फॉस्फरस कमतरता
फॉस्फरस कमतरता कशी करावी?
कांद्याच्या रोपांमध्ये फॉस्फरसच्या कमतरतेमुळे खालील लक्षणे दिसून येतात त्यासाठी खालील लक्षणांची निरीक्षणे करावे.
✅कांदा पिकात फॉस्फरस कमतरतेमुळे पेशींचे विभाजन थांबते,ज्यामुळे रोपांची शाकीय वाढ थांबते व रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ थांबते. त्यामुळे हे लक्षणे दिसत आहेत का ते पहावे.
✅ कांदा पिकात फॉस्फरस कमतरतेमुळे पाती गडद हिरव्या किंवा पातीच्या कडा जांभळ्या रंगाच्या होतात. ही लक्षणे दिसत आहेत का ते पहावे.
✅कांदा पिकात फॉस्फरस कमतरतेमुळे मान जाड होत नाही तसेच लवकर कंद निर्मिती होत नाही.त्यामुळे ही लक्षणे दिसत आहेत का ते पहावे.
✅कांदा पिकात फॉस्फरस कमतरतेमुळे मुळांची तंतुमय वाढ थांबते. त्यामुळे एखादे रोप उपटून त्यांच्या मुळांचा विकास झाला आहे का ते पहावे.
फॉस्फरसची कार्य
✅नवीन मुळांची निर्मिती
फॉस्फरस हा वनस्पतीमध्ये पेशी विभाजनाचे कार्य करतो. त्यामुळे फॉस्फरस हा पांढरा मुळांच्या निर्मितीसाठी व वाढीसाठी आवश्यक घटक आहे. ज्यामुळे अन्नद्रव्ये व पाणी शोषण वाढते, रोपांची वाढ व विकास होतो.
✅नवीन पातींची निर्मिती
फॉस्फरस हा वनस्पतीमध्ये पेशी विभाजनासारखे मुख्य कार्य करतो ज्यामुळे नवीन पातींची निर्मिती होते व कांदा पातींची वेणी चांगली होते.
✅कांदा पात जाड होण्यासाठी
फॉस्फरस हा वनस्पतींमध्ये पेशी विभाजनाचे कार्य करतो.ज्यामुळे रोप वाढीच्या अवस्थेत मान जाड होते.
✅कंद निर्मितीसाठी
फॉस्फरस हा कांदा पिकामध्ये रोपवाढीच्या अवस्थेनंतर कंद निर्मितीमध्ये व कंदाचा आकार वाढवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.
✅ऊर्जा हस्तांतरण
फॉस्फरस हा ATP संश्लेषणात महत्त्वाचा घटक आहे.जो वनस्पतींमधील प्रक्रियांसाठी ऊर्जा पुरवण्याचे कार्य करतो.ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुधारतात व रोपांची वाढ व विकास होतो.
✅ताण सहनशक्ती वाढवतो
फॉस्फरस हा रोपांवर येणारा जैविक/ अजैविक ताण कमी करण्यास मदत करतो व रोपांची ताणसहनशक्ती वाढवतो.
फॉस्फरस कमतरतेची कारणे
✅जमिनीमध्ये फॉस्फरसची कमतरता
ज्या जमिनीत कांदा लागवड करणार आहात अशा जमिनीत जर फॉस्फरसची कमतरता असेल तर लागवड केल्यानंतर कांदा पिकात फॉस्फरसची कमतरता लक्षणे दिसतात.
✅जमिनीचा सामू
ज्या जमिनीचा सामु 6 पेक्षा कमी आहे व 8 पेक्षा जास्त आहे अशा जमिनीत शोषण मुळांद्वारे होत नाही व कांदा पिकामध्ये फॉस्फरस कमतरतेची लक्षणे दिसतात.
✅अयोग्य पाणी नियोजन
जर पाणी जास्त दिले तर फॉस्फरस रोपांच्या मुळांच्या कक्षेतून बाहेर वाहून जातो. तसेच जास्त ओलावा असल्यामुळे मुळांची शोषण क्षमता कमी होते ज्यामुळे फॉस्फरस कमतरतेची लक्षणे दिसतात. तसेच जर कमी पाणी दिले तर हवा तेवढा ओलावा मुळांच्या कार्यक्षेत्रात राहत नाही व मुळांची कार्यक्षमता कमी होते व फॉस्फरस कमतरतेची लक्षणे दिसू लागतात.
✅अति पावसाचे प्रमाण
ज्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तेव्हा जमिनीतून शेताच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये वाहून जातात व मुळांच्या कक्षेत अन्नद्रव्य कमतरता भासते. त्यामुळे फॉस्फरस कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅जमिनीत सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण
ज्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते, तेव्हा कॅटायन एक्सचेंज प्रक्रिया संथगतीने होते,ज्यामुळे फॉस्फरस कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅मातीचा घट्टपणा
ज्या जमिनीचा घट्टपणा कमी असतो तेव्हा अशा जमिनीत मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते व ज्या जमिनीचा घट्टपणा जास्त असतो,तेव्हा मुळांची वाढ कमी होते ज्याचा थेट परिणाम अन्नद्रव्ये शोषणावर होतो व फॉस्फरस कमतरतेची लक्षणे दिसतात.
✅जास्त क्षारांचे प्रमाण
ज्या जमिनी क्षारांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत मुळांची अन्नद्रव्ये शोषण क्षमता कमी होते व फॉस्फरस कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅कांद्याचे वनस्पतीशास्त्र
कांदा रोपांच्या मुळांची वाढ ही जमिनीच्या वरच्या भागात होते. ज्यामुळे अन्नद्रव्य उपलब्धता मर्यादित असते परिणामी फॉस्फरस कमतरतेची लक्षणे कांदा पिकात दिसतात.
एकात्मिक उपाययोजना
✅ जमिनीची निवड
फॉस्फरस कमतरता ही हलक्या म्हणजे कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या (लांबट,मुरमाड,वाळूसार) जमिनीत जाणवते त्यामुळे जमिनीची निवड करताना अशा जमिनीची निवड करू नये.तसेच ज्या जमिनी आम्लयुक्त आहेत अशा जमिनीत फॉस्फरस शोषण कमी होते त्यामुळे अशा जमिनीची निवड लागवडीसाठी करू नये.तसेच क्षारयुक्त जमिनीत अन्नद्रव्ये शोषण कमी असते. त्यामुळे अशा जमिनीची निवड सुद्धा निवड करू नये.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
✅ योग्य खत नियोजन
जमिनीची निवड केल्यानंतर त्या जमिनीची गुणवत्ता व पिकाची गरज या गोष्टींचा अभ्यास करून योग्य खत नियोजन करावे.
खत नियोजन विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटोवर क्लिक करा.
✅ योग्य पाणी नियोजन
मातीचा प्रकार, गुणवत्ता व वातावरण यांचा अभ्यास करून योग्य प्रकारे पाणी नियोजन करा. जर योग्य प्रकारे पाणी नियोजन केले तर रान जास्तीत जास्त काळ वाफस्यावर राहते व अन्नद्रव्ये शोषण वाढते आणि फॉस्फरस कमतरता भासत नाही.
रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करा.
पावसानंतरचे नियोजन
✅ पावसानंतर फॉस्फरस कमतरता येऊ नये म्हणून खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबकद्वारे करावा.
उपचारात्मक उपाययोजना
✅ फॉस्फरस कमतरता लक्षणे दिसत असतील तर खालीलपैकी एका उत्पादनाचा वापर फवारणी किंवा ठिबकद्वारे करावा.