मॅग्नेशियम कमतरता
मॅग्नेशियम कमतरता कशी ओळखावी
✅ कांदा पिकात मॅग्नेशियम कमतरता आल्यानंतर कांदा पातीमधील हरितकणांचे प्रमाण कमी होते व सुरुवातीला पातीचे शेंडे व कालांतराने संपूर्ण पात पिवळी पडते. त्यानंतर पातीचे शेंडे तपकिरी रंगाचे होतात व एकदम पिवळे पडतात आणि वाळून जातात. रोपांची वाढ एकदम खुंटते व रोपांवर इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा आपल्या प्लॉटमध्ये मॅग्नेशियम कमतरता आहे असे समजावे.
मॅग्नेशियमची कार्य
✅ हरितकणांची निर्मिती करणे
मॅग्नेशियमचे प्रमुख कार्य हे पातीमध्ये हरितकणांची निर्मिती करणे आहे, ज्यामुळे पाती हिरवीव्यागार होतात,ज्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर होतो व प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा वेग वाढल्यामुळे रोपांची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होतो.
✅एन्झाईमची क्रियायाशीलता वाढते
मॅग्नेशियम हे कार्बोहायड्रेट्स प्रोटीनच्या निर्मितीमध्ये सामील असणाऱ्या एन्झाईमसची क्रियाशीलता वाढते.ज्यामुळे प्रोटीन व कार्बोहायड्रेट्सची निर्मिती वाढते व रोपांची वाढ विकास चांगल्या प्रकारे होतो.
✅कार्बोहायड्रेटचे वहन व हालचाल
मॅग्नेशियम हे रोपांच्या पातींमध्ये प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमधून तयार झालेले कार्बोहायड्रेटमचे वहन करून कांदा पिकाच्या बल्बमध्ये नेतात त्यामुळे कांद्याचा आकार वाढतो.
✅रोग प्रतिकारशक्ती वाढवतात
मॅग्नेशियम हा रोपांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो ज्यामुळे रोपांवर वातावरण व इतर नैसर्गिक घटकांचा आलेला अजैविक व किडी बुरशीजन्य रोग यांचा आलेला जैविक ताण कमी करतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.
मॅग्नेशियम कमतरतेची कारणे
✅जमिनीची गुणवत्ता
ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा हलक्या स्वरूपाच्या जमिनी ( मुरमाड, वाळूसार) मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अशा जमिनीत लगेच मॅग्नेशियम कमतरता जाणवते.
✅आम्लयुक्त जमीन
या जमिनी या आम्लयुक्त आहेत. म्हणजेच ज्या जमिनीचा PH 5.5 पेक्षा कमी आहे.अशा रोपांच्या मुळांद्वारे मॅग्नेशियम शोषण केला जात नाही. परिणामी मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅अयोग्य पाणी नियोजन
जर पाणी जास्त दिले तर मॅग्नेशियम रोपांच्या मुळांच्या कक्षेतून बाहेर वाहून जातो. तसेच जास्त ओलावा असल्यामुळे मुळांची शोषण क्षमता कमी होते ज्यामुळे मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे दिसतात. तसेच जर कमी पाणी दिले तर हवा तेवढा ओलावा मुळांच्या कार्यक्षेत्रात राहत नाही व मुळांची कार्यक्षमता कमी होते व मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे दिसू लागतात.
✅अति पाण्याचे प्रमाण
ज्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तेव्हा जमिनीतून शेताच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये वाहून जातात व मुळांच्या कक्षेत अन्नद्रव्य कमतरता भासते. त्यामुळे मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असणे
ज्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते, तेव्हा कॅटायन एक्सचेंज प्रक्रिया संथगतीने होते,ज्यामुळे मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅मातीचा घट्टपणा
ज्या जमिनीचा घट्टपणा कमी असतो तेव्हा अशा जमिनीत मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते व ज्या जमिनीचा घट्टपणा जास्त असतो,तेव्हा मुळांची वाढ कमी होते ज्याचा थेट परिणाम अन्नद्रव्ये शोषणावर होतो व मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे दिसतात.
✅जास्त क्षारांचे प्रमाण
ज्या जमिनी क्षारांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत मुळांची अन्नद्रव्ये शोषण क्षमता कमी होते व मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅कांद्याचे वनस्पतीशास्त्र
कांदा रोपांच्या मुळांची वाढ ही जमिनीच्या वरच्या भागात होते. ज्यामुळे अन्नद्रव्य उपलब्धता मर्यादित असते परिणामी मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे कांदा पिकात दिसतात.
एकात्मिक उपाययोजना
✅जमिनीची निवड
मॅग्नेशियम कमतरता ही हलक्या म्हणजे कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या (लांबट, मुरमाड,वाळूसार) जमिनीत जाणवते. त्यामुळे जमिनीची निवड करताना अशा जमिनीची निवड करू नये.तसेच ज्या जमिनी आम्लयुक्त आहेत अशा जमिनीत मॅग्नेशियम शोषण कमी होते, त्यामुळे अशा जमिनीची निवड लागवडीसाठी करू नये. तसेच क्षारयुक्त जमिनीत अन्नद्रव्ये शोषण कमी असते. त्यामुळे अशा जमिनीची निवड सुद्धा करू नये.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
✅ योग्य खत नियोजन
जमिनीची निवड केल्यानंतर त्या जमिनीची गुणवत्ता व पिकाची गरज या गोष्टींचा अभ्यास करून योग्य खत नियोजन करावे.
खत नियोजन विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटोवर क्लिक करा.
✅ योग्य पाणी नियोजन
मातीचा प्रकार, गुणवत्ता व वातावरण यांचा अभ्यास करून योग्य प्रकारे पाणी नियोजन करा. जर योग्य प्रकारे पाणी नियोजन केले तर रान जास्तीत जास्त काळ वाफस्यावर राहते व अन्नद्रव्ये शोषण वाढते व मॅग्नेशियम कमतरता भासत नाही.
रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करा.
✅ पावसानंतरचे नियोजन
पावसानंतर मॅग्नीशियम कमतरता येऊ नये म्हणून खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबक द्वारे करावा.
उपचारात्मक उपाययोजना
✅ मॅग्नेशियम कमतरता लक्षणे दिसत असतील तर खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबकद्वारे करावा.