रोप लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी करायचे खत नियोजन
✅कांदा रोपांच्या वाढीसाठी खालील प्रमाणात मुख्य,दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.
- नायट्रोजन – 56 kg – 68 kg प्रति एकर
- फॉस्फरस – 24 kg ते 28 kg प्रति एकर
- पोटॅश – 32 kg ते 40 kg प्रति एकर
- कॅल्शियम – 12 kg ते 20 kg प्रति एकर
- मॅग्नेशियम – 4 kg ते 6 kg प्रति एकर
- सल्फर – 10 kg ते 12 kg प्रति एकर
- Zinc – 1 ते 2.2 kg प्रति एकर
- फेरस – 1.6 ते 2.5 kg प्रति एकर
- बोरॉन – 0.5 kg ते 1 kg प्रति एकर
✅कांदा लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी वरील अन्नद्रव्यांपैकी पोटॅश,कॅल्शियम,मॅग्नेशियम,सल्फर,बोरॉन या अन्नद्रव्यांची पूर्तता करावी. त्यासाठी रोप लागवडीनंतर 60 दिवसांनी खालील खते टाकावीत.
- Polysulphate 25 kg प्रति एकर
- 12:11:18 – 25 kg प्रति एकर
- MOP – 25 kg प्रति एकर
- Zinc Sulphate – 5 kg प्रति एकर
- Boron 20%-1 kg प्रति एकर
- Ferous Sulphate – 5 kg प्रति एकर
✅वरील खते लागवडीनंतर 60 दिवसांनी टाकल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ तंतुमय होईल.पाती हिरव्यागार राहतील कांद्याचा आकार वाढेल व कांद्याला नैसर्गिक रंग व पत्ती येईल.