Crop: कांदा | Topic: B.कांदा लागवडीनंतरचे नियोजन

कांदा काढताना कोणती काळजी घ्यावी? 

कांदा काढताना खालील गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे.

कांदा काढणी योग्य झाला आहे का हे तपासणे. 

✅कांदा काढणी करण्यापूर्वी तो कांदा काढणी योग्य झाला आहे का हे तपासण्यासाठी बियाण्याच्या वाणाची माहिती घ्या. त्यावरून काढणीचा कालावधी ठरवता येतो,तसेच रोपांच्या पाती पिवळ्या पडल्या आहेत का ते पहा. कांद्याची मुळे वाढली आहेत का ते पहा. कांद्याला आकार, नैसर्गिक रंग व पत्ती आली आहे का ते पहा. यावरून कांदा काढणी  योग्य झाला आहे का ते समजते.
कांदा काढणी योग्य झाला आहे का याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या  रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करा.

कांदा काढणीपूर्वी पाणी कधी बंद करावे 

✅कांदा काढणीपूर्वी पाणी बंद केल्यामुळे कांदा सोप्या पद्धतीने काढता येतो,कांदा काढणीपूर्वी पाणी कधी बंद करावे. यासाठी मातीचा प्रकार,जलसिंचन प्रकार,बियाणे वाण याचा अभ्यास करून पाणी बंद करावे. सर्वसाधारण लागवडीपूर्वी  15 ते 20 दिवस अगोदर पाणी बंद करावे.
कांदा काढणी पूर्वी किती दिवस अगोदर पाणी बंद करावे याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करावे. 

कांदा काढताना घ्यायची काळजी 

✅कांदा उपटल्यानंतर पाती एका साईडला व कांदा एका साईडला शेतामध्ये रास लावावी जेणेकरून कांदा लवकर सुटेल व त्याची कापणी करता येईल.
✅कांदा काढल्यानंतर वातावरणाचा अंदाज घ्यावा. जास्त तापमान असेल तर कांदा सुकवताना त्याला चटका बसून कांदा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी कांदा जास्त ऊन असेल तर सावलीला सुकवावा. तसेच पावसाचा अंदाज घेऊन कांदा निवाऱ्याला ठेवावा.जर कांदा भिजला तर कांदा नासून जातो किंवा कांदा टिकवण क्षमता कमी होते.
✅कांदा काढणीपूर्वी जर कांद्याची मान पडली नसेल तर त्यावरून बॅलट फिरवावा जेणेकरून मान पडेल व कांदा काढणी योग्य होइल.
कांदा काढल्यानंतर, सुकल्यानंतर त्याची पात कापावी. पात  व्यवस्थित कापावी कारण पातीची कापणीनुसार त्याची टिकवण क्षमता ठरते
कांदा पात कशी कापावी याची माहिती घेण्यासाठी खाली निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटोवर क्लिक करा. 

अशा प्रकारे कांदा काढणीपूर्वी किंवा कांदा काढताना काळजी घ्यावी.