कांदा बियाणे उगवण क्षमता /अंकुरण क्षमता कशी तपासावी?
बियाणे अंकुरण क्षमता तपासण्यासाठी खालील सोपी पद्धत अवलंबित करावी.
बियाणे नमूना निवड
✅ ज्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासायची आहे त्यामधून 100 बियांचा नमुना घ्यावा.
सुती किंवा बारदानाचा वापर
✅ त्यानंतर बारदान किंवा सुती कापड घ्यावे. ते व्यवस्थित पाण्यात भिजवून घ्यावे व त्या सुती कापडावर किंवा बारदानावर त्या 100 बिया 10-10 च्या चौकटीत ठेवा. त्यानंतर ते झाकून ठेवा, ज्यामुळे बियाण्याना ओलावा म्हणजेच आद्रता मिळेल.
प्लास्टिक डब्बा वापर
✅ त्यानंतर ते नमुना असलेले कापड किंवा बारदान प्लास्टिक डब्यात ठेवावे व त्याचे झाकण बंद करावे यामुळे बियांना योग्य तापमान मिळते.
तपासणी
✅ साधारण 3 ते 4 दिवसांनी बियाण्याच्या नमुन्याची तपासणी करावी व किती बिया अंकुरतात ते मोजावे.
अंकुरण दाट
✅ तपासणीनंतर 100 बियांमधून किती बिया उगवल्या आहेत त्यावरून बियांच्या अंकुरणाचा दर ठरतो. जर 100 मधील 80 बिया अंकुरल्या तर अंकुरणाचा दर हा 80 असतो.
✅ बियाणे पेरणीसाठी ज्या बियाण्याचा अंकुरणाचा दर हा 80% पेक्षा जास्त आहे अशा बियाण्याची निवड करावी.