कांदा रोपांची लागवड करण्यासाठी रोपांची निवड कशा प्रकारे करावी?
कांदा रोपांची लागवड करण्यासाठी रोपांची निवड कशा प्रकारे करावी
✅ कांदा रोपांची लागवड करताना रोपांची निवड करताना खालील मुद्द्यांचा विचार करून निवड केल्यास शुद्ध व आरोग्यदायी रोपे मिळतात.
रोपांची वाढ
✅ रोपांची निवड करताना रोपांची वाढ लक्षात घेणे गरजेचे आहे.
✅रोपांची उंची ही 16 ते 17 Cm असावी.शक्यतो यापेक्षा जास्त किंवा कमी उंचीच्या रोपांची लागवड करू नये.
✅ रोपांची निवड करताना दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोपांच्या कंदांचा आकार हा लसणाच्या पाकळी एवढा झालेला असावा.
✅ रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ ही जोमदार झालेली असावी.
✅ रोपांची पात हिरवीगार असावी.
✅ अशाप्रकारे सर्व प्रकारे रोपांची वाढ झालेल्या रोपांची निवड करावी.
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
✅ रोपांची निवड करताना रोपांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो तो झालेला आहे का हे पहावे. प्रामुख्याने बोटट्रीस करपा,मानकूज,मुळकुज,रोपमर,पर्पल ब्लॉच यांसारख्या बुरशीजन्य रोगांची लक्षणे दिसत आहेत का ते पाहावे.
✅ जर लक्षणे दिसत असतील तर अशा रोपांची निवड लागवडीसाठी करू नये.
✅ रोपांवर कोणत्याही प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला नसावा,अशी रोपे लागवडीसाठी निवडावीत.
किडींचा प्रादुर्भाव
✅ रोपांची निवड करताना रोपांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे का ते तपासा.
✅ त्यामध्ये प्रामुख्याने रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो.जर रोपांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला असेल तर अशी रोपे लागवडीसाठी वापरू नयेत.
अशा प्रकारे रोपांची वाढ बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, किडींचा प्रादुर्भाव तपासा.व रोपांची शुद्ध वाढ झालेली व रोपांवर बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव मुक्त रोपांची निवड करावी.