कांदा पत्ती येण्यासाठी व कांद्याला नैसर्गिक रंग येण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात?
कांद्याला नैसर्गिक रंग व पत्ती येण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.
खत नियोजन
✅कांदा पिकात योग्य प्रकारे खतांचे नियोजन केल्यास कांदा रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. कांदा पिकात खत नियोजन करण्यासाठी रोपांच्या वाढीच्या अवस्था लक्षात घेऊन खत नियोजन करावे, खत नियोजन हे लागवडीपूर्वी शेताची मशागत करताना एकदा करावे व लागवडीनंतर रोपवाढीच्या अवस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात व कंद निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात करावे. योग्य प्रकारे रोपांची वाढ झाल्यामुळे कांद्याला आकार,नैसर्गिक रंग व पत्ती येते.
बोरॉन,सल्फर व कॅल्शियमचा वापर
✅कांदा पिकामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम व बोरॉनचा वापर केल्यामुळे कांद्याचे बाहेरील आवरण तयार होते.ज्यामुळे कांद्याला पत्ती येते. तसेच सल्फरचा वापर केल्यामुळे कांद्याला नैसर्गिक रंग व चकाकी येते. त्यासाठी कांदा पिकात कंद फुगवणीच्या व कंद निर्मितीच्या अवस्थेत बोरॉन, कॅल्शियम व सल्फर युक्त खतांचा वापर करावा.
जमिनीचा भुसभुशीतपणा
✅जी जमीन भुसभुशीत असते अशा जमिनीत ऑक्सिजनचे प्रमाण संतुलित असते. ज्यामुळे कांद्याच्या मुळांची वाढ होते व कांद्याला नैसर्गिक रंग व चकाकी येते, तसेच पत्ती येते. त्यामुळे हलक्या जमिनीत कांद्याला पत्ती येते.
बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण
✅जुन्या कांदा पाती जेवढा जास्त काळ टिकून राहतात, तेवढी चांगली पत्ती कांद्याला येते. त्यामुळे कांदा पिकात पत्ती येण्यासाठी बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.