Crop: कांदा | Topic: E.कांदा पिकात येणाऱ्या अडचणी

कांदा रोप पुर्नलागवडीनंतर रोपांना पिळ पडत असेल तर त्यावर काय उपाययोजना कराव्यात? 

रोपांना पिळ होण्याची कारणे :

✅कांदा रोपांची  पुर्नलागवड  केल्यानंतर रोपांना पिळ पडण्याचे प्रमुख कारण आहे Colletotrichium या बुरशीचा प्रादुर्भाव. या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे रोपांमध्ये GA व IIA ग्रोथ हार्मोन्सचे प्रमाण वाढते. याचे प्रमाण वाढल्यामुळे रोपांच्या  पातींची अवांतर वाढ होते व रोपांना मोठ्या प्रमाणात पिळ पडतो तसेच रोपांच्या पाती पिवळ्या पडतात. 

उपाययोजना 

✅या अडचणीवर  उपाययोजना  करण्यासाठी एकात्मिक, प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

एकात्मिक उपाययोजना 

✅एकात्मिक उपाययोजना म्हणजे शेतामध्ये येणाऱ्या एकापेक्षा जास्त अडचणींवर एकत्रितपणे उपाययोजना करणे होय.यामध्ये आपण खालील एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शेताची निवड :
शेताची निवड करताना अशा जमिनीची निवड करा की ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम असावी, म्हणजेच काळी-तांबट किंवा तांबट जमिनीची निवड लागवडीसाठी करावी. जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या काळ्या  किंवा गाळाच्या मातीची निवड  लागवडीसाठी करू नये. जमिनीमध्ये जेवढा जास्त काळ ओलावा राहतो, तेवढा या बुरशीचा प्रादुर्भाव जलद व प्रसार गतीने होतो. त्याचबरोबर अशा जमिनीची निवड करा ज्या जमिनीमध्ये पाणी व पाण्याचा निचरा लवकर होईल. जेणेकरून रान लवकर वाफस्यावर येईल व कोरडे होईल. 

शेताची मशागत :
शेताची निवड  केल्यानंतर शेताची मशागत करताना शेत खोलवर नांगरून 15 ते 20 दिवस उन्हामध्ये तापून द्यावे. त्यानंतर तणांचे अवशेष व  मागील पिकांचे अवशेष शेताच्या बाहेर गोळा करून टाकून द्या, जेणेकरून त्याबरोबर बुरशीचे बीजाणू शेताच्या बाहेर जातील.सारे किंवा गादीवाफे उतार बघून सोडा जेणेकरून पाणी शेतामध्ये साठणार नाही व पाण्याचा निचरा होऊन जमीन लवकर सुकेल. अशा प्रकारे शेताची मशागत केल्यास पुर्नलागवडीनंतर रोपांची मर होणार नाही.

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे रोपांची मर होऊ नये म्हणून अगोदरच हव्या त्या उपाययोजना करणे होय. रोपांना बुरशीचा प्रादुर्भाव होऊ न देणे व बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होण्यापासून रोखणे गरजेचे आहे.त्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

रोप प्रक्रिया :
रोपांवर लागवडी अगोदर जर बुरशीनाशकांची प्रक्रिया केली तर रोप लागवडीनंतर रोपांवर पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. रोपप्रक्रिया केल्यामुळे रोपांच्या मुळांवर एक रासायनिक थर तयार होतो. ज्यामुळे बुरशीचे बीजाणू रोपांच्या मुळांवर अंकुरु देऊ शकत नाहीत.
रोप प्रक्रिया अशाप्रकारे करावी याची सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी कांदा रोपांवर रोपप्रक्रिया कशासाठी,कोणत्या उत्पादनांची व कशाप्रकारे प्रक्रिया करावी?
योग्य पाणी नियोजन :
बुरशीचा प्रादुर्भाव हा तेव्हा होतो जेव्हा शेतामध्ये जास्त काळ गरजेपेक्षा जास्त ओलावा असतो. ओलाव्यामध्ये या बुरशीचे बीजाणू मुळांवर अंकुरतात व ओलाव्यामार्फत एका भागातून दुसऱ्या भागात पसरतात. त्यासाठी या बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी योग्य प्रकारे मातीच्या गुणवत्तेनुसार व प्रकारानुसार पाणी नियोजन करणे गरजेचे आहे.
याची माहिती घेण्यासाठी खालील फोटो किंवा लिंक वर क्लिक करा.
कांदा रोप लागवडीनंतर पाणी नियोजन कसे करावे? 

फवारणी नियोजन :
रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर पहिले पाणी देऊन खालीलपैकी एक फवारणी केल्यास रोपांची मर ही रोपवाटीकेमध्ये होणार नाही.

उपचारात्मक उपाययोजना 

✅उपचारात्मक उपाययोजना म्हणजे  रोपांची मर होत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायच्या  उपाययोजना. यामध्ये पहिली उपायोजना आहे या बुरशीचा प्रसार रोखणे. बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी या रोगांची लक्षणे दिसायला लागली की शेताचे पाणी बंद करावे. जेणेकरून शेत कोरडे होईल व बुरशीचा प्रादुर्भाव एका भागातून दुसऱ्या भागात होणार नाही

फवारणी नियोजन :
आपल्या शेतामध्ये जर रोपांची मर होऊ लागली असेल तर खालीलपैकी एक फवारणी दाट करावी. 


 

वरीलपैकी एका किटची फवारणी झाली असेल तर किंवा बुरशीनाशक ची फवारणी झाली असेल तर खालील पैकी एक फवारणी करावी.