कांदा रोपांची लागवड केल्यानंतर शेंडे पिवळे पडण्याची कारणे काय आहेत व त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
कांदा रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर रोपे पिवळी पडण्याची अनेक कारणे ती खालील प्रमाणे:
कारणे
✅रोपे पुर्नलागवडीनंतर पिवळी पडण्याचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे रोपे जमिनीत सेट न होणे, जेव्हा कांदा रोपांची पुर्नलागवड जमिनीमध्ये केली जाते व रोपे रुजण्याच्या टप्प्यात मुळांचा विकास जमिनीमध्ये करतात, परंतु काही परिस्थितींमध्ये जर मुळांचा विकास जमिनीमध्ये झाला नाही तर रोपांना अन्नद्रव्य शोषण जमिनीतून करता येत नाही व अन्नद्रव्य कमतरता भासल्यामुळे रोपे पिवळी पडतात.
✅रोपे पुर्नलागवडीनंतर पिवळी पडण्याचे दुसरे कारण हे पाण्याचे असंतुलित नियोजन हे आहे. जर पाणी पुर्नलागवडीनंतर जास्त झाले तर जमिनीत मुळांच्या कार्यस्त्रोत जास्त ओलावा निर्माण होतो व त्यामुळे रोपे अन्नद्रव्य शोषण करू शकत नाहीत. जर पाणी कमी पडले तरी मुळांच्या कक्षेत कोरडेपणा वाढतो व मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाहीत, परिणामी जास्त किंवा कमी पाण्यामुळे रोपांना अन्नद्रव्ये शोषण करता येत नाही व रोपे पिवळी पडतात.
✅रोपे पुर्नलागवडीनंतर रोपे पिवळी पडण्याचे पुढील कारण हे रोपांवर होणारा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा आहे. जर रोपे पुर्नलागवड केल्यानंतर रोपांवर पिथियम,फुजारियम यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला तर रोपांची पाती किंवा शेंडे पिवळी पडतात.
✅रोपे पुर्नलागवडीनंतर रोपांवर मोठ्या प्रमाणावर मावा व इतर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला तर रोपांच्या पाती पिवळ्या पडायला लागतात.
✅काही परिस्थितीमध्ये रोपांवर पुर्नलागवडीनंतर जैविक-अजैविक ताण येतो याच ताणामुळे रोपे पिवळी पडतात.
उपाययोजना
या अडचणीवर उपाययोजना या एकात्मिक, प्रतिबंधात्मक व उपचारात्मक करायच्या आहेत.
एकात्मिक उपाययोजना
एकात्मिक उपाययोजना म्हणजे कांदा पिकात येणाऱ्या जास्तीत जास्त अडचणीवर एका वेळेस उपाययोजना करणे होय.
✅शेताची निवड
सर्वात महत्त्वाची आणि पहिली उपायोजना ही कांदा लागवडीसाठी योग्य प्रकारच्या शेताची निवड करणे होय. शेताची निवड करताना मातीची गुणवत्ता व शेताची परिस्थिती यावर अवलंबून आहे. शेताची निवड करताना जास्त किंवा कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या जमिनीची निवड करावी.उदा: पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असणाऱ्या मुरमाड किंवा वाळूसार मातीची निवड करू नये, तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असणाऱ्या गाळाचा किंवा काळ्या मातीच्या जमिनीची निवड करू नये, मध्यम पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असणाऱ्या काळी तांबट किंवा तांबट मातीच्या जमिनीची निवड करावी.त्याचबरोबर जमिनीची निवड करताना जमिनीतून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशा जमिनीची निवड.करावी.जर निचरा न होणाऱ्या जमिनीची निवड केली तर पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनीत जास्तीचा ओलावा निर्माण होतो व रोपांवर पिथियम, फुजारियम या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो व रोपांची मर होते. तसेच अन्नद्रव्य शोषण अशा जमिनीत कमी होते व रोपे पिवळी पडतात त्यामुळे जमिन निवडताना पाण्याचा निचरा होईल अशा जमिनीची निवड करावी.
