Crop: टोमॅटो

भुरी (Powdery Mildew)

जबाबदार बुरशी 

✅Oidium neolycopersici

पोषक वातावरण 

✅जेव्हा वातावरणामध्ये आद्रता ही जास्त असते व तापमान 15°C ते 25°C च्या दरम्यान असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
✅तसेच दमट वातावरणात या बुरशीची वाढ मोठ्या प्रमाणात होते. ही बुरशी 10°C पेक्षा कमी तापमानाला जिवंत राहू शकत नाही.

लक्षणे 

✅सर्वप्रथम खालच्या पानांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचे पिठासारखे बारीक चट्टे दिसायला सुरुवात होते.पाने पिवळी पडायला सुरुवात होते.
✅कालांतराने त्याचे प्रमाण वाढते व पानांच्या वरच्या बाजूला पिठासारखा थर तयार होतो व पाने पिवळी पडून गळून जातात.
✅त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवरती होतो.

प्रसार 

✅पोषक वातावरण तयार झाल्यानंतर या बुरशीचा प्रथम प्रादुर्भाव हा रोपांच्या खालील पानांवर होतो.
✅त्यानंतर जसजसा प्रादुर्भाव वाढतो तसा या बुरशीचा प्रसार वरील पानांवर होतो.
✅महिला कामगारांच्याद्वारे या गोष्टीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होतो, तसेच वाऱ्यामुळे सुद्धा या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होतो.

प्रतिबंधात्मक उपाययोजना  

✅दोन ओळींमधील अंतर हे जास्त असायला हवे, जेणेकरून खालील पानांवर सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे पडतो आणि बुरशीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होतो.
✅भुरी या बुरशीजन्य रोगाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाल्यावर लगेच बुरशीनाशकाची फवारणी करावी.

उपचारात्मक उपाययोजना