Crop: कांदा रोपवाटिका | Topic: 2.कांदा बियाणे पेरणीनंतरचे नियोजन

कांदा बियाणे पेरणीनंतर किती दिवसांनी उगवते?

 कांदा बियाणे उगवण हे विविध घटकांवर अवलंबून असते आणि हे घटक बियाणे उगवणीवर परिणाम करतात.

कांदा वाण

✅कांद्याचे विविध वाण असतात आणि प्रत्येक वाणाची उगवण क्षमता व कालावधी वेगवेगळ्या असतो. काही वाण हे लवकर उगवणारे असतात, तर काही वाण हे उगवायला जास्त वेळ घेतात.

हवामान 

✅कांदा उगवण्यासाठी साधारण 20 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सियस तापमान योग्य मानले जाते. या तापमानात उगवण जलद होते. जर तापमान जास्त असेल किंवा तापमान कमी असेल तर उगवण प्रक्रिया ही मंदावू शकते.

आर्द्रता(ओलावा)

✅मातीमध्ये असणारी आद्रता म्हणजेच ओलावा हा बियाण्याच्या उगवणीवर परिणाम करतो. योग्य प्रमाणात ओलावा असेल तर बियाणे लवकर व वेळेत उगवतात, पण जर ओलावा कमी असेल तर बियाणे उगवण्यात वेळ लागतो. पण जर ओलावा गरजेपेक्षा जास्त असेल तर बियाणे उगवण्यास वेळ लागतो किंवा त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो व ते बियाणे हे खराब होऊ शकते.

मातीची गुणवत्ता 

✅मातीची गुणवत्ता बियाण्याच्या उगवणतेवर थेट परिणाम करते. ज्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते व ज्या जमिनीत पाण्याचा निचरा होतो अशा जमिनीत बियाणे इतर जमिनीच्या तुलनेत लवकर उगवतात.

बीजप्रक्रिया

✅बीज प्रक्रिया ही बियाण्याच्या उगवण क्षमतेवर थेट परिणाम करते. ज्या बियाण्यास बीज प्रक्रिया केलेली नाही ती बियाणे उशिरा उगवतात व ज्या बियाण्यास बीज प्रक्रिया केलेली आहे अशी बियाणे लवकर उगवतात. तसेच ज्या बियाण्यास बीजप्रक्रिया केलेली नाही अशा बियाण्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन अशी बियाणे उगवत असताना किंवा उगवताना खराब होऊ शकतात. परंतु ज्या बियाण्यास बीजप्रक्रिया केलेली आहे अशी बियाणे खराब न होता चांगल्या प्रकारे उगवतात.


✅कांद्याचे बियाणे हे पेरणीनंतर 72 तासांनी अंकुरायला सुरुवात होते व ते बियाणे जमिनीच्या वर सात ते दहा दिवसांमध्ये दिसायला लागते. योग्य हवामान,आद्रता,मातीची गुणवत्ता,योग्य वाणाची निवड आणि बीज प्रक्रिया केल्यास बियाणे लवकर व योग्य वेळेत उगवते.