Fungicide Digital PDF

भारतामध्ये विकले जाणारे बुरशीनाशक ग्रुप व बुरशीनाशक घटक माहिती.

मुख्य ग्रुप

✅PA-fungicides (PhenylAmides)

मुख्य ग्रुप FRAC कोड 

✅4

रासायनिक ग्रुप

✅Acylalanines

रासायनिक घटक

✅ Metalaxyl

Metalxyl या बुरशीनाशकचा  प्रकार कोणता आहे?

✅Metalxyl हे आंतरप्रवाही क्रिया करणारे बुरशीनाशक आहे ?

Metalxyl हे बुरशीनाशक बुरशीवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवते?

✅हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशींमध्ये RNA संशलेशन थांबवते व बुरशीची वाढ,प्रसार व आणि पुनरुत्पादन थांबवून बुरशीवर नियंत्रण मिळवते.

Metalxyl हे बुरशीनाशक बुरशीवर प्रतिबंधात्मक व 
उपचारात्मक नियंत्रण मिळवते ?

✅प्रतिबंधात्मक नियंत्रण (Preventive action):
Metalaxyl आतमध्ये शोषले गेले की, ते बुरशीच्या बीजाणूंना अंकुरण्यापूर्वी नष्ट करतं. त्यामुळे बुरशिजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच त्यावर प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळवता येते.
✅ उपचारात्मक नियंत्रण (Curative action):
जर बुरशीचा संसर्ग झालाच असेल, तर Metalaxyl बुरशीच्या वाढत्या पेशींमध्ये प्रवेश करून RNA synthesis थांबवते, त्यामुळे बुरशीचे वाढणे थांबते आणि हळूहळू बुरशी नष्ट होते.

भारतमध्ये metalxyl ची कोणती Formulations विकली जातात ?

✅Metalaxyl 35 % sc
✅Metalaxyl 35 % WP
✅Metalaxyl 3.3% + Chlorothalonil SC 33.1%
✅Metalaxyl 4%+Manconzeb 64% WP
✅Metalaxyl 8% + Mancozeb 64% WP

भारतमध्ये metalxyl ची मार्केट प्रॉडक्ट कोणती विकली जातात ?

✅Syngenta Apron XL : Metalaxyl 35 % sc
✅Advance Pesticide Matrix : Metalaxyl 35 % WP
✅Syngenta Foliogold : Metalaxyl 3.3% + Chlorothalonil SC 33.1%
✅Syngenta RidomilGold : Metalaxyl 4%+Manconzeb 64% WP
✅TATA Master : Metalaxyl 8% + Mancozeb 64% WP

metalxyl या बुरशीनाशकचा वापर कशाप्रकारे करावा ?

✅बीजप्रक्रियासाठी
✅मुळांच्याद्वारे
✅फवारणीद्वारे

Apron XL शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार Apron XL चा वापर बीजप्रक्रियासाठी करावा.

पिकाचे नाव लक्ष्यित बुरशिजन्य रोग शिफारस केलेले प्रमाण (प्रति किलो बियाणे)
मका (Corn) पीथीयम रोपमर, डाऊनी मिल्ड्यू 2.4 मि.ली.
मोहरी (Mustard) पीथीयम रोपमर, डाऊनी मिल्ड्यू 3.5 मि.ली.
बाजरी (Pearl millet) पीथीयम रोपमर, डाऊनी मिल्ड्यू 2 मि.ली.
ज्वारी (Sorghum) पीथीयम रोपमर, डाऊनी मिल्ड्यू 2 मि.ली.
सूर्यफूल (Sunflower) डाऊनी मिल्ड्यू 2 मि.ली.
मिरची (Chili) पीथीयम रोपमर, डाऊनी मिल्ड्यू 2 मि.ली.
टोमॅटो (Tomato) पीथीयम रोपमर, डाऊनी मिल्ड्यू 2 मि.ली.

