कमतरता कशी ओळखावी?

✅ कांदा पिकात कॅल्शियम कमतरता आल्यानंतर पातींचे शेंडे पिवळे न पडता एकदम वाळायला लागतात व पाती वरून करपायला लागतात. यामुळे अशा प्रकारची लक्षणे आपल्या प्लॉटमध्ये दिसायला लागल्यावर आपल्या प्लॉटमध्ये कॅल्शियम कमतरता आहे असे समजावे.

कॅल्शियमची कार्य 

रोपांची मुळे सेट होण्यासाठी कॅल्शियम हा रोपांच्या मुळांच्या पेशीभित्तिकांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक आहे.ज्यामुळे रोपांची मुळे मजबूत होतात. कॅल्शियम हे रोपांच्या मुळांच्या टोकांच्या खोलवर वाढ करते.कॅल्शियमचा वापर ठिबकद्वारे केल्यानंतर मुळांद्वारे शोषण करून ते मेरीस्टेम मध्ये पाठवले जाते व रोपांची वाढ करणारी ऑक्सिजनची निर्मिती व कार्यक्षमता वाढते. यामुळे रोपांच्या मुळांचा व वरील भागांचा विकास होतो.

रोपांची वाढ व विकास
कॅल्शियम हा रोपांच्या पेशीभीती निर्मितीमधील महत्त्वाचा घटक आहे. जो वनस्पतींच्या पेशीभित्तिकांना मजबूत करतो.कॅल्शियम हा पेशी विभाजनाचे काम करतो ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
✅कॅल्शियम हा नायट्रोजन फिक्सेशन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्यामुळे रोपांना शोषण करता येईल असा नायट्रोजन मिळतो व सुरुवातीच्या टप्प्यात रोपांची वाढ होते.

जैविक व अजैविक ताणांपासून संरक्षण
कॅल्शियम हे एक अत्यावश्यक पोषक तत्त्व आहे जे रोपांची जैविक व अजैविक ताणांविरुद्ध सहनशक्ती वाढवते. जेव्हा रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो त्या भागातील सायटोसेल मध्ये कॅल्शियम सिगनेचर जमा होतात व संरक्षण प्रथिने नियंत्रित करण्यात तसेच  रोगकारक बुरशींच्या विरोधासाठी Proteinkinaseas Calcium Calmodulins,Calcineurin यांसारख्या प्रथियांना कार्यरत करतात. ज्यामुळे रोपे बुरशीजन्य रोगाला विरोध करतात.
✅ रोपांमध्ये येणाऱ्या ताणांचे संदेशवहन करण्यासाठी कॅल्शियम महत्वाची भूमिका बाजावते. ज्यामुळे प्रतिकार यंत्रणा कार्यरत होते. 

कांद्यांची गुणवत्ता व वजन
कॅल्शियम कांद्याला बुरशीजन्य रोगांचा ताण सहन करण्यास व त्या विरुद्ध प्रतिकार करण्यास मदत करतो. ज्यामुळे कांदा काढणीनंतर कांदा जास्त दिवस साठवणूक केला जाऊ शकतो. ज्या कांद्यामध्ये कॅल्शियम पातळी कमी आहे अशा कांद्याची साठवणूक खराब होत नाही.
कॅल्शियम चा वापर केल्याने कांदा पत्नी तयार होते तसेच कांद्याला नैसर्गिक रंग व चकाकी येते.
कॅल्शियम चा वापर केल्यामुळे पेशी विभाजन व निर्मिती होते त्यामुळे कांद्याचे वजन चांगल्या प्रकारे वाढते. 

कॅल्शियम कमतरता येण्याची कारणे 

कॅल्शियम कमतरतेची अनेक कारणे आहेत ती खालील प्रमाणे:  

मातीचा प्रकार
✅मातीचा प्रकार म्हणजेच मातीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणवत्तेनुसार कॅल्शियम कमतरतेची लक्षणे दिसतात. ज्यामध्ये ज्या हलक्या म्हणजेच कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या जमिनी आहेत अशा जमिनीत कॅल्शियम कमतरता जाणवते.
ज्या जमिनी आम्लयुक्त आहेत अशा जमिनीतून रोपांना कॅल्शियम शोषण करता येत नाही त्यामुळे अशा जमिनीत कॅल्शियम कमतरता जाणवते. 

