शास्त्रीय नाव 

 Bemisia tabaci

किडीचे जीवनचक्र 

✅पांढरी माशी, ज्याला हिंदीत “सफेद मक्खी” किंवा मराठीत “पांढरी माशी” म्हणतात, कांदा व इतर भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहचवते. त्यांचे जीवनचक्र अंडी-निम्फ-कोष-पतंग असे 4  टप्प्यांमध्ये विभागले जाते.त्यांच्या जीवनचक्र माहिती खालील प्रमाणे,

कांदा पिकात येणाऱ्या पांढरी माशी (Whitefly) या किडीचे जीवनचक्र खालीलप्रमाणे असते.

✅ अंडी अवस्था (Egg Stage)

  • मादी पांढरी माशी पातींच्या खालच्या बाजूस पातींच्या वेणीमध्ये 100-300 अंडी घालते.
  • अंडी फिकट पिवळसर रंगाची असतात.
  • अंड्यांची उबवण कालावधी 2-5 दिवस असतो, जो हवामानाच्या तापमानावर अवलंबून असतो.

✅ निम्फ किंवा पिल्ले अवस्था (Nymph Stage)

  • ही अवस्था 4 भागांमध्ये विभागलेली असते.
  • पहिली अवस्था (Crawler) : अंड्यातून बाहेर पडलेले लहान निम्फ,ज्यांना “क्रॉलर” म्हणतात, थोडं अंतर चालतात आणि कोवळ्या लुसलुशीत पातींच्यावर रसशोषण करतात.ही अवस्था सुमारे २-३ दिवसांची असते.हे निम्फ पानांमध्ये सोंड घालून रस शोषण करतात.
  • दुसरी ते चौथी अवस्था (Settled Nymphs) : पहिल्या अवस्थेनंतर निम्फ एकाच ठिकाणी स्थिर होतात आणि पातींच्या पृष्ठभागावर राहतात. हे निम्फ सपाट आणि पारदर्शक असतात, ज्यामुळे त्यांना पाहणे कठीण असते.या अवस्थेत ते सतत पातींच्यावर रस शोषून घेतात.दुसऱ्या ते चौथ्या अवस्थेचा एकूण कालावधी सुमारे ६-१० दिवसांचा असतो.

✅ कोष अवस्था (Pupal Stage)

  • चौथ्या अवस्थेतील निम्फ (ज्याला “रेड-आय” निम्फ म्हणतात) कोष बनतात.
  • या अवस्थेत कीड पूर्ण विकसित होण्यासाठी विश्रांती घेते.
  • ही अवस्था सुमारे ६-७ दिवसांची असते.
  • कोष अवस्था पूर्ण झाल्यानंतर कोषामधून प्रौढ पांढरे पतंग बाहेर येतात, ज्यामुळे रिकामे कवच मागे राहते.

✅ पतंग अवस्था (Adult Stage)

  • प्रौढ पांढऱ्या माश्या बाहेर आल्यावर लगेच मीलन करतात.
  • मादी काही दिवसांत अंडी घालण्यास सुरुवात करतात.
  • प्रौढ पतंग पातींच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात.
  • पतंग अवस्था हि 1 ते 2 आठवडे चालते एवढ्या दिवसांत मादी पतंग शेकडो अंडी घालते.
जीवनचक्राचा कालावधी
  • संपूर्ण जीवनचक्र सुमारे ३-४ आठवड्यांत पूर्ण होते.
  • अनुकूल परिस्थितीत एका हंगामात अनेक पिढ्या तयार होऊ शकतात.
  • संपूर्ण वर्ष भरामध्ये 10 ते 12 पिढ्यांचे जीवनचक्र पूर्ण होते.
पोषक वातावरण 
  • पांढरी माशी या कीडीच्या विकासासाठी व प्रजननासाठी पोषक वातावरणाची माहिती.
  • जेव्हा तापमान हे 20°C ते 30°C च्या दरम्यान असते व आद्रता मध्यम ते उच्च असते, तेव्हा या किडीचा प्रादुर्भाव विकास व प्रजनन जलद गतीने होते.
  • जेव्हा दिवस मोठा असतो व रात्र लहान असते, तेव्हा या कीडींच्या पतंगाची कार्यक्षमता व प्रजननक्षमता वाढते व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
  • मध्यम व कमी पाऊसामुळे आद्रता मध्यम रहाते.ज्यामुळे या कीडींचा प्रादुर्भाव अधिकच वाढतो. परंतु त्याउलट जर मुसळधार पाऊस आला तर कीडींचे  निम्फ व कोष शेताच्या बाहेर वाहून जातात. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • ढगाळ वातावरणात तापमान व आद्रता वाढते. ज्यामुळे या कीडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  • एकंदरीत तापमान वाढलेल्या व आद्रता वाढल्यामुळे किडीची जीवनचक्र कमी कालावधीमध्ये पूर्ण होते व कीडींचा प्रादुर्भाव वाढतो.
या किडीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा
  • पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव कांदा पिकावर झाल्यानंतर ही कीड पातींच्या कोवळ्या भागावर रसशोषण करते. त्यामुळे या किडीचे निरीक्षण करताना कांदा पातीवर पांढऱ्या रंगाची कीड दिसत आहे का ते पाहावे त्याचबरोबर प्रामुख्याने किडिंचा प्रादुर्भाव हा कोवळ्या भागांवर दिसत आहेत का ते पहावे. 
  • पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ती पातींवर रस शोषण करते त्यामुळे पाती या पिवळ्या पडतात त्यामुळे निरीक्षण करताना कांदापाती पिवळ्या पडत आहेत का हे पहावे.
  •  पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यानंतर कीड काळ्या रंगाचा स्त्राव म्हणजेच मधासारखा घटक पातीवर सोडते व पातींवर त्यामुळे काळ्या रंगाच्या बुरशीचा थर आलेला आपल्याला दिसतो.जर आपल्याही शेतामध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसत असतील तर शेतामध्ये पांढऱ्या माशी या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे असे समजा. 
  •  अशा प्रकारचे निरीक्षणे करून पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव ओळखावा.
एकात्मिक नियोजन 

एकात्मिक नियोजन म्हणजे शेतामध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर एका वेळेस उपाययोजना करणे होय.