✅टिप : वरील सर्व माहिती Syngenta कंपनी शिफारसीनुसार आहे.

Matrix शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार Matrix चा वापर फवारणी साठी करावा.

पिकाचे नाव लक्षित रोग प्रमाण (ग्राम / एकर)
ज्वारी (Sorghum) डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) 70 – 100
सूर्यफूल (Sunflower) पांढरी गंध (White rust), फिलिपिन डाऊनी मिल्ड्यू (Philippine Downy Mildew) 70 – 100
मोहरी (Mustard) पांढरी गंध (White rust), डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) 70 – 100
मका (Maize) डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew), ब्राऊन स्ट्राइप डाऊनी मिल्ड्यू (Brown Stripe Downy Mildew) 70 – 100
बाजरी (Bajra) डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) 70 – 100
भाजीपाला आणि फळझाडे (Vegetables & Fruit Crops) रस्ट (Rust) आणि पानांच्या ठिपक्यांचे रोग (Leaf Spot), फळकुज (Fruit Root) 70 – 100
बागायती व लागवडी पिके (Horticulture & Plantation Crops) रस्ट (Rust) आणि पानांच्या ठिपक्यांचे रोग (Leaf Spot) 200 – 300

✅टिप:वरील सर्व माहिती Advance Pesticide कंपनी शिफारसीनुसार आहे.

Syngenta Foliogold शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार Syngenta Foliogold चा वापर हा फवारणीसाठी करावा.

पिक लक्ष्यित रोग प्रमाण
बटाटा उशीरा येणारा करपा (Late Blight) 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी
टोमॅटो उशीरा येणारा करपा (Late Blight) 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी
कांदा डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी

✅टिप : वरील सर्व माहिती Syngenta कंपनी शिफारसीनुसार आहे.

Syngenta Ridomilgold शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार Syngenta Ridomil Gold चा वापर फवारणीसाठी करावा.

पिक लक्षित बुरशिजन्य रोग प्रमाण फवारणीची पद्धत
बटाटा लेट ब्लाईट (Late Blight) 2.5 ग्रॅम/लिटर पाणी फवारणीद्वारे
टोमॅटो लेट ब्लाईट (Late Blight) 2.5 ग्रॅम/लिटर पाणी फवारणीद्वारे
डाळिंब फल सड (Fruit Rot), तेल्या 2.5 ग्रॅम/लिटर पाणी फवारणीद्वारे
द्राक्ष डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) 2.5 ग्रॅम/लिटर पाणी फवारणीद्वारे
कांदा डाऊनी मिल्ड्यू 2.5 ग्रॅम/लिटर पाणी फवारणीद्वारे

✅टिप : वरील सर्व माहिती Syngenta कंपनी शिफारसीनुसार आहे.

TATA Master शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार TATA Master चा वापर फवारणीसाठी करावा.

पिकाचे नाव लक्ष्यित बुरशिजन्य रोग शिफारस केलेले प्रमाण
बटाटा (Potato) उशिरा करपा (Late Blight) 2.5 किग्रॅ/हेक्टर
डाळिंब (Pomegranate) पानांवरील सरकोस्पोरा ठिपके, फळकुज (Cercospora Leaf Spot, Fruit Rot) 2 ग्रॅम/लिटर पाणी
मिरची (Chili) ओलसर करपा (Wet Rot) 2 ग्रॅम/लिटर पाणी
फुलकोबी (Cauliflower) भुरी, पानांवरील ठिपके (Powdery Mildew, Leaf Spot) 2 ग्रॅम/लिटर पाणी
द्राक्षे (Grapes) डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) 2.5 किग्रॅ/हेक्टर
मोहरी (Mustard) पांढरी गंज, अल्टरनॅरिया ब्लाइट (White Rust, Alternaria Blight) 2.5 किग्रॅ/हेक्टर
बाजरी (Pearl Millet) डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) 2 किग्रॅ/हेक्टर
तंबाखू (Tobacco) डॅम्पिंग ऑफ, लीफ ब्लाइट, ब्लॅक शँक (Damping Off, Leaf Blight, Black Shank) 2 किग्रॅ/हेक्टर
टोमॅटो (Tomato) लवकर व उशिरा करपा (Early & Late Blight) 2.5 किग्रॅ/हेक्टर
कांदा (Onion) डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) 2.5 किग्रॅ/हेक्टर
फ्रेंच बीन्स (French Beans) डॅम्पिंग ऑफ (Damping Off) 2.5 किग्रॅ/हेक्टर
काकडी (Cucumber) डॅम्पिंग ऑफ (Damping Off) 2.5 किग्रॅ/हेक्टर
कोबी (Cabbage) डॅम्पिंग ऑफ (Damping Off) 2.5 किग्रॅ/हेक्टर

