कांदा रोप उपटण्यापूर्वी, उपटताना व उपटल्यानंतर रोपांची काळजी कशी घ्यावी?
कांदा रोप उपटण्यापूर्वी घ्यायची काळजी...
✅ कांदा रोपांची लागवडी जर सारा पद्धतीने केली असेल तर उपटण्यापूर्वी मातीच्या प्रकारानुसार पाणी द्या.जर जाड माती असेल तर 4 ते 5 दिवस अगोदर पाणी द्या.जर मध्यम जाड माती असेल तर 3 ते 4 दिवस अगोदर पाणी द्या व हलकी माती असेल तर 2 दिवस अगोदर पाणी द्या.पाणी दाट पद्धतीने देत असताना अशा प्रकारे द्या जेणेकरून रोप उपटतात रान वाफस्यावर असेल.
✅ जर पाणी हे तुषार सिंचन पद्धतीद्वारे असेल तर आदल्या दिवशी पाणी द्या; परंतु पाणी देताना मातीच्या प्रकारानुसार किती वेळ द्यायचे हे ठरवा जेणेकरून रान दुसऱ्या दिवशी वाफस्यावर येईल.
✅ रोप उपटताना जर रान वाफस्यावर असेल तर रोपांच्या पांढऱ्या मुळ्या तुटून येत नाहीत व ज्या रोपांच्या पांढऱ्या मुळया जास्त असतात अशी रोपे पुर्नलागवड केल्यानंतर लवकर सेट होतात.
✅ कांदा रोप उपटण्यापूर्वी पाणी द्यावे, त्या पाण्यानंतर फवारणी करा. फवारणी केल्यामुळे रोपे पुर्नलागवड केल्यानंतर रोपांची मर अजिबात होत नाही, तसेच रोपे लवकर सेट होतात. रोपांवर जर कोणते बुरशीजन्य रोग व किडी असतील तर त्यांचा प्रादुर्भाव मुख्य शेतात होत नाही.
✅ फवारणी कोणती करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
RidomilGold Marshal GreenBee Spray Kit
Tata Master Actara RootStar Spray Kit
Tata master- Aaatank-MC Extra Spray Kit
Saaf Profex super MC Extra Spray Kit
रोप उपटताना घ्यायची काळजी...
✅ रोप उपटताना रोपे हळुवार उपटावीत जेणेकरून त्यांच्या पांढऱ्या मुळ्या तुटणार नाहीत व जास्तीत जास्त पांढऱ्या मुळ्या रोपांंबरोबर येतील व अशी रोपे पुनरलागवडीनंतर लवकर सेट होतील.
रोपे उपटल्यानंतर घ्यायची काळजी
✅ रोपे उपटल्यानंतर रोपांचे गड्डे बांधावेत. गड्डे बांधण्यासाठी रबर न वापरता सुतळी किंवा सुती दोरी वापरावी, जर रबर लांबला तर गड्ड्यामधील साईडच्या रोपांना जखम होते व अशी रोपे पुनरलागवड केल्यानंतर मरून जातात त्या उलट जर सुतळी किंवा सुती दोरीने बांधले तर जखम होत नाही व मर सुद्धा होत नाही.
✅ रोपे उपटल्यानंतर रोपे लगेच गोळा करून सावलीला ठेवावीत. जर जास्त वेळ उन्हात राहिली तर रोपे जास्त सुकतात व अशी रोपे पुनरलागवडीनंतर लवकर सेट होत नाहीत.तसेच रोपे ही भिजवलेल्या बारदानाच्या पोत्यात ठेवावीत ज्यामुळे रोपे सुकणार नाहीत.
अशा प्रकारे रोपे उपटण्यापूर्वी उपटताना व उपटल्यानंतर काळजी घ्यावी.