कांदा बल्बच्या बुडाचा भाग व मुळ्या कुजत आहेत तसेच बुडावर व मुळांवर पांढऱ्या रंगाची बुरशी दिसत आहेत त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
कांदा बल्बच्या बुडाचा भाग व मुळ्या कुजत आहेत आणि बुडावर व मुळांवर पांढऱ्या रंगाची बुरशी दिसत आहेत त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
कारणे
✅कांदा बल्बचा बुडाचा भाग व मुळे कुजण्याचे कारण हा बुरशीचा प्रादुर्भाव आहे.ज्यावेळेस जमिनीत सतत ओलावा असतो, तसेच तापमान हे 10 डिग्री सेल्सिअस ते 24 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो व या अडचणीला सुरुवात होते. यामध्ये याचा प्राथमिक प्रादुर्भाव झाल्यानंतर रोपांच्या जुन्या पाती या पिवळ्या पडायला लागतात व कालांतराने पूर्ण पात पिवळी पडून सुकून जाते. अशी लक्षणे दिसल्यानंतर जेव्हा आपण कांदा उपटून पाहतो त्यावेळेस त्याची मुळे व खालचा कांदा कुजलेला असतो व त्यावर पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर आलेला आपल्याला दिसून येतो.ही अडचण प्रामुख्याने कंद निर्मितीच्या अवस्थेमध्ये,कंद फुगवणीच्या अवस्थेमध्ये व कंद काढणीच्या अवस्थेमध्ये कांदा पिकामध्ये येत असते.
उपाययोजना
✅या अडचणीवर उपाययोजना करताना सर्वप्रथम बुरशीचा प्रादुर्भाव रोखणे व बुरशीचा प्रसार रोखणे गरजेचे आहे. या बुरशीचा प्रसार हा जमिनीमध्ये असणाऱ्या अधिकच्या ओलाव्या मार्फत एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये होत असतो.सर्वप्रथम आपण बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे जमिनीत अधिकचा ओलावा राहणार नाही.अशा प्रकारे पाण्याचे नियोजन करावे. पाणी नियोजन करताना जमिनीचा प्रकार,जलसिंचन प्रकार व त्याचबरोबर वातावरण या घटकांचा अभ्यास व विचार करून पाणी नियोजन करावे.
यासाठी कांदा पिकामध्ये पाणी नियोजन कशा प्रकारे करावे ही माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करावे.
✅पाणी नियोजन योग्य प्रकारे केलं व जमीन लवकरात लवकर कोरडी व वाफस्यावर येत असेल तर या बुरशीचा प्रसार एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये होणार नाही.याद्वारे आपण बुरशीचा प्रसार रोखू शकतो. आता आपल्याला या बुरशीचा झालेला प्रादुर्भाव रोखणे खूप गरजेचं आहे.
त्यासाठी आपण खालीलपैकी एका बुरशीनाशक जोडीचा वापर फवारणी मध्ये करावा.जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव रोखला जाईल.