नेशियम कमतरता कशी ओळखावी ✅ कांदा पिकात मॅग्नेशियम कमतरता आल्यानंतर कांदा पातीमधील हरितकणांचे प्रमाण कमी होते व सुरुवातीला पातीचे शेंडे व कालांतराने संपूर्ण पात पिवळी पडते. त्यानंतर पातीचे शेंडे तपकिरी रंगाचे होतात व एकदम पिवळे पडतात आणि वाळून जातात. रोपांची वाढ एकदम खुंटते व रोपांवर इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा आपल्या प्लॉटमध्ये मॅग्नेशियम कमतरता […]
Read Moreकॅल्शियम कमतरता
कमतरता कशी ओळखावी? ✅ कांदा पिकात कॅल्शियम कमतरता आल्यानंतर पातींचे शेंडे पिवळे न पडता एकदम वाळायला लागतात व पाती वरून करपायला लागतात. यामुळे अशा प्रकारची लक्षणे आपल्या प्लॉटमध्ये दिसायला लागल्यावर आपल्या प्लॉटमध्ये कॅल्शियम कमतरता आहे असे समजावे. कॅल्शियमची कार्य रोपांची मुळे सेट होण्यासाठी कॅल्शियम हा रोपांच्या मुळांच्या पेशीभित्तिकांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक आहे.ज्यामुळे रोपांची मुळे मजबूत […]
Read More