✅टिप : वरील सर्व माहिती TATA Rallis कंपनी शिफारसीनुसार आहे.


मुख्य ग्रुप

✅MBC-fungicides (Methyl Benzimidazole Carbamates)

मुख्य ग्रुप FRAC कोड 

✅1

रासायनिक ग्रुप

✅benzimidazoles

रासायनिक घटक

✅carbendazim

Metalxyl या बुरशीनाशकचा  प्रकार कोणता आहे?

✅Carbendazim हे आंतरप्रवाही क्रिया करणारे बुरशीनाशक आहे ?

Carbendenzim हे बुरशीनाशक बुरशीवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवते?

हे बुरशीनाशक वानस्पतीच्या आत शोषले जाते आणि बुरशीच्या पेशींमध्ये कोशिकाभाजन (Cell Division) थांबवते. बुरशीच्या पेशींच्या β-tubulin प्रथिनाच्या निर्मितीमध्ये अडथळा आणते.त्यामुळे बुरशी वाढू शकत नाही आणि बुरशीवर नियंत्रण मिळते.

Carbendenzim हे बुरशीनाशक बुरशीवर प्रतिबंधात्मक व
उपचारात्मक नियंत्रण मिळवते ?

✅ प्रतिबंधात्मक नियंत्रण (Preventive action):
Carbendazim बुरशीच्या बीजाणूंची वाढ होण्याआधीच त्यांना जमिनीत किंवा पानांवर असलेल्या बीजाणूंना अंकुरणापासून रोखते आणि रोग होण्याआधीच झाडांचे संरक्षण करते. बीजप्रक्रिया व सुरुवातीच्या अवस्थेत वापरण्यास उपयुक्त आहे.
✅ उपचारात्मक नियंत्रण (Curative action):
जर वनस्पतीला आधीच बुरशीचा संसर्ग झाला असेल, तरी हे बुरशीनाशक झाडाच्या आतील ऊतींमध्ये जाऊन बुरशीचा वाढीचा केंद्रबिंदू बंद करते.त्यामुळे रोगाचा प्रसार थांबतो आणि लक्षणे कमी होतात.

भारतमध्ये carbendazim ची कोणती Formulations विकली जातात ?

✅Carbendazim 50% WP.
✅Carbendazim 46.27% SC.
✅Carbendazim 12% + Mancozeb 63% WP.

भारतमध्ये carbendazim ची मार्केट प्रॉडक्ट कोणती विकली जातात ?

✅Carbendazim 50% WP : Crystal Bavistin
✅Carbendazim 46.27% SC : Sulphur Mills Pearl
✅Carbendazim 12% + Mancozeb 63% WP : UPL SAAF

carbendazim या बुरशीनाशकचा वापर कशाप्रकारे करावा ?

✅बीजप्रक्रियासाठी
✅मुळांच्याद्वारे
✅फवारणीद्वारे

Crystal Bavistin शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार Bavistin चा वापर फवारणीसाठी व बीजप्रक्रियासाठी करावा.

