बोटट्रीस करपा
जबाबदार बुरशी
✅ कांदा पिकात रोप पुर्नलागवडीनंतर कांदा पिकाच्या जीवनचक्रात येणारा बोटट्रीस करपा हा Botrytis Squamosa या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.
पोषक वातावरण
✅ ज्यावेळी तापमान 15०C ते 25०C च्या दरम्यान असते व आद्रता ही 80 टक्के पेक्षा जास्त असते त्याचबरोबर धुके व सततचा रिमझिम पाऊस पडत असतो अशा वातावरणात या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
✅ या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा रोग रुजण्याच्या अवस्थेत, कंद निर्मितीच्या अवस्थेत, कंद फुगवणीच्या अवस्थेत, रोपवाढीच्या अवस्थेत होतो.
लक्षणे
✅यामध्ये कांद्याच्या पातीवर पांढऱ्या रंगाचे एका पेक्षा जास्त ठिपके दिसतात. कालांतराने या पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांचा आकार व प्रमाण वाढते, ते एकमेकांमध्ये मिसळतात. जिथे चट्टे पडलेले आहेत तिथून पात पिचकते.पातीचे शेंडे मोठ्या प्रमाणामध्ये वाळायला लागतात.अशा प्रकारे या बुरशीजन्य रोगांची लक्षणे कांदा पातीवर प्रामुख्याने दिसतात.
प्रसार
✅ या बुरशीजन्य रोगांचा प्रसार कांदा पिकामध्ये जे काय सकाळी धुके पडते किंवा सतत पडणाऱ्या पावसामुळे किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यामुळे पातीवर सतत ओलावा निर्माण होतो. त्या ओलाव्यामार्फत एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये होत असतो. त्याचबरोबर सतत येणारे वारे,हवा यामुळे सुद्धा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव एका भागातून दुसऱ्या भागामध्ये होतो.यावेळेस आपण शेतामध्ये शेत काम करत असताना आपल्या हाताद्वारे किंवा शेत अवजारांद्वारे या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये होत असतो.
एकात्मिक उपाययोजना
✅एकात्मिक उपाययोजना म्हणजे शेतामध्ये येणाऱ्या एकापेक्षा जास्त अडचणींवर एकत्रितपणे उपाययोजना करणे होय.यामध्ये आपण खालील एकात्मिक उपाय योजना करणे गरजेचे आहे.
शेताची निवड :
शेताची निवड करताना अशा जमिनीची निवड करा की ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम असावी, म्हणजेच काळी-तांबट किंवा तांबट जमिनीची निवड लागवडीसाठी करावी. जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या काळ्या किंवा गाळाच्या मातीची निवड लागवडीसाठी करू नये. जेवढा जास्त काळ ओलावा राहतो, तेवढा या बुरशीचा प्रादुर्भाव जलद व प्रसार गतीने होतो. त्याचबरोबर अशा जमिनीची निवड करा ज्या जमिनीमध्ये पाणी व पाण्याचा निचरा लवकर होईल. जेणेकरून रान लवकर वाफस्यावर येईल व कोरडे होईल.
शेताची मशागत :
शेताची निवड केल्यानंतर शेताची मशागत करताना शेत खोलवर नांगरून 15 ते 20 दिवस उन्हामध्ये तापून द्यावे. त्यानंतर तणांचे अवशेष व मागील पिकांचे अवशेष शेताच्या बाहेर गोळा करून टाकून द्या जेणेकरून त्याबरोबर बुरशीचे बीजाणू शेताच्या बाहेर जातील.सारे किंवा गादीवाफे उतार बघून सोडा जेणेकरून पाणी शेतामध्ये साठणार नाही व पाण्याचा निचरा होऊन लवकर सुकेल. अशा प्रकारे शेताची मशागत केल्यास पुर्नलागवडीनंतर रोपांची मर होणार नाही.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
✅ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे रोपांची मर होऊ नये म्हणून अगोदरच हव्या त्या उपाययोजना करणे होय. रोपांना बुरशीचा प्रादुर्भाव होऊ न देणे व बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होण्यापासून रोखणे गरजेचे आहे.त्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.
रोप प्रक्रिया :
रोपांवर लागवडी अगोदर जर बुरशीनाशकांची प्रक्रिया केली तर रोप लागवडीनंतर रोपांवर पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. रोपप्रक्रिया केल्यामुळे रोपांच्या मुळांवर एक रासायनिक थर तयार होतो. ज्यामुळे बुरशीचे बीजाणू रोपांच्या मुळांवर अंकुरु देऊ शकत नाहीत.रोप प्रक्रिया अशाप्रकारे करावी याची सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
योग्य पाणी नियोजन :
बुरशीचा प्रादुर्भाव हा तेव्हा होतो जेव्हा शेतामध्ये जास्त काळ गरजेपेक्षा जास्त ओलावा असतो. ओलाव्यामध्ये या बुरशीचे बीजाणू मुळांवर अंकुरतात व ओलाव्यामार्फत एका भागातून दुसऱ्या भागात पसरतात. त्यासाठी या बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी योग्य प्रकारे मातीच्या गुणवत्तेनुसार व प्रकारानुसार पाणी नियोजन करणे गरजेचे आहे. याची माहिती घेण्यासाठी खालील फोटो किंवा लिंक वर क्लिक करा.
फवारणी नियोजन :
रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर पहिले पाणी देऊन खालीलपैकी एक फवारणी केल्यास रोपांची मर ही रोपवाटीकेमध्ये होणार नाही.
उपचारात्मक उपाययोजना
✅उपचारात्मक उपाययोजना म्हणजे रोपांची मर होत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायच्या उपाययोजना. यामध्ये पहिली उपायोजना आहे या बुरशीचा प्रसार रोखणे. बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी या रोगांची लक्षणे दिसायला लागली की शेताचे पाणी बंद करावे. जेणेकरून शेत कोरडे होईल व बुरशीचा प्रादुर्भाव एका भागातून दुसऱ्या भागात होणार नाही
फवारणी नियोजन :
आपल्या शेतामध्ये जर रोपांची मर होऊ लागली असेल तर खालील पैकी एक फवारणी दाट करावी. .