कांदा पिकासाठी योग्य शेताची निवड कशी करावी याची माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
✅शेताची मशागत
शेताची मशागत चांगल्या प्रकारे केल्यामुळे जमिनीचा भुसभुशीत पणा वाढतो ज्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते व अन्नद्रव्ये शोषण वाढते. व रोपे लागवडीनंतर हिरवीगार होतात. तसेच मशागत केल्यामुळे जमिनीमधील बुरशीचे बीजाणू निष्क्रिय होतात व रोपे लागवडीनंतर रोपांवर बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. व रोपे पिवळी पडून रोपांची मोर होत नाही.तसेच मशागत केल्यामुळे किडींचे कोष निष्क्रिय होतात व रोप लागवडीनंतर किडींचा प्रादुर्भाव होत नाही. व रोपे पिवळी पडत नाहीत. शेताची मशागत करताना सर्वप्रथम शेत नांगरून घ्यावे त्यानंतर शेत उन्हात तापून द्यावे. जेणेकरून बुरशीचे बिजाणू व किडींचे कोष निष्क्रिय होतात.तसेच त्यानंतर शेतात फणपाळी मारावी व शेतामधील तणांचे अवशेष, मागील पीक अवशेष गोळा करून शेताच्या बाहेर टाकावेत. जेणेकरून त्या अवशेषांबरोबर किडींचे कोश व बीजाणूंचे बिजाणू शेताच्या बाहेर जातील व पुढे जाऊन रोपांवर किडींचा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही .त्यानंतर शेतामध्ये रोटाव्हेअर मारून चढउतार कसा आहे याचा अभ्यास करून सारे किंवा गादीवाफे सोडावेत.सारे किंवा गादीवाफे असे सोडू नयेत जेणेकरून शेतात पाणी साठणार नाही. व शेत लवकर वाकशावर येईल.
कांदा पिकासाठी शेताची निवड कशी करावी याची माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवरती क्लिक करा.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे ठराविक अडचण येऊ नये म्हणून उपाययोजना करणे होय.
या अडचणीवर खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
✅रोपांना प्रक्रिया करावी
रोपांना लागवडी अगोदर बुरशीनाशक कीटकनाशक, उत्पादनांच्या द्रावणाची प्रक्रिया करून सुकवून रोपांची लागवड केली तर रोपांवर पुर्नलागवडीनंतर बुरशीचा प्रादुर्भाव किडींचा प्रादुर्भाव होत नाही व रोपांवर ताण येत नाही, तसेच रोपे लवकर सेट होतात. ज्यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढते. ज्यामुळे रोपे लागवडीनंतर पिवळी पडत नाहीत.
✅लागवडीपूर्वीचे खत नियोजन
रोपांची लागवड करण्यापूर्वी जर ठराविक प्रमाणात खत नियोजन केले तर रोपांना अन्नद्रव्य कमतरता भासत नाही, व योग्य प्रमाणात आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे रोपे लवकर सेट होतात, व रोपे पिवळी पडत नाहीत. लागवडीपूर्वी शेतास कोणत्या रासायनिक खतांचा बेसल डोस वापरावा याची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
✅रोपलागवडीनंतरचे पाणी नियोजन
रोप लागवडीनंतर योग्य प्रकारे पाणी नियोजन केल्यास गरजेपेक्षा जास्त ओलावा किंवा गरजेपेक्षा कमी ओलावा राहणार नाही व रोपांना वाफसा स्थिती जास्तीत जास्त राहिल्यामुळे रोपांच्या मुळांची कार्यक्षमता वाढेल व रोपे लवकर सेट होतील.तसेच जास्तीच्या ओलाव्यामुळे रोपांवर ज्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो तो होणार नाही व रोपे पिवळी पडणार नाहीत.
✅प्रतिबंधात्मक फवारणी नियोजन
रोप लागवडीनंतर खालील फवारणी केल्यास रोपांवर बुरशीजन्य रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव होण्याअगोदर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळेल त्यासाठी खालील फवारणी करा.
उपचारात्मक उपाययोजना
✅तुमच्या शेतामध्ये कांदा लागवड केल्यानंतर रोपे पिवळी पडत असतील तर खालीलपैकी एक फवारणी करा.