पिकाचे नाव लक्ष्यित बुरशिजन्य रोग शिफारस केलेले प्रमाण (प्रति एकर) वापरण्याची पद्धत
भात (Paddy) ब्लास्ट, शीथ ब्लाइट, एरियल फेज 100-200 ग्रॅम / एकर, 2 ग्रॅम/किलो बियाणे फवारणी, बीजप्रक्रिया
गहू (Wheat) लूज स्मट 2 ग्रॅम/किलो बियाणे बीजप्रक्रिया
बार्ली (Barley) लूज स्मट 2 ग्रॅम/किलो बियाणे बीजप्रक्रिया
टॅपिओका (Tapioca) सेट रॉट 1 ग्रॅम / 10 लिटर पाणी फवारणी
कापूस (Cotton) लीफ स्पॉट 100 ग्रॅम / एकर फवारणी
भुईमूग (Groundnut) टिक्का लीफ स्पॉट 90 ग्रॅम / एकर फवारणी
रताळी (Sugar beet) लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू 80 ग्रॅम / एकर फवारणी
वाटाणा (Peas) पावडरी मिल्ड्यू 100 ग्रॅम / एकर फवारणी
बिन्स (Beans) पावडरी मिल्ड्यू 140 ग्रॅम / एकर फवारणी
वेलवर्गीय (Cucurbits) पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज 120 ग्रॅम / एकर फवारणी
वांगी (Brinjal) लीफ स्पॉट, फ्रूट रॉट 120 ग्रॅम / एकर फवारणी
सफरचंद (Apple) स्कॅब 2.5 ग्रॅम / 10 लिटर पाणी फवारणी
द्राक्षे (Grapes) अँथ्रॅक्नोज 120 ग्रॅम / एकर फवारणी
अक्रोड (Walnut) डाऊनी लीफ स्पॉट 3 ग्रॅम / 10 लिटर पाणी फवारणी
गुलाब (Rose) पावडरी मिल्ड्यू 1 ग्रॅम / 10 लिटर पाणी फवारणी
बोर (Ber) पावडरी मिल्ड्यू 10 ग्रॅम / 10 लिटर पाणी फवारणी

✅टिप:वरील सर्व माहिती Crystal कंपनी शिफारसीनुसार आहे.

Sulphur Mills Pearl शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार Sulphur Mills Pearl चा वापर फवारणीसाठी करावा.

शिफारस पिके लक्षित बुरशिजन्य रोग प्रमाण (मिली/लिटर पाणी)
भात (तांदूळ) शीथ ब्लाईट, ब्लीस्टिंग 1 मिली
मका लिफ स्पॉट, ब्लाईट 1 मिली
सोयाबीन अँथ्रॅक्नोज, लीफ स्पॉट 1 मिली
हरभरा कोळमाशी, बुरशीजन्य मर 1 मिली
भाजीपाला (टोमॅटो, वांगी, भेंडी) अँथ्रॅक्नोज, लीफ स्पॉट, फळांवरील बुरशी 1 मिली
द्राक्षे डाव्या, फळकूज 1 मिली
केळी लीफ स्पॉट, सिगाटोका 1 मिली

✅टिप:वरील सर्व माहिती Sulpher Mills कंपनी शिफारसीनुसार आहे.

UPL Saaf शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार UPL Saaf चा वापर फवारणीसाठी करावा.

