कांदा रोपांची मुळांची वाढ व विकास रोपांच्या वाढीवर कशा प्रकारे परिणाम करतो?
कांदा रोपांच्या वाढीवर व विकासावर अनेक घटक परिणाम करतात. त्यातच रोपांच्या मुळांची वाढ व विकास रोपांच्या वाढीवर थेट परिणाम करतात ते खालील प्रमाणे.
रोपांच्या मुळांची कार्ये ही जमिनीतून पाणी, अन्नद्रव्यांचे शोषण करणे हे आहे.जेवढा मुळांचा विकास व वाढ होते, तेवढी मुळे जमिनीतून पाणी व पाण्याद्वारे अन्नद्रव्ये शोषण करतात व त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर होतो.मुळांद्वारे शोषण केलेले पाणी व अन्नद्रव्ये प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी वापरले जाते, परिणामी प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा दर वाढतो व रोपांची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होतो.
कांदा पिकांच्या मुळांची रचना
✅कांदा रोपांची मुळे ही फायब्रस रूट सिस्टीम या प्रकारात येतात. म्हणजेच कांद्याच्या बुडाला केसाळ मुळे असतात त्यासाठी खालील फोटो पहा.
✅कांद्याची मुळे ही सर्वसाधारण 15 ते 30Cm पर्यंत खोल वाढतात. परंतु मुळांची खोलवर वाढ होणे हे मातीच्या प्रकारावर व गुणवत्तेवर अवलंबून आहे. जर माती ही भुसभुशीत असेल व हलकी माती म्हणजेच(तांबट माती,काळी तांबट माती,मुरमाड माती,वाळूसार) मातीमध्ये मुळांची वाढ ही 28 ते 30Cm पर्यंत खोलवर होते.
उपाययोजना
कांद्याच्या रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शेताची निवड
✅शेताची निवड करताना पाण्याचा निचरा होईल, मातीचा सेंद्रिय कर्ब चांगला असेल अशा जमिनीची निवड लागवडीसाठी करावी.
✅कांदा लागवडीसाठी कशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करावे.
शेताची मशागत
✅शेताची मशागत खोलवर केल्यामुळे मातीचा भुसभुशीतपणा वाढतो व भुसभुशीत मातीत पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
✅कांदा लागवडीपूर्वी शेताची मशागत कशा प्रकारे करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करावे.
पाणी नियोजन
✅कांदा पिकास योग्य प्रकारे पाणी नियोजन केल्यास मुळांच्या कार्यक्षेत्रात वाफसा निर्माण होतो. वाफसा म्हणजे जमिनीचा दोन कणांमध्ये पाणी व हवेचे प्रमाण संतुलित असणे होय. वाफसा असलेल्या मातीत पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
✅कांदा पिकामध्ये पाणी नियोजन कसे करावे याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटोवर क्लिक करावे.
उत्पादनांचा वापर
✅जैविक उत्पादने – पांढऱ्या मुळांची वाढ करण्यासाठी खालील उत्पादने वापरावीत.
उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करावे.
✅पोषक उत्पादने – रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ करण्यासाठी खालील पोषक उत्पादने वापरावीत.
उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करावे.