Crop: कांदा | Topic: B.कांदा लागवडीनंतरचे नियोजन

कांदा काढणीपूर्वी किती दिवस अगोदर पाणी बंद करावे?

कांदा काढणीपूर्वी किती दिवस अगोदर पाणी बंद करावे याची माहिती घेण्यासाठी किंवा हे ठरविण्यासाठी मातीचा प्रकार,जलसिंचन प्रकार,बियाणे वाण,वातावरण याची माहिती घेणे गरजेचे आहे.

मातीचा प्रकार/जलसिंचन प्रकार  

✅कांदा काढणीपूर्वी किती दिवस अगोदर पाणी बंद करावे हे ठरविण्यासाठी मातीचा प्रकार व मातीची गुणवत्ता लक्षात घेणे गरजेचे आहे.जर माती हलकी म्हणजेच मुरमाड,वाळूसार असेल तर अशा मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते,अशा मातीत सोडपाणी प्रकारे पाणी देत असाल तर कांदा काढणीपूर्वी 10 दिवस अगोदर पाणी बंद करावे. ठिबक सिंचनद्वारे देत असाल तर 8 दिवस अगोदर पाणी बंद करावे व तुषार सिंचनद्वारे देत असाल तर 6 दिवस अगोदर पाणी बंद करावे.
✅जर माती मध्यम हलकी म्हणजे तांबट किंवा काळी  तांबट मिक्स असेल तर अशा मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते. अशा जमिनीत सोडपाणी पद्धतीद्वारे पाणी देत असाल तर 15 दिवस अगोदर पाणी बंद करावे. जर पाणी ठिबक सिंचनद्वारे देत असाल तर 10 ते 12 दिवस अगोदर बंद करावे.
जर माती जाड असेल तर म्हणजेच काळी किंवा गाळाची असेल तर अशा मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते,अशा मातीत पाणी बंद करावे. ठिबकद्वारे देत असाल तर 20 ते 25 दिवस अगोदर पाणी बंद करावे. ठिबकद्वारे देत असाल तर 15 ते 20 दिवस अगोदर पाणी बंद करावे व तुषार सिंचन पद्धतीद्वारे देत असाल तर 10 ते 15 दिवस अगोदर पाणी बंद करावे. 

बियाणे वाण 

✅कांदा बियाणे हे लागवडीनंतर किती दिवसांनी काढणीयोग्य होतो याची माहिती घेतल्यास कांदा काढणीचा योग्य वेळ ठरविता येते व मातीचा प्रकार व जलसिंचन प्रकार लक्षात घेऊन पाणी कधी बंद करावे हे ठरविता येते.

वातावरण 

✅पावसाचा अंदाज घेऊन पाणी बंद केल्यास होणारे नुकसान टाळता येते,तसेच तापमान जास्त प्रमाणात वाढल्यास मातीचा प्रकार,जलसिंचन प्रकार लक्षात घेऊन लागवडीपूर्वीचा पाणी बंद करण्याचा कालावधी कमी करावा.

अशा प्रकारे वरील मुद्द्यांचा आधार घेऊन कांदा लागवडीपूर्वी पाणी कधी बंद करावे हे ठरविता येते.