Crop: कांदा | Topic: J.कांदा वाढीवर परिणाम करणारे घटक

कांदा रोपांच्या वाढीवर व विकासावर पातींची रूंदी,लांबी व हिरवेपणा कशा प्रकारे परिणाम करतो?

कांद्याच्या रोपांच्या वाढीवर व विकासावर परिणाम करणारे विविध घटक असतात. त्यातच रोपांच्या पातीची लांबी, रुंदी, पातीचा पसरटपणा,पातीचा हिरवेपणा हा रोपांच्या वाढीवर, विकासावर व उत्पादनावर थेट परिणाम करतो, तो खालीलप्रमाणे:

पातींचा पसरटपणा 

✅कांदा पातीचा आकार रुंद,पसरट, लांब असेल तर याचा थेट परिणाम हा प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर होतो. जास्त पातींचा आकार जास्त प्रमाणात सूर्यप्रकाशाचे शोषण करतो. तसेच पातींचा आकार जास्त असेल तर पर्णरंद्राचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वायूबदल जास्त प्रमाणात होते. याचा परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेच्या दरावर होतो व प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा वेग / प्रमाण वाढल्यामुळे जास्त प्रमाणात अन्ननिर्मिती होते. त्या अन्नाचा पुरवठा पिकाच्या वाढीच्या भागांना व साठवणुकीसाठी पाठवला जातो. ज्यामुळे कांद्याच्या रोपांची वाढ होते व कांद्याचा आकार वाढतो. 

पातींचा हिरवा रंग 

✅कांदा पातीचा रंग जेवढा हिरवा असतो, तेवढेच पातींमध्ये हरितकणांचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे पातींद्वारे सूर्यप्रकाशाचे शोषण चांगल्या प्रकारे होते व त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर होतो व प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा दर वाढतो. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास होतो. 

उपाययोजना 

कांदा पातीचा पसरटपणा वाढवण्यासाठी व पातींना हिरवा रंग येण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

अन्नद्रव्ये नियोजन 

योग्य प्रकारे खतांचे नियोजन केल्यास म्हणजेच नायट्रोजन,मॅग्नेशियम,फॉस्फरस,पोटॅश,सल्फर या अन्नद्रव्यांची पूर्तता केल्यास पानांचा आकार वाढतो व पानांना हिरवा रंग येतो. 

पाणी नियोजन 

✅योग्य प्रकारे पाणी नियोजन केल्यास रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात वाफसा राहतो व मुळांची कार्यक्षमता वाढते. ज्यामुळे अन्नद्रव्ये शोषण वाढते व त्याचा थेट परिणाम रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.
कांदा पिकात पाणी नियोजन कशा प्रकारे करावे याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करा. 

पोषक उत्पादनांचा वापर

पातीचा आकार वाढवण्यासाठी व पातींचा रंग हिरवा होण्यासाठी खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर करावा.