शास्त्रीय नाव 

Neotoxoptera formosana

किडीचे जीवनचक्र  

✅या किडीचे जीवनचक्र विविध टप्प्यांमध्ये पूर्ण होते. हे जीवनचक्र समजून घेतल्याने कांदा पिकाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येते.

अंडी (Egg Stage)

  • हिवाळ्यात, मादी पतंग पतीच्या खालच्या बाजूस किंवा पतींच्या वेणीमद्धे लहान आकराची व काळ्या रंगाची अंडी घालते.
  • अंडी साधारणतः ३-५ दिवसांत उबवतात.

निम्फ अवस्था (Nymph Stage)

  • अंड्यातून बाहेर पडल्यावर मावा किडीची निंफ अवस्था सुरू होते. निंफ अवस्था ७-१० दिवसांपर्यंत असते.
  •  निम्फ(पिल्ले) आकाराने लहान, पिवळसर किंवा हिरवट रंगाचे असतात आणि पंखहीन असतात.
  •   निम्फ(पिल्ले) अनेक वेळा त्वचा बदलतात (मोल्टिंग) आणि प्रौढ अवस्थेत पोहोचतात.

नवयुवक (Young Aphids)

  •  निम्फ(पिल्ले) वाढून नवयुवक अवस्थेत पोहोचतात.
  •  हे नवयुवक लहान आकाराचे आणि पंखहीन असतात.
  •  रोपांच्या पातींवर रसशोषण करतात आणि रोपांच्या नवीन पातींच्या कोवळ्या भागावर आढळतात.

प्रौढ अवस्था (Adult Stage)

  •  प्रौढ मावा पंखयुक्त किंवा पंखहीन असू शकतात.
  • प्रौढ मावा साधारणतः काळ्या रंगाचे असतात. 
  • पंखहीन  साधारणतः पातींच्या खालच्या बाजूस आढळतात आणि आणि तिथेच रसशोषण करतात.
  •  पंखयुक्त प्रौढ पतंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडतात आणि तिथे प्रजोत्पादन करतात.

प्रजनन (Reproduction)

  • प्रौढ मादी मावा पार्थेनोजेनेसिसद्वारे (अंड्यांशिवाय नव्या अफिडचा जन्म) प्रजोत्पादन करतात.
  • या प्रक्रियेमुळे एकाच हंगामात मावा या किडीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
  • या किडीचे संपूर्ण जीवनचक्र 7 ते 10 दिवसांमध्ये पूर्ण होते. त्यांचे जीवनचक्र कमी दिवसात पूर्ण होत असल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव जलद गतीने होत असतो.
पोषक वातावरण 

कांद्यावरील मावा कीड Neotoxoptera formosana या कीटकासाठी अनुकूल हवामान हे त्यांच्या जलद प्रजनन आणि प्रसारासाठी महत्त्वाचे ठरते. खाली कांद्यावरील मावा किडीच्या वाढीसाठी पोषक हवामानाविषयी माहिती दिली आहे.

मावा किडीसाठी अनुकूल हवामान

  1. तापमान
    मावा किडीच्या वाढीसाठी 20-30 अंश सेल्सिअस तापमान पोषक असते. या तापमानामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो.
  2. आर्द्रता
    60-80% आर्द्रता मावा किडीसाठी अत्यंत अनुकूल ठरते. हवेतील आर्द्रता अधिक असली की मावा किडीच्या संख्येत झपाट्याने वाढ होते.
  3. हवामानातील बदल
    कोरडे व गरम वातावरण, विशेषतः उन्हाळ्यात, मावा किडीचा प्रादुर्भाव कमी होतो, परंतु थंड आणि दमट वातावरण (हिवाळ्यात आणि पावसाळ्यात) या किडीच्या वाढीस प्रोत्साहन देतो.
  4. पानावरील ओलावा
    कांदा पिकावरून ओलावा सतत असेल, तर मावा कीटकाचे जीवन चक्र अधिक सक्रिय होते. त्यामुळे, ओलसर किंवा दाट रोपवाटिकांमध्ये मावा कीड अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.
किडीचा प्रादुर्भाव कसा ओळखवा  

✅ मावा कीड ही कांदा पातीच्या खालच्या बाजूस पातीच्या वेणी मध्ये व कोवळ्या पातींवर आढळून येते. त्यासाठी कांदा पिकामध्ये मावा किडीचे निरीक्षण करताना व्यवस्थितपणे पातीच्या आतमध्ये कीड दिसत आहे का तसेच कोवळ्या भागांवर किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे का याचे निरीक्षण करावे.

✅ मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे किंवा मावा किडीने रस शोषण केल्यामुळे पातीवर पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात, पात वाकडी होते तसेच रोपांची वाढ खुंटते अशा प्रकारची लक्षणे प्लॉटमध्ये दिसत आहेत का ते पाहावे.

एकात्मिक नियोजन 

एकात्मिक नियोजन म्हणजे शेतामध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर एका वेळेस उपाययोजना करणे होय.