पाणी नियोजनातील चूक
✅कांदा पिकामध्ये पाणी नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे जर जास्त पाणी झाले तर रोपांच्या मुळांना अन्नद्रव्य शोषण करता येत नाही, ज्यामध्ये कॅल्शियम सारख्या अन्नद्रव्याचे शोषण सुद्धा होत नाही व परिणामी कॅल्शियम कमतरता जाणवते.
✅तसेच जास्त पाणी झाल्यामुळे पाणी शेताच्या बाहेर वाहून गेले तर त्या पाण्याबरोबर कॅल्शियम सुद्धा मुळांच्या कक्षे बाहेर लिचआऊट होऊन जातो.

तापमानातील चढ-उतार
✅रोपांद्वारे होणारे कॅल्शियम शोषण यावर तापमान थेट परिणाम करतो.ठराविक श्रेणीच्या वर तापमान गेले व ठराविक श्रेणीच्या खाली तापमान आहे तरी रोपे कॅल्शियम सारखी अन्नद्रव्ये  शोषण करू शकत नाहीत. परिणामी कमतरता जाणवते.

प्रकाशाची गुणवत्ता व प्रमाण
✅ज्यावेळेस सूर्यप्रकाश जास्त व चांगल्या गुणवत्तेचा असतो व अशा वातावरणीय परिस्थितीमध्ये कांदा रोपांची मुळे पाणी शोषण कमी करतात व त्यामुळे कॅल्शियम व इतर अन्नद्रव्ये शोषण कमी होते आणि कॅल्शियम कमतरता लक्षणे दिसतात. 

क्षारांचे प्रमाण
✅जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असेल तर त्याचा थेट परिणाम रोपांच्या मुळांच्या पाणी शोषण,अन्नद्रव्ये शोषण अशा कार्यावर होतो. या कार्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे अन्नद्रव्ये  शोषण घटते व कॅल्शियम कमतरतेची लक्षणे दिसतात.

एकात्मिक उपाययोजना 

✅ जमिनीची निवड 
कॅल्शियम कमतरता ही हलक्या म्हणजे कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या (लांबट,मुरमाड,वाळूसार) जमिनीत जाणवते त्यामुळे जमिनीची निवड करताना अशा जमिनीची निवड करू नये.तसेच ज्या जमिनी आम्लयुक्त आहेत अशा जमिनीत कॅल्शियम शोषण कमी होते त्यामुळे अशा जमिनीची निवड लागवडीसाठी करू नये.तसेच क्षारयुक्त जमिनीत अन्नद्रव्ये शोषण कमी असते. त्यामुळे अशा जमिनीची निवड सुद्धा निवड करू नये. 

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

✅ योग्य खत नियोजन 
जमिनीची निवड केल्यानंतर त्या जमिनीची गुणवत्ता व  पिकाची गरज या गोष्टींचा अभ्यास करून योग्य खत नियोजन करावे.
खत नियोजन विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटोवर क्लिक करा.

✅ योग्य पाणी नियोजन 
मातीचा प्रकार, गुणवत्ता व वातावरण यांचा अभ्यास करून योग्य प्रकारे पाणी नियोजन करा. जर योग्य प्रकारे पाणी नियोजन केले तर रान जास्तीत जास्त काळ वाफस्यावर राहते व अन्नद्रव्ये शोषण वाढते आणि कॅल्शियम कमतरता भासत नाही.
रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करा. 

✅ पावसानंतरचे नियोजन
पावसानंतर कॅल्शियम कमतरता येऊ नये म्हणून खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबक द्वारे करावा. 

उपचारात्मक उपाययोजना 

कॅल्शियम कमतरता लक्षणे दिसत असतील तर खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबकद्वारे करावा.