✅ शेताची मशागत
शेताची नांगरट करून 15 ते 20 दिवस उन्हात तापून द्यावे, त्यामुळे सूर्यप्रकाशामुळे किडींचे कोष निष्क्रिय होते तसेच फणपाळी मारून शेतामधील जुन्या पिकांचे अवशेष,तणांचे अवशेष शेताच्या बाहेर फेकून द्यावेत जेणेकरून त्या अवशेषांबरोबर किडींचे कोष शेताच्या बाहेर जातील व किडींचा प्रादुर्भाव होण्याअगोदर नियंत्रण मिळेल
 सापळा पिकांची लागवड
शेताच्या चारही बाजूंनी सापळा पिके म्हणजेच मका,झेंडू यांसारख्या पिकांची लागवड करावी.जेणेकरून किडीचा प्राथमिक प्रादुर्भाव हा सापळा पिकांवर होईल व मुख्य शेतामध्ये प्रादुर्भाव होण्याअगोदर उपाययोजना करण्यास आपणास वेळ मिळेल. 

इन्सेक्ट नेट लावणे
शेताच्या चारही बाजूस पाच ते सात फुटांपर्यंत इनसेक्ट नेट लावावे,जेणेकरून वाऱ्याबरोबर उडत येणाऱ्या किडींना शेताच्या बाहेरच रोखता येईल व मुख्य क्षेत्रांमध्ये प्रादुर्भाव होणार नाही.

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे शेतामध्ये मावा या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपाययोजना करणे.

सापळे लावणे
शेतामध्ये योग्य प्रमाणात निळे पिवळे रंगाची चिकट सापळे लावावेत व वेळोवेळी त्त्यांचे निरीक्षण करून प्रादुर्भावाची लक्षणे आढळल्यास योग्य ती फवारणी करावी जेणेकरून शेतामध्ये प्रादुर्भाव होण्याअगोदर किडींवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल.
✅ निरीक्षण करणे
शेताच्या बाजूने असलेल्या सापळा पिकांचे, इंसेक्ट नेटचे व शेतामध्ये लावलेल्या निळ्या पिवळ्या चिकट सापळयांचे वेळोवेळी निरीक्षण करावे. त्यावर प्रादुर्भाव झालेला आहे का ते पहावे, त्याचबरोबर प्रादुर्भाव झाला असेल तर त्याचे प्रमाण किती आहे याचे निरीक्षण करून मुख्य शेतामध्ये योग्य त्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
रोपांवर प्रक्रिया करणे
शेतामध्ये रोपांची पुर्नलागवड करताना रोपांवर कीटकनाशकाची प्रक्रिया करावी जेणेकरून रोप लागवड केल्यानंतर रोपांवर कीटकनाशकाचा रासायनिक थर असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव होणार नाही.रोपांवर प्रक्रिया कशी करावी याची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर किंवा निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करावे.
नायट्रोजनचे प्रमाण कमी ठेवणे
नायट्रोजनचा अतिवापर केल्यास रोपांना कोवळापणा जास्त येतो रोपांच्या हिरवापणा वाढतो त्यामुळे किडी जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होतात व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळवण्यासाठी योग्यता प्रमाणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण ठेवावे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.
✅ तणनियंत्रण करणे
शेतामध्ये जर जास्त प्रमाणात तण आले तर किडींचा प्रादुर्भाव ही मोठ्या प्रमाणावर वाढतो त्यामुळे वेळीच लहान तण असताना योग्य त्या  तणनाशकाची फवारणी करावी किंवा भांगलण करून त्यावर नियंत्रण मिळवावे.
पाणी नियोजन
योग्य प्रकारे पाणी नियोजन केल्यास जास्त ओलावा राहत नाही व मावा या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये वाढत नाही. त्यामुळे रोपांची गरज वातावरण मातीचा प्रकार जलसिंचन प्रकार याचा अभ्यास व माहिती घेऊन पाण्याचे नियोजन करावे जेणेकरून मावा या किडीवर येण्याअगोदर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळवता येईल.
फवारणी नियोजन
फवारणी करताना वेळोवेळी योग्यता कीटकनाशकाचा वापर फवारणी मध्ये करावा जेणेकरून रोपांवर रासायनिक थर तयार होतो व किडीचा प्रादुर्भाव होत नाही.उदाहरणार्थ नीम ऑइलचा वापर केल्यामुळे पातींवर कडवटपणा वाढतो व किडींचा प्रादुर्भाव टाळला जातो.
✅ सिलिकॉनचा वापर
सिलिकॉनचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे पातींचा जो काय आहे तो कडकपणा वाढतो ज्यामुळे रस शोषक किडीना पातींवर रस शोषण करता येत नाही ज्यामुळे किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.

उपचारात्मक उपाययोजना 

✅कांदा पिकावर जर किडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर रोपांची वाढीची अवस्था लक्षात घेऊन खालीलपैकी एका कीटकनाशकाचा वापर योग्य प्रकारे करावा.