पिके लक्षित बुरशिजन्य रोग प्रमाण
मिरची (Chili) फळकुज (Fruit rot), पानावरील डाग (Leaf spot), भुरी (Powdery mildew) 2 ग्रॅम/लिटर पाणी
द्राक्ष (Grape) अँथ्रॅकोज (Anthracnose), डावणी मिल्ड्यू (Downy mildew), भुरी (Powdery mildew) 2 ग्रॅम/लिटर पाणी
आंबा (Mango) अँथ्रॅकोज (Anthracnose), भुरी (Powdery mildew) 2 ग्रॅम/लिटर पाणी
भात (Paddy) ब्लास्ट (Blast) 2 ग्रॅम/लिटर पाणी
बटाटा (Potato) ब्लॅक स्कर्फ (Black scurf), अर्ली ब्लाईट (Early blight), लेट ब्लाईट (Late blight) 2.5 ग्रॅम/लिटर पाणी
चहा (Tea) ब्लॅक रॉट, ब्लिस्टर ब्लाईट, डायबॅक, ग्रे ब्लाईट, रेड रस्ट 2 ग्रॅम/लिटर पाणी

✅टिप : वरील सर्व माहिती UPL कंपनी शिफारसीनुसार आहे.

मुख्य ग्रुप

MBC-fungicides (Methyl Benzimidazole Carbamates)

मुख्य ग्रुप FRAC कोड 

✅1

रासायनिक ग्रुप

thiophanates

रासायनिक घटक

thiophanate-methyl

thiophanate-methyl या बुरशीनाशकचा  प्रकार कोणता आहे?

✅Carbendazim हे आंतरप्रवाही क्रिया करणारे बुरशीनाशक आहे ?

thiophanate-methyl हे बुरशीनाशक बुरशीवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवते?

हे बुरशीनाशक वानस्पतीच्या आत शोषले जाते आणि बुरशीच्या पेशींमध्ये कोशिकाभाजन (Cell Division) थांबवते. बुरशीच्या पेशींच्या β-tubulin प्रथिनाच्या निर्मितीमध्ये अडथळा आणते.त्यामुळे बुरशी वाढू शकत नाही आणि बुरशीवर नियंत्रण मिळते.

thiophanate-methyl हे बुरशीनाशक बुरशीवर प्रतिबंधात्मक व
उपचारात्मक नियंत्रण मिळवते ?

✅ प्रतिबंधात्मक नियंत्रण (Preventive action):
thiophanate-methyl फवारणी केल्यावर झाडाच्या पृष्ठभागावर किंवा आतून संरक्षण तयार होते व बुरशीचा प्रादुर्भाव होण्याआधीच तिची वाढ थांबवते.विशेषतः रोगाची सुरुवात होण्यापूर्वी वापरल्यास चांगले परिणाम मिळतात.
✅ उपचारात्मक नियंत्रण (Curative action):
जर झाडांना आधीच बुरशीचा संसर्ग झाला असेल, तेव्हा हे बुरशीनाशक बुरशीच्या आतल्या पेशींवर कार्य करते.पेशींचे विभाजन थांबवते आणि बुरशी नष्ट करते.

भारतमध्ये thiophanate-methyl ची कोणती Formulations
 विकली जातात ?

✅Thiophanate Methyl 70% WP
✅Thiophanate Methyl 41.7%SC
✅Thiophanate Methyl 44.8% + Kasugamycin 2.6% Sc
✅Thiophanate Methyl 45% + Pyraclostrobin 5% FS

भारतमध्ये thiophanate-methyl ची मार्केट प्रॉडक्ट कोणती 
विकली जातात ?

✅Thiophanate Methyl 70% WP : Biostadt Roko
✅Thiophanate Methyl 41.7%SC : Biostadt Roko Flo
✅Thiophanate Methyl 44.8% + Kasugamycin 2.6% Sc : Dhanuka Zanet
✅Thiophanate Methyl 45% + Pyraclostrobin 5% FS : BASF Xelora

thiophanate-methyl या बुरशीनाशकचा वापर कशाप्रकारे करावा ?

✅बीजप्रक्रिया
✅मुळांच्याद्वारे
✅फवारणीद्वारे

Biostadt Roko शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार Biostadt Roko चा वापर फवारणीसाठी करावा.

