भुरी
जबाबदार बुरशी
✅ कांदा पिकामध्ये भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा Leveillala Taarica या बुरशीमुळे होतो.
✅ या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कांदा पिकामध्ये रोप वाढीच्या अवस्थेत, कंद निर्मितीच्या अवस्थेत, कंद फुगवणीच्या अवस्थेत व कांदा काढणीच्या अवस्थेत होतो.
पोषक वातावरण
✅ भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकामध्ये हा जेव्हा कांदा पातीवर 16 तासांपेक्षा जास्त काळ ओलावा असतो. तसेच तापमान हे 20०C ते 30०C च्या दरम्यान असताना व आद्रता ही 95% पेक्षा जास्त असताना जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
लक्षणे
✅ भुरी या बुरशीजन्य रोगाची लक्षणे ही प्रामुख्याने कांदा पातीवर दिसतात.ज्यामध्ये कांदा पातीवर पांढरट रंगाचा पिठासारखा थर दिसून येतो. त्या थराच्या खालील पातीवर पांढरट रंगाचे चट्टे पडलेले दिसतात. कालांतराने याचे प्रमाण वाढल्यानंतर रोपांची वाढ खुंटते व वाढ खुंटल्यामुळे रोपांचा विकास न होता रोपे मरगळून पडतात.
प्रसार
✅ या बुरशीजन्य रोगाचा प्रथम प्रादुर्भाव हा जेव्ह पात ही 16 तासांपेक्षा जास्त काळ ओली राहते तेव्हा होतो.त्यानंतरच्या काळामध्ये या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये सतत वाहणारे वारे त्याचबरोबर शेतमजुरांच्या साह्याने,शेतामध्ये वापरल्या जाणाऱ्या अवजारांच्या साह्याने एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.
उपाययोजना