Crop: कांदा | Topic: A.कांदा लागवडीपूर्वीचे नियोजन

कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी कांदा रोपांवर रोपप्रक्रिया कशासाठी,कोणत्या उत्पादनांची व कशाप्रकारे प्रक्रिया करावी? 

कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी 1  दिवस अगोदर रोपांवर बुरशीनाशक, पोषक व  कीटकनाशक या उत्पादनांची एकत्रितपणे रोपप्रक्रिया करावी.

रोपांवर प्रक्रिया कशासाठी करावी?

रोपांवर रोपप्रक्रिया खालील कारणांसाठी करायची आहे.
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
रोपांवर पुर्नलागवडीनंतर रोप रुझण्याच्या टप्प्यात विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.यामध्ये पिथियम रोप मर,पिळ रोग फुजारियम रोपमर यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. जर रोपांवर प्रक्रिया केली तर या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.यासाठी रोपांवर प्रक्रिया करण्यासाठी बुरशीनाशकांचा वापर करावा.

✅ रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ    
सुरुवातीच्या टप्प्यात जर रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ वाढ चांगल्या प्रकारे झाली तर रोपे लवकर सेट होतात, त्यासाठी रोपांवर प्रक्रिया करताना एका पोषक उत्पादनाचा वापर करावा.जेणेकरून पुनरलागवडीनंतर रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होईल व रोपे लवकर सेट होतील.
✅ किडींचा प्रादुर्भाव 
रोपांवर नर्सरीमध्ये विविध रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. पुनरलागवडीनंतर अशा रोपांवरून प्रादुर्भाव हा मुख्य प्रक्षेत्रात होतो.जर रोपांवर लागवड करण्यापूर्वी कीटकनाशकांची प्रक्रिया केली तर रसशोषक किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.
✅ इतर कारणे 
रोपांची लागवड केल्यानंतर काही परिस्थितीमध्ये रोपे पिवळी पडतात त्यांची कारणे  बरीच आहेत,त्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव,किडींचा प्रादुर्भाव,मुळांची अकार्यक्षमता व अन्नद्रव्य कमतरता असते. या सर्व कारणांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे रोपांवर बुरशीनाशक,किटकनाशक व पोषकांची लागवडीपूर्वी प्रक्रिया करणे. 

रोपांवर रोपप्रक्रिया कशी करावी? 

✅ रोपांवर प्रक्रिया करताना सर्वप्रथम खालील उत्पादने योग्य प्रमाणात घेऊन त्याचे  द्रावण बनवावे. त्यानंतर रोपांच्या जुडीची मुळे द्रावणात बुडवावे, किमान 10 ते 15 मिनिटे रोपांच्या जुडीची मुळे द्रावणात ठेवावीत,जेणेकरून चांगल्या प्रकारे मुळे द्रावण शोषण करतील,त्यानंतर त्या रोपांच्या जुडी सावलीमध्ये थोडा वेळ सुकत ठेवावी, जेणेकरून द्रावण मुळांद्वारे आतमध्ये चांगल्या प्रकारे शोषले जाईल व अधिकचे द्रावण निथळून जाईल, शक्यतो प्रक्रिया ही रोप लागवडीच्या अगोदरच्या दिवशी करावी जेणेकरून या प्रक्रियेचे परिणाम चांगले येतील व लागवड केल्यानंतर बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव होणार नाही, रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होईल व रोपे लवकर सेट होतील.

रोपांवर रोपप्रक्रिया करण्यासाठी उत्पादने 

✅ रोपांवर रोपप्रक्रियेसाठी एक बुरशीनाशक एक कीटकनाशक व एक पोषक या उत्पादनांचा वापर करावा.