कांदा रोप लागवडीनंतर करायचे ठिबक खतांचे नियोजन.
कांदा पिकात ठिबकद्वारे विद्राव्य खतांचे नियोजन करत असताना रोपांच्या वाढीच्या अवस्था लक्षात घेणे गरजेचे आहे. कांदा रोपांच्या वाढीच्या अवस्था पुढीलप्रमाणे असतात.
- रोप रुजण्याची अवस्था
- रोप वाढीची अवस्था
- कंद निर्मितीची अवस्था
- कांदा वाढीची अवस्था
- कांदा काढणीची अवस्था
✅कांदा रोप लागवडीनंतर 15-20 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन.
- 13:40:13 – 4 kg प्रति एकर
- मॅग्नेशियम सल्फेट – 4 kg प्रति एकर
✅कांदा रोप लागवडीनंतर 25-30 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन
- 13:00:45 – 4 kg प्रति एकर
- कॅल्शियम नायट्रेट – 4 kg प्रति एकर
✅कांदा रोप लागवडीनंतर 35-40 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन
- DAP – 25 kg प्रति एकर 200 लिटर
(अगोदरच्या दिवशी DAP पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याची निवळी ठिबकद्वारे सोडावी)
✅कांदा रोप लागवडीनंतर 45-50 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन
- 12:11:18 – 4 kg प्रति एकर
(अगोदरच्या दिवशी 100 लिटर पाण्यात हे खत भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याची निवळी ठिबकद्वारे सोडावी)
✅कांदा रोप लागवडीनंतर 60-65 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन
- 00:52:34 – 4 kg प्रति एकर
- मॅग्नेशियम सल्फेट – 4 kg प्रति एकर
- शक्तिमान – 5 लिटर प्रति एकर
✅कांदा रोप लागवडीनंतर 75-80 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन
- 13:00:45 – 4 kg प्रति एकर
- Hydrospeed – 4 kg प्रति एकर
- Isabion – 1 लिटर प्रति एकर
✅कांदा रोप लागवडीनंतर 85-90 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन
- 00 :42:47 – 4 kg प्रति एकर
- Biozyme Drip – 1 लिटर प्रति एकर
अशाप्रकारे रोपांच्या वाढीच्या अवस्था लक्षात घेऊन विद्राव्य खतांचे नियोजन करावे.