Amistar

Price range: ₹465.00 through ₹3,869.00

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव
Syngenta 
उत्पादनाचे नाव
Amistar
वापरण्याचा प्रकार
फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक 
Azoxystrobin 23% SC 
रासायनिक गट
Strobilurins
बुरशीनाशक प्रकार
Systemic + Translaminar

🎥 उत्पादन व्हिडिओ

Amistar वापराचे फायदे जाणून घ्या 👇

SKU: N/A Category: Tags: , Brand:

Description

रासायनिक घटक

▸ यामध्ये ॲझॉक्सिस्ट्रोबिन 23% एस.सी. (Azoxystrobin 23% SC Suspension Concentrate) हा रासायनिक घटक असतो.

रासायनिक गट

▸ स्ट्रोबिल्यूरिन (Strobilurins)

बुरशीनाशक प्रकार व क्रिया

▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही व ट्रान्सलॅमिनर (Systemic + Translaminar)

▸ आंतरप्रवाही असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आत मध्ये शोषले जाते.

▸ ट्रान्सलॅमिनर असल्यामुळे पानाच्या वरच्या भागाद्वारे शोषले जाते व पानांच्या खालच्या बाजूला झिरपते.

▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक

टिप: Azoxystrobin मध्ये eradicant action नसते. म्हणजेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढल्यानंतर हे औषध बुरशी पूर्ण नष्ट करू शकत नाही.
कार्यपद्धती (Mode of Action)

▸ ॲझॉक्सिस्ट्रोबिन हे श्वसनक्रिया अवरोधक (Respiration Inhibitor) गटातील आहे.

▸ हे बुरशीनाशक बुरशीच्या मायटोकॉन्ड्रिया मधील श्वसनसाखळीत अडथळा आणते. परिणामी बुरशीला ऊर्जा (ATP) मिळत नाही आणि तिचा नाश होतो.

वापरण्याची पद्धत

▸ फवारणी (Foliar Spray)

पीक व लक्षित बुरशीजन्य रोग (पूर्ण यादी)

(टेबल पूर्ण पाहण्यासाठी डावीकडे सरकवा 👉)

पिक लक्ष्यित बुरशीजन्य रोग
कांदा ▸ जांभळा करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ डाऊनी मिल्ड्यू (early stage)
कोबी,
फुलकोबी
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सेप्टोरिया पानांवरील ठिपके
▸ डाऊनी मिल्ड्यू (early stage)
बटाटा ▸ लवकर येणारा करपा (Early blight)
▸ अल्टरनारिया
▸ उशीरा येणारा करपा (early stage)
काकडी,

कारले,

दोडका

▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ डाऊनी मिल्ड्यू (early stage)
▸ भुरी (secondary)
आले, हळद ▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानांवरील करपा
▸ रायझोम रॉट (secondary)
टोमॅटो ▸ अँथ्रॅकोज
▸ अर्ली ब्लाईट
▸ लेट ब्लाईट (early)
▸ भुरी
मिरची ▸ अँथ्रॅकोज
▸ अल्टरनारिया
▸ भुरी (secondary)
वांगे, भेंडी ▸ अँथ्रॅकोज
▸ अल्टरनारिया
▸ भुरी
कापूस ▸ अल्टरनारिया
▸ रस्ट (secondary)
झेंडू, शेवंती ▸ अल्टरनारिया
▸ ग्रे मोल्ड (early stage)
ऊस ▸ पानांवरील ठिपके
▸ रस्ट (secondary)
भुईमूग ▸ अर्ली/लेट लीफ स्पॉट
▸ रस्ट (secondary)
सोयाबीन ▸ अँथ्रॅकोज
▸ सेप्टोरिया
▸ रस्ट (secondary)
डाळवर्गीय

(मटकी, मुग)

▸ अँथ्रॅकोज
▸ रस्ट
▸ ठिपके
भात ▸ करपा / ब्लास्ट (secondary)
▸ तपकिरी ठिपके
गहू, मका ▸ पानांवरील ठिपके
▸ रस्ट (secondary)
द्राक्ष ▸ भुरी
▸ डाऊनी मिल्ड्यू
✅ कोणत्या रोगांवर प्रभावी आहे?
बुरशीचे नाव रोग
Colletotrichum spp. अँथ्रॅकोज / करपा
Alternaria spp. अर्ली ब्लाईट / ठिपके
Cercospora spp. पानांवरील ठिपके
Oidium / Erysiphe भुरी (Powdery Mildew)
Botrytis cinerea ग्रे मोल्ड / फळकुज
Pyricularia oryzae करपा / ब्लास्ट (भात)
❌ खालील रोगांवर वापरू नका
बुरशीचे नाव कारण
Fusarium spp. मातीजन्य रोग (मर)
Rhizoctonia solani खोडकुज / ब्लॅक स्कर्फ
Sclerotinia spp. व्हाइट मोल्ड
Verticillium spp. व्हर्टिसिलियम मर
📏 फवारणी प्रमाण

