Crop: कांदा | Topic: A.कांदा लागवडीपूर्वीचे नियोजन

कांद्याचे एकरी सरासरी उत्पादन किती आहे? 

कांद्याचे सरासरी एकरी उत्पादन

✅कांद्याचे एकरी सरासरी उत्पादन हे योग्य प्रकारे फवारणी नियोजन, खत नियोजन याचबरोबर लागवडीचा प्रकार एकरी रोपांची संख्या यावर अवलंबून आहे.
✅कांदा पिकाच्या एका रोपाला जमिनीमध्ये एकच कांदा तयार होतो. ज्याचे वजन हे सरासरी 80 ते 140 ग्रॅम च्या दरम्यान असते.त्यामुळे एकरी रोपांची संख्या कांदा उत्पादनावर थेट परिणाम करतो.
लागवड जर सारा पद्धतीने केली व दोन कांदा रोपांमधील अंतर 10Cm ठवले व दोन रोपांच्या ओळींमधील अंतर 10 Cm ठवले तर एकरी 2.5 ते 3 लाख रोपे लागतील व एका रोपापासून मिळणाऱ्या कांद्याचे वजन हे जर सरासरी 80 ते 100 ग्रॅम असेल व रोपमर व इतर कारणांमुळे रोपांमध्ये 5% घट धरली तर एकरी 20 ते 25 टन  एवढे उत्पादन मिळते.
लागवड जर गादीवाफा पद्धतीमध्ये केली असेल व गादीवाफे हे बसके व उथळ म्हणजेच पसरट सोडले असतील तर  2.5 फुटाचा टॉप म्हणजेच गादीवाफ्याची वरची बाजू मिळते व त्यावर 10 Cm असे दोन रोपांमधील अंतर ठेवले व दोन्ही  ओळींमधील अंतर 10 Cm ठेवले तर एकरी 2 ते 2.5 लाख रोपे मिळतात.  एका कांद्याचे वजन 100 ते 120 ग्रॅम मिळाले तर 20 ते 25 एवढे गादीवाफ्यावर मिळते.


 सारा पद्धतएकरी 2.5 ते 3 लाख रोपे – एका कांद्याचे वजन 80 ते 100 ग्रॅम – एकरी सरासरी उत्पादन 20 ते 25 टन
गादी वाफा पद्धत एकरी 2 ते 2.5 लाख रोपे – एका कांद्याचे वजन 100 ते 120 ग्रॅम – एकरी सरासरी उत्पादन 20 ते 25 टन