Crop: कांदाCrop: कांदा रोपवाटिका | Topic: A.कांदा लागवडीपूर्वीचे नियोजन

टोमॅटो रोप लागवडीनंतर बुडाचा पाला कधी काढावा?

टोमॅटो रोपांचा बुडाचा पाला कधी काढावा?

▸ टोमॅटो वनस्पती शास्त्रानुसार रोपांची लागवड केल्यानंतर 42 ते 49 दिवसांनी पाने पिवळी पडायला लागतात व गळून जातात. त्यामुळे 45 ते 50 दिवसांनी बुडाचा पाला काढावा.

टोमॅटो रोपांच्या बुडाचा पाला का काढावा?

▸ 45 दिवसांनंतर पाने वृद्ध होऊन पिवळी पडतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते व बुरशीजन्य रोग जलद गतीने पसरतो.
▸ जमिनीशी संपर्कात असलेली पाने मातीतील बुरशीजन्य रोगांच्या संसर्गास बळी पडतात. त्यामुळे ▸ पानांचा आणि मातीचा संपर्क टाळण्यासाठी बुडाचा पाला काढावा.
▸ हवा खेळती राहते व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

टोमॅटो रोपांचा बुडाचा पाला किती व कसा काढावा?

▸ जमिनीपासून 20 ते 25 से.मी. एवढा बुडाचा पाला काढावा.
▸ धारदार कात्री किंवा कटरचा वापर करावा; हाताने ओढून पाला काढू नये, कारण त्यामुळे
▸ खोडाची साल निघते व रोगप्रवणता वाढते.

▸ पाला जिथपर्यंत बुडाची फळे आहेत तिथपर्यंतच काढावा.

पाला काढण्याअगोदर घ्यायची काळजी

▸ पाला काढण्याअगोदर रोपांना पाणी द्यावे, जेणेकरून रोपांवर ताण येणार नाही.
▸ फवारणी केल्यास जुन्या पानांवरील बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळते व रोपांची प्रतिकारशक्ती वाढते.

पाला काढल्यानंतर घ्यायची काळजी

▸ पाला काढल्यानंतर रोपांना पाणी द्यावे, जेणेकरून जैविक व अजैविक ताण कमी होईल.
▸ फवारणी केल्यामुळे झालेल्या जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा प्रसार होणार नाही व जखमा लवकर भरून येतात.
महत्वाची टीप: बुडाचा पाला काढताना सकाळी किंवा सायंकाळी वेळ ठेवा, दुपारच्या उन्हात पाला काढल्यास रोपांना ताण येतो.