✅ शेताची मशागत
शेताची नांगरट करून 15 ते 20 दिवस उन्हात तापून द्यावे, त्यामुळे सूर्यप्रकाशामुळे किडींचे कोष निष्क्रिय होते तसेच फणपाळी मारून शेतामधील जुन्या पिकांचे अवशेष,तणांचे अवशेष शेताच्या बाहेर फेकून द्यावेत जेणेकरून त्या अवशेषांबरोबर किडींचे कोष शेताच्या बाहेर जातील व किडींचा प्रादुर्भाव होण्याअगोदर नियंत्रण मिळेल
 सापळा पिकांची लागवड
शेताच्या चारही बाजूंनी सापळा पिके म्हणजेच मका,झेंडू यांसारख्या पिकांची लागवड करावी.जेणेकरून किडीचा प्राथमिक प्रादुर्भाव हा सापळा पिकांवर होईल व मुख्य शेतामध्ये प्रादुर्भाव होण्याअगोदर उपाययोजना करण्यास आपणास वेळ मिळेल. 

इन्सेक्ट नेट लावणे
शेताच्या चारही बाजूस पाच ते सात फुटांपर्यंत इनसेक्ट नेट लावावे,जेणेकरून वाऱ्याबरोबर उडत येणाऱ्या किडींना शेताच्या बाहेरच रोखता येईल व मुख्य क्षेत्रांमध्ये प्रादुर्भाव होणार नाही.

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे शेतामध्ये मावा या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपाययोजना करणे.

सापळे लावणे
शेतामध्ये योग्य प्रमाणात निळे पिवळे रंगाची चिकट सापळे लावावेत व वेळोवेळी त्त्यांचे निरीक्षण करून प्रादुर्भावाची लक्षणे आढळल्यास योग्य ती फवारणी करावी जेणेकरून शेतामध्ये प्रादुर्भाव होण्याअगोदर किडींवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल.
✅ निरीक्षण करणे
शेताच्या बाजूने असलेल्या सापळा पिकांचे, इंसेक्ट नेटचे व शेतामध्ये लावलेल्या निळ्या पिवळ्या चिकट सापळयांचे वेळोवेळी निरीक्षण करावे. त्यावर प्रादुर्भाव झालेला आहे का ते पहावे, त्याचबरोबर प्रादुर्भाव झाला असेल तर त्याचे प्रमाण किती आहे याचे निरीक्षण करून मुख्य शेतामध्ये योग्य त्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
रोपांवर प्रक्रिया करणे
शेतामध्ये रोपांची पुर्नलागवड करताना रोपांवर कीटकनाशकाची प्रक्रिया करावी जेणेकरून रोप लागवड केल्यानंतर रोपांवर कीटकनाशकाचा रासायनिक थर असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव होणार नाही.रोपांवर प्रक्रिया कशी करावी याची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर किंवा निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करावे.
नायट्रोजनचे प्रमाण कमी ठेवणे
नायट्रोजनचा अतिवापर केल्यास रोपांना कोवळापणा जास्त येतो रोपांच्या हिरवापणा वाढतो त्यामुळे किडी जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होतात व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळवण्यासाठी योग्यता प्रमाणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण ठेवावे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.
✅ तणनियंत्रण करणे
शेतामध्ये जर जास्त प्रमाणात तण आले तर किडींचा प्रादुर्भाव ही मोठ्या प्रमाणावर वाढतो त्यामुळे वेळीच लहान तण असताना योग्य त्या  तणनाशकाची फवारणी करावी किंवा भांगलण करून त्यावर नियंत्रण मिळवावे.
पाणी नियोजन
योग्य प्रकारे पाणी नियोजन केल्यास जास्त ओलावा राहत नाही व मावा या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये वाढत नाही. त्यामुळे रोपांची गरज वातावरण मातीचा प्रकार जलसिंचन प्रकार याचा अभ्यास व माहिती घेऊन पाण्याचे नियोजन करावे जेणेकरून मावा या किडीवर येण्याअगोदर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळवता येईल.
फवारणी नियोजन
फवारणी करताना वेळोवेळी योग्यता कीटकनाशकाचा वापर फवारणी मध्ये करावा जेणेकरून रोपांवर रासायनिक थर तयार होतो व किडीचा प्रादुर्भाव होत नाही.उदाहरणार्थ नीम ऑइलचा वापर केल्यामुळे पातींवर कडवटपणा वाढतो व किडींचा प्रादुर्भाव टाळला जातो.
✅ सिलिकॉनचा वापर
सिलिकॉनचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे पातींचा जो काय आहे तो कडकपणा वाढतो ज्यामुळे रस शोषक किडीना पातींवर रस शोषण करता येत नाही ज्यामुळे किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.

उपचारात्मक उपाययोजना 

✅कांदा पिकावर जर किडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर रोपांची वाढीची अवस्था लक्षात घेऊन खालीलपैकी एका कीटकनाशकाचा वापर योग्य प्रकारे करावा.