▸ प्रमाण : 0.75 ml ते 1 ml प्रती लीटर

मुख्य वैशिष्ट्ये

▸विस्तृत श्रेणीतील नियंत्रण – Mildew, Blight, Mold, Rust, Leaf Spot

▸आंतरप्रवाही आणि ट्रान्सलॅमिनर क्रिया

▸उत्कृष्ट प्रतिबंधात्मक क्रिया

▸पिकाचा आरोग्य परिणाम (Phytotonic Effect) – पाने हिरवीगार होतात

▸एस.सी. स्वरूप – द्रव असल्याने वापरणे सोपे

महत्वाची तांत्रिक माहिती

‘क्रॉस रेझिस्टन्स’ टाळणे : अझॉक्सिस्ट्रोबिन हे ‘स्ट्रोबिल्युरिन’ गटातील आहे. सलग वापर टाळा.

‘मोड ऑफ ॲक्शन’ बदला : साखळी तोडण्यासाठी मधल्या काळात ‘ट्रायझोल’ किंवा ‘M-45’ वापरा.

‘टँक मिक्स’ धोरण : हे औषध कधीही एकटे वापरू नका. यासोबत M-45, कवच किंवा अँट्राकोल वापरा.

वारंवारता : एका पिकाच्या हंगामात जास्तीत जास्त २ ते ३ वेळाच वापरा.

प्रतिबंधात्मक वापर : रोग येण्यापूर्वी वापरणे सर्वात सुरक्षित आहे.

🎥 कृषिविद्या व्हिडिओ

व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला सरकवा (Scroll) 👉

Strobilurin गटातील तुलना
रोग गट Azoxystrobin Trifloxystrobin Pyraclostrobin
Downy mildew उत्कृष्ट चांगले चांगले
Powdery mildew चांगले उत्कृष्ट चांगले
Rust (तांबेरा) मध्यम मध्यम उत्कृष्ट
Amistar ला पर्याय
उत्पादन पॅकिंग (200L) कृती
Corteva Galileo 200 ml पहा
BASF Cabrio Top 400 g पहा
Tata Ergon 200 ml पहा
शेतकऱ्यांचे प्रश्न (FAQ)
1) Amistar आंतरप्रवाही आहे का?
हो, आंतरप्रवाही व ट्रान्सलॅमिनर आहे.
2) भुरीवर प्रभावी आहे का?
हो, भुरीवर हे अत्यंत प्रभावी आहे.
3) हे टॉनिक सोबत चालते का?
हो, बहुतेक टॉनिक सोबत चालते.
4) पावसाळ्यात वापरू शकतो का?
हो, ट्रान्सलिमीनर असल्यामुळे हलक्या पावसात टिकतो.
5) PHI किती दिवस?
साधारण 7 दिवस.
6) रासायनिक गट?
Strobilurin.
7) बटाटा करपा?
हो, लवकर येणाऱ्या करप्यावर प्रभावी.
8) मिरची भुरी?
अत्यंत उपयुक्त.
9) कॉपर/सल्फर सोबत?
नाही, टाळावे.
10) एकरी डोस?
160 ml ते 200 ml.

📞 आमच्याशी संपर्क करा

📲 WhatsApp📞 Call Now

शेतकऱ्यांचे रिव्ह्यू
हसन शेख, कोल्हापूर:
“मिरचीवरील करपा यावर प्रभावी नियंत्रण मिळाले.”
निखिल भडंगे, नाशिक:
“टोमॅटो पिकात चांगला रिझल्ट मिळाला.”
राजेंद्र सुस्ते, सोलापूर:
“कलिंगड भुरी रोगावर प्रभावी नियंत्रण मिळाले.”
संबंधित ब्लॉग व पोस्ट्स

(बाजूला सरकवा 👉)

टॉमॅटो खत व्यवस्थापन

वाचा

कांदा रोपवाटिका

वाचा

Additional information

Weight N/A
Weight

200 ml, 25 ml, 50 ml, 500 ml