पिके (Crops) लक्षित बुरशिजन्य रोग (Target Fungal Diseases) प्रमाण (Dosage as per company)
द्राक्षे (Grapes) डावणी (Downy Mildew), भुरी (Powdery Mildew) 1 ग्रॅम/लिटर पाणी
भात (Paddy) शीथ ब्लाइट (Sheath Blight) 1.5 ते 2 ग्रॅम/लिटर पाणी
गहू (Wheat) रस्ट (Rust), ब्लाइट (Blight) 1.5 ग्रॅम/लिटर पाणी
टोमॅटो (Tomato) अर्ली ब्लाइट (Early Blight), लेट ब्लाइट (Late Blight) 1.5 ते 2 ग्रॅम/लिटर पाणी
मिरची (Chili) अँथ्रॅकनोज (Anthracnose), लीफ स्पॉट (Leaf Spot) 1.5 ते 2 ग्रॅम/लिटर पाणी
सोयाबीन (Soybean) फॉल्स स्मट, ब्लॅक स्पॉट (Black Spot) 1.5 ग्रॅम/लिटर पाणी
कांदा (Onion) पर्पल ब्लॉच (Purple Blotch) 1.5 ग्रॅम/लिटर पाणी
भाजीपाला (Vegetables) लीफ स्पॉट्स, ब्लाइट्स, डाऊनी मिल्ड्यू 1.5 ते 2 ग्रॅम/लिटर पाणी

✅टिप:वरील सर्व माहिती Crystal कंपनी शिफारसीनुसार आहे.

Biostadt Roko Flo शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार Biostadt Roko Flo चा वापर बीजप्रक्रियासाठी करावा.

शिफारस पिके रोगाचे सामान्य नाव प्रमाण (मिली/किलो बियाणे)
सोयाबीन रूट रॉट, डॅम्पिंग ऑफ, लीफ स्पॉट 3 मिली
हरभरा कोळमाशी, बुरशीजन्य मर 3 मिली
मका शीथ ब्लाईट, बुरशीजन्य बीज रोग 3 मिली
गहू बीजजंतूजन्य मर, लीफ ब्लाईट 3 मिली
भात (तांदूळ) शीथ ब्लाईट, ब्लास्ट 3 मिली

✅टिप:वरील सर्व माहिती Biostadt कंपनी शिफारसीनुसार आहे.

Dhanuka Zanet शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार Dhanuka Zanet चा वापर फवारणीसाठी करावा.

पिके (Crops) लक्षित बुरशिजन्य रोग (Target Fungal Diseases) प्रमाण (Dosage as per company)
टोमॅटो (Tomato) बॅक्टेरियल लीफ स्पॉट (Bacterial Leaf Spot) 400-500 मिली/एकर
टोमॅटो (Tomato) पाउडरी मिल्ड्यू (Powdery Mildew) 400-500 मिली/एकर

✅टिप:वरील सर्व माहिती Dhanuka कंपनी शिफारसीनुसार आहे.

BASF Xelora शिफारस पिके,लक्षित बुरशिजन्य रोग व प्रमाण

✅कंपनी शिफारसीनुसार BASF Xelora चा वापर बीजप्रक्रियासाठी करावा.

पिके (Crops) लक्षित बुरशिजन्य रोग (Target Fungal Diseases) प्रमाण (Dosage as per company)
तूर (Chickpea) मुळ कुज (Root Rot),Wilt 4 मिली/10 किलो बियाणे
सोयाबीन (Soybean) Seedling Disease 2–2.5 मिली/किलो बियाणे
भेंडी (Okra) Seedling Disease 3 मिली/किलो बियाणे
शेंगदाणा (Groundnut) Stem Rot 2–2.5 मिली/किलो बियाणे
बटाटा (Potato) ब्लॅक स्कर्फ (Black Scurf) 20 मिली/100 किलो बियाणे

✅टिप:वरील सर्व माहिती BASF कंपनी शिफारसीनुसार आहे.