Crop: कांदा | Topic: B.कांदा लागवडीनंतरचे नियोजन

कांदा रोपे सेट झाली आहेत का हे कसे ओळखावे?

कांदा रोपे सेट झाली आहेत का हे खालील मुद्द्यांच्या आधारे ओळखावे.

निरीक्षण कधी करावे?

✅रोपे सेट झाली आहेत का हे तपासण्यासाठी निरीक्षण करणे गरजेचे आहे. कांदा रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर रोपे ही पाच ते सहा दिवसांनी सेट होतात त्यामुळे याचे निरीक्षण हे रोप लागवडीनंतर पाच ते सहा दिवसांनी करावे. 

निरीक्षण कसे करावे?

✅कोणतीही वनस्पती रोप लागवडीनंतर सर्वप्रथम पांढऱ्या मुळांची वाढ जमिनीत करतात व त्यानंतर नवीन शेंडे म्हणजेच पाती निघतात. त्यामुळे निरीक्षण करताना एखादे रोप उपटून घ्यावे व रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ तपासावी. जर पांढऱ्या मुळांची वाढ झाली असेल व रोपांना नवीन पाती फुटल्या असतील तर रोपे सेट झालेली आहेत असे समजावे.
✅त्याउलट रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ व्यवस्थित झाली नसेल व रोपांची पात पिवळी पडली असेल तर रोपे सेट झालेली नाही असे समजावे व रोपे सेट होण्यासाठी खालीलपैकी कोणतीही एक फवारणी करावी.