कांदा लागवड केल्यानंतर गारांचा पाऊस किंवा मुसळधार पाऊस पडला तर कोणती काळजी घ्यावी?
कांदा लागवड केल्यानंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला किंवा गारा पडल्या तर खालील अडचणी येतात व त्यावर खालील फवारणी करावी.
रोप रुजण्याची अवस्था
✅रोप रुजण्याच्या अवस्थेत म्हणजेच रोप पुर्नलागवड ते पहिले 25 दिवस असताना जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर जास्त प्रमाणात शेतामध्ये पाणी साठते व जमिनीमध्ये अधिकचा ओलावा निर्माण झाल्यामुळे रोपांची मर होणे,रोपांना पिळ पडणे,रोपे पिवळी पडणे,यांसारख्या अडचणी येतात.तसेच पाती सतत ओल्या राहिल्यामुळे पातीवर बोटट्रीस करपा यांसारखे बुरशीजन्य रोग येतात. तसेच पातीवर पावसाचा मारा मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे पातींचे नुकसान होते.
✅या अडचणींवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाऊस पडल्यानंतर खालीलपैकी एका किटची फवारणी करावी.
रोप वाढीची अवस्था
✅रोप वाढीची अवस्था म्हणजे रोप पुर्नलागवड नंतर 20 दिवस ते 45-50 दिवस असताना जर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला तर जास्त प्रमाणात पाणी साठल्यामुळे जास्त ओलाव्यामार्फत पीथियम रोपमर,फुजारियम रोपमर यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.तसेच पाती जास्त काळ ओल्या राहिल्यामुळे पातींवर बोटट्रीस करपा, जांभळा करपा, स्टेमफायलियम करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर गारांचा पाऊस पडला तर पातींना जखमा होतात.त्या जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो,त्याचबरोबर वातावरण बदलामुळे रोपांवर नैसर्गिक ताण येतो. या अडचणी येतात.
✅या अडचणी येऊ नये म्हणून किंवा आल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खालीलपैकी एकाची फवारणी करावी.
कंद निर्मितीची अवस्था
✅कंद निर्मितीची अवस्था म्हणजेच रोप लागवडीनंतर 45 ते 50 दिवस ते 70 दिवस या कालावधीत कांदा पिकात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर अधिकचे पाणी साठल्यामुळे जमिनीत अधिकचा ओलावा निर्माण होतो.फुजारियम रोपमर,पांढरी मुळ कुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होतो.तसेच पाती ओल्या राहिल्यामुळे बोटट्रीस करपा,डाऊनी,जांभळा करपा,स्टेमफायलियम करपा,या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो,पातींवर जखमा झाल्यामुळे त्या जखमांमधून विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.अचानक विपरित परिस्थितीमध्ये पाऊस पडल्यामुळे रोपांवर नैसर्गिक ताण येतो. या अडचणी कांदा पिकात पाऊस पडल्यानंतर येतात.
✅या अडचणी येऊ नयेत म्हणून किंवा आल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खालीलपैकी एका किटची फवारणी करावी.
कांदा फुगवणीची अवस्था
✅कांदा फुगवणीची अवस्था हि रोप लागवडीनंतर 70 दिवसांपुढे असते. या अवस्थेत कांदा पिकात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साठते व जमिनीत अधिकचा ओलावा निर्माण झाल्यामुळे पांढरी मुळकुज या जमिनीतून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.तसेच पाती ओल्या राहिल्यामुळे बोटट्रीस करपा,स्टेमफायलियम करपा,जांभळा करपा,शेंडा करपा,डाऊनी या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.तसेच गारा किंवा मुसळधार पाऊस पडल्यामुळे पातींच्या जखमा होतात व या जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तसेच रोपांवर विपरीत पाऊस पडल्यामुळे रोपांवर नेसर्गिक ताण परिस्थितीत येतो.
✅या अडचणी येऊ नये म्हणून किंवा आल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खालीलपैकी एका किटची फवारणी करावी.
कांदा काढणीची अवस्था
✅कांदा काढणीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 120 दिवसांनी सुरू होते. या अवस्थेत जर मुसळधार किंवा गारांचा पाऊस पडला तर शेतात पाणी साठते व शेतात अधिकचा ओलावा निर्माण होतो. या ओलाव्यामर्फत पांढरी मळकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच पाती ओल्या राहिल्यामुळे बोटट्रीस करपा,डाऊनी,जांभळा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.
✅या अडचणी येऊ नयेत म्हणून किंवा आल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खालीलपैकी एका किटची फवारणी करावी.