Crop: कांदा रोपवाटिका | Topic: 1.कांदा बियाणे पेरणीपूर्वीचे नियोजन

उन्हाळी कांदा बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी कोणत्या उत्पादनांची बीजप्रक्रिया करावी व ती कशाप्रकारे करावी?


कांदा बीज प्रक्रिया या विषयाची माहिती घेण्यासाठी खालील विषयांवर माहिती घेणे गरजेचे आहे.

कांदा बीजप्रक्रिया कशासाठी करावी?

✅कांदा बीजप्रक्रिया करण्याचा प्रमुख उद्देश हा जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव बियाण्यावर होऊ नये व बियाणे उगवण्या अगोदर किंवा उगवत असताना खराब होऊ नये यासाठी करायची आहे. तसेच जर बियाण्यास बीजप्रक्रिया केली तर बियाण्याची उगवण क्षमता वाढते व उगवण क्षमतेचा दर वाढल्यामुळे एकरी बियाणे खर्च कमी होतो.

कांदा बीज प्रक्रिया कशा प्रकारे करावी?

✅जर तुम्ही जैविक बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करत असाल व उत्पादन हे द्रव स्वरूपात असेल तर 30 ते 40 मिली उत्पादन हे तीन किलो बियाण्यास चांगल्या प्रकारे चोळून घ्यावे व वीस मिनिटे सावलीमध्ये सुकवून द्यावे व त्यानंतर ते पेरणीसाठी वापरावे. उत्पादन हे पावडर स्वरूपात असेल तर ते बियाण्यास अगोदर चांगल्या प्रकारे व्यवस्थित चोळून घ्या व तसेच ते सर्व बियाण्याला लागण्यासाठी त्यावर 100 मिली पाणी शिंपडा व बियाणे 20 मिनिटे चावलीमध्ये सुकवून घ्यावे व त्यानंतर पेरणीसाठी वापरावे.
✅रासायनिक बीजप्रक्रिया करत असाल व बीज प्रक्रियेसाठी द्रव स्वरूपातील उत्पादन वापरत असाल तर, ते योग्य प्रमाणामध्ये घेऊन बियाणे चांगल्या प्रकारे चोळून घ्यावे व बियाणे 20 मिनिटे सावलीमध्ये सुकवून त्यानंतर पेरणीसाठी वापरावे व बीज प्रक्रियेसाठी पावडर स्वरूपाचे उत्पादन वापरत असाल तर ते योग्य प्रकारे चोळून घ्यावे ते व्यवस्थित बियाण्याला लागण्यासाठी त्यात 100 ml पाणी शिंपडावे. हे बियाणे सावलीमध्ये सुकवून त्यानंतर पेरणीसाठी वापरावे.
टिप : जैविक व रासायनिक उत्पादने बीज प्रक्रियासाठी एकत्रितपणे करू नये.

कांदा बीजप्रक्रियेसाठी कोणती उत्पादने वापरावीत?

✅प्रामुख्याने कांदा बियाणे पेरणी केल्यानंतर त्यावर जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशींचा प्रादुर्भाव होतो जमिनीमध्ये असणाऱ्या पिथीयम बुरशीमुळे बियाणे उगवण्यापूर्वी खराब होत, तसेच उगवत असताना सुद्धा खराब होते, तसेच उगवल्या नंतर सुद्धा रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होत असते किंवा रोपांची नवीन पाने म्हणजेच पाती पिवळी निघायला लागतात व रोपांची वाढ खुंटून कालांतराने अशा रोपांची मर होत असते. जमिनीमध्ये असणाऱ्या Fusariumcolletotrichum या बुरशीमुळे रोपांना पीळ पडणे ही अडचण मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
✅त्यामुळेच या जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशींपासून आपल्या कांदा बियांचे संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी एका बुरशीनाशकाचा वापर किंवा किटचा वापर बीजप्रक्रियेसाठी करावा.

जैविक बुरशीनाशके 
  • Trichoderma Viride
  • Pseudomonas Fluorescens

✅वरील दोन्हीपैकी एका उत्पादनाची बीजप्रक